vishwatmaklokswamivarta
Breaking News
व्यवसाय

पीएम-सेतू’ योजनेअंतर्गत 23 ऑक्टोबर रोजी ठाण्यात ‘उद्योग संवाद’ मेळाव्याचे आयोजन

पीएम-सेतू’ योजनेअंतर्गत 23 ऑक्टोबर रोजी ठाण्यात ‘उद्योग संवाद’ मेळाव्याचे आयोजन

ठाणे, प्रतिनिधी) : व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण प्रादेशिक कार्यालय, मुंबई यांच्या वतीने केंद्र शासनाच्या ‘प्रधानमंत्री स्किलिंग अँड एम्प्लॉयबिलिटी ट्रान्सफॉर्मेशन थ्रू अपग्रेडेड आयटीआय’ (PM-SETU) या महत्त्वाकांक्षी योजनेच्या अनुषंगाने शुक्रवारी, २३ ऑक्टोबर २०२६ रोजी आयबिस हॉटेल, ठाणे येथे ‘उद्योग संवाद’ (Industry Meet) मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. औद्योगिक प्रशिक्षण संस्थांचे आधुनिकीकरण करणे, उद्योगांच्या गरजांनुसार कुशल मनुष्यबळ विकसित करणे, प्रशिक्षणाचा दर्जा सुधारणे आणि प्रशिक्षणार्थ्यांसाठी रोजगार व स्वयंरोजगाराच्या अधिक संधी निर्माण करणे हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश आहे. उद्योग क्षेत्र आणि व्यावसायिक शिक्षण व प्रशिक्षण संस्था यांच्यातील समन्वय अधिक दृढ करून कौशल्य विकास प्रक्रियेला उद्योगाभिमुख स्वरूप देण्याच्या दृष्टीने हा मेळावा महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

औद्योगिक समन्वय आणि योजनेची अंमलबजावणी या मेळाव्यासाठी विविध क्षेत्रांतील नामांकित व अग्रगण्य औद्योगिक कंपन्यांचे प्रतिनिधी, उद्योग संघटनांचे पदाधिकारी तसेच संबंधित अधिकाऱ्यांना निमंत्रित करण्यात आले आहे. या प्रसंगी पीएम-सेतू योजनेची उद्दिष्टे, अंमलबजावणीची प्रक्रिया, उद्योगांचा सहभाग, औद्योगिक प्रशिक्षण संस्थांच्या पायाभूत सुविधांचे अद्ययावतीकरण, आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित प्रशिक्षण, उद्योगांच्या गरजांनुसार अभ्यासक्रम व प्रशिक्षण पद्धतींमध्ये सुधारणा आणि प्रशिक्षित मनुष्यबळाची उपलब्धता याबाबत सविस्तर माहिती दिली जाणार आहे.

विशेष चर्चासत्र आणि सामंजस्य करार मेळाव्यात उपस्थित उद्योग प्रतिनिधींच्या शंकांचे निरसन करण्यासाठी विशेष चर्चासत्राचे आयोजन करण्यात येणार आहे. उद्योगांच्या अपेक्षा, सूचना व अडचणी जाणून घेऊन योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी आवश्यक उपाययोजनांवर विचारविनिमय केला जाईल. तसेच व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय आणि उद्योग क्षेत्र यांच्यात परस्पर सहकार्य वाढवणे, कौशल्य विकासासाठी संयुक्त उपक्रम राबवणे आणि आवश्यकतेनुसार सामंजस्य करार (MoU) करण्याच्या शक्यतांवरही सविस्तर चर्चा करण्यात येणार आहे.

आर्थिक विकासाला चालना आणि प्रशासकीय आवाहन उद्योग आणि कौशल्य विकास संस्थांमधील भागीदारी अधिक मजबूत करून उद्योगांच्या सक्रिय सहभागातून प्रशिक्षणार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचे ज्ञान, प्रत्यक्ष औद्योगिक अनुभव आणि रोजगाराच्या अधिक संधी उपलब्ध करून देण्यावर भर दिला जाणार आहे. या उपक्रमामुळे राज्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थांची गुणवत्ता वाढण्यास, उद्योगांना आवश्यक कुशल मनुष्यबळ उपलब्ध होण्यास आणि महाराष्ट्राच्या औद्योगिक व आर्थिक विकासाला चालना मिळण्यास मोठी मदत होणार आहे. या पार्श्वभूमीवर, उद्योग क्षेत्रातील सर्व संबंधित घटकांनी या संवाद मेळाव्यात सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन सहसंचालक, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण, प्रादेशिक कार्यालय, मुंबई यांच्या वतीने करण्यात आले आहे.

00000000000

संबंधित पोस्ट

बुधवारी हदगाव येथे पंडीत दिनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन

जिल्ह्यात दि.२९ सप्टेंबर रोजी रोजगार महाकुंभ मेळाव्याचे आयोजन*

vishwatmaklokswamivarta

जिल्हा उद्योग केंद्र व महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र (एमसीईडी) तर्फे जाफ्राबाद येथे मोफत गारमेंट मेकिंग प्रशिक्षण कार्यक्रमांचे आयोजन

सोयाबीन व भुईमूग या पिकांसाठी मूल्य साखळी भागीदार निवडीसाठी अर्ज करण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र ठाणे येथे 13 फेब्रुवारी,2026 रोजी सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांकरिता प्लेसमेंट ड्राईव्हचे आयोजन

vishwatmaklokswamivarta

नियोजन भवन जिल्हाधिकारी कार्यालय आवार, ठाणे येथे‘महा निर्यात इग्नाईट कन्व्हेंशन 2026’ एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन

vishwatmaklokswamivarta