vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

महात्मा फुले महामंडळाच्या लाभार्थ्यांचे होणार सर्वेक्षण

महात्मा फुले महामंडळाच्या लाभार्थ्यांचे होणार सर्वेक्षण

जालना, प्रतिनिधी: महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळामार्फत विविध कर्ज योजनांचा लाभ घेतलेल्या लाभार्थ्यांचे सर्वेक्षण करून योजनांच्या परिणामांचे मूल्यांकन करण्यात येणार आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून लाभार्थ्यांची सद्यस्थिती, व्यवसायाची प्रगती, रोजगार व उत्पन्नातील वाढ तसेच कर्ज परतफेडीची स्थिती जाणून घेतली जाणार आहे.

मागासवर्गीय समाजातील घटकांचे सामाजिक व आर्थिक उन्नयन करणे, त्यांना स्वयंरोजगार व व्यवसायासाठी आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देणे हा महामंडळाचा प्रमुख उद्देश आहे. महामंडळाच्या विविध कर्ज योजनांचा लाभ घेतलेल्या लाभार्थ्यांचे सर्वेक्षण करण्यासाठी विशेष उपक्रम हाती घेण्यात आला आहे. एम. एस. प्रायमूव्ह इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कन्सल्टंट्स प्रा. लि. या संस्थेची तांत्रिक सहाय्य संस्था (टेक्निकल सपोर्ट एजन्सी) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. या संस्थेमार्फत महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये लाभार्थ्यांचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे.

या सर्वेक्षणात लाभार्थ्यांनी कर्जाचा वापर कोणत्या व्यवसायासाठी केला, त्यांच्या व्यवसायाची सद्यस्थिती काय आहे, रोजगार व उत्पन्नात किती वाढ झाली, तसेच योजनांचा लाभार्थ्यांच्या आर्थिक व सामाजिक परिस्थितीवर काय परिणाम झाला, याची माहिती संकलित केली जाणार आहे. यासोबतच कर्जवाटपानंतर व्यवसाय करताना आलेल्या अडचणी, व्यवसायाची प्रगती आणि योजनांच्या अंमलबजावणीतील त्रुटींचाही अभ्यास करण्यात येणार आहे

या सर्वेक्षणासाठी महामंडळाच्या नियुक्त प्रतिनिधींमार्फत लाभार्थ्यांशी प्रत्यक्ष संपर्क साधून आवश्यक माहिती घेतली जाणार आहे. त्यामुळे महामंडळाच्या सर्व संबंधित जिल्ह्यांतील कर्ज योजनांच्या लाभार्थ्यांनी सर्वेक्षणासाठी येणाऱ्या प्रतिनिधींना आवश्यक माहिती देऊन सहकार्य करावे, असे आवाहन महामंडळामार्फत करण्यात आले आहे.

-*-*-*-*-*-*-

संबंधित पोस्ट

मुक्त व डीजेमुक्त समाजनिर्मिती हीच महापुरुषांना खरी आदरांजली-अनंत कुलकर्णी-हिंदूसूर्य महाराणा प्रतापसिंह जन्मोत्सव समिति चे सामाजिक उपक्रमांनी जयंती साजरी

सातारा जिल्ह्याचे शेतीत ऐतिहासिक पाऊल; कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आधारित फळशेतीचा यशस्वी शुभारंभ

महर्षी वाल्मिकी यांना जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन

vishwatmaklokswamivarta

पदवीधर व शिक्षक मतदारसंघातील मतदारांना मतदानासाठी विशेष नैमित्तिक रजा,खासगी आस्थापनातील मतदारांना दोन ऐवजी चार तासाची विशेष सवलत..

vishwatmaklokswamivarta

मिशन लक्ष्यवेध अंतर्गत अथलेटिक्स निवडचाचणी १४ मे रोजी

धीरज परदेशी हत्या प्रकरणी कठोर कारवाईची मागणी