vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

मतदार यादीत नाव नोंदविण्यासाठी २८ व २९ नोव्हेंबरला विशेष शिबिरे जिल्ह्यातील सातही विधानसभा मतदारसंघांतील सर्व मतदान केंद्रांवर आयोजन; पात्र मतदारांनी गणना प्रपत्र दाखल करण्याचे आवाहन

मतदार यादीत नाव नोंदविण्यासाठी २८ व २९ नोव्हेंबरला विशेष शिबिरे जिल्ह्यातील सातही विधानसभा मतदारसंघांतील सर्व मतदान केंद्रांवर आयोजन; पात्र मतदारांनी गणना प्रपत्र दाखल करण्याचे आवाहन

बुलढाणा प्रतिनिधी : विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम-२०२६ (SIR-2026) अंतर्गत मतदार यादीत नाव नोंदविण्याची प्रक्रिया सुलभ व्हावी, यासाठी बुलढाणा जिल्ह्यातील सातही विधानसभा मतदारसंघांतील सर्व मतदान केंद्रांवर शनिवार, २८ आणि रविवार, २९ नोव्हेंबर २०२६ रोजी विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे.

या विशेष मोहिमेअंतर्गत अनुपस्थित, स्थलांतरित, मृत तसेच दुबार नोंद असलेल्या प्रवर्गातील पात्र मतदारांना मतदार यादीत आपले नाव कायम ठेवण्यासाठी किंवा नोंदविण्यासाठी गणना प्रपत्र (EF) दाखल करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या शिबिरांमध्ये संबंधित मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) यांच्याकडे मतदारांना गणना प्रपत्र सादर करता येणार आहे.विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत १८ ते ३० नोव्हेंबर या कालावधीत गणना प्रपत्रांचे वितरण व संकलन करण्यात येत आहे. प्राप्त झालेली गणना प्रपत्रे १० डिसेंबरपर्यंत निकाली काढण्यात येणार असून, मतदार यादीचे अंतिम प्रकाशन २२ डिसेंबर २०२६ रोजी होणार आहे.तरी जिल्ह्यातील संबंधित पात्र मतदारांनी २८ व २९ नोव्हेंबर रोजी आपल्या संबंधित मतदान केंद्रावर आयोजित विशेष शिबिरांचा लाभ घ्यावा. मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांकडे गणना प्रपत्र दाखल करून मतदार यादीतील आपली नोंद सुनिश्चित करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. प्रवीणकुमार देवरे यांनी केले आहे.

00000

संबंधित पोस्ट

गडचिरोलीत रानहत्तींचा वावर: रील आणि फोटोंच्या नादात जीव धोक्यात घालू नका; वनविभागाचे नागरिकांना आवाहन*

राजकीय दबावातून करण खरात यांना अटक केल्याचा आरोपभीम आर्मीचे जिल्हाध्यक्ष सुभाष दांडेकर यांची निष्पक्ष तपासाची मागणी

शासन व पोलिसांचे कार्य जनतेची सेवा करणे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ६९वा अखिल भारतीय पोलीस कर्तव्य मेळावा

आताची मोठी बातमी – सामाजिक कार्यकर्ते पर्यावरणवादी सोनम वांगचुक यांचं केंद्रीय मंत्र्यांना पत्र; विद्यार्थ्यांवरील कारवाई न करण्याची मागणी

vishwatmaklokswamivarta

राज्य शासनाच्या ‘उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार-२०२५’ साठी प्रवेशिका पाठविण्याचे आवाहन

राज्यातील सर्व ग्रामीण पाणीपुरवठा योजना सौर ऊर्जेवर आणणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस*ग्रामीण पेयजल धोरण सादरीकरण बैठक*