vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

पदवीधर व शिक्षक मतदारसंघातील मतदारांना मतदानासाठी विशेष नैमित्तिक रजा,खासगी आस्थापनातील मतदारांना दोन ऐवजी चार तासाची विशेष सवलत..

पदवीधर व शिक्षक मतदारसंघातील मतदारांना मतदानासाठी विशेष नैमित्तिक रजा,खासगी आस्थापनातील मतदारांना दोन ऐवजी चार तासाची विशेष सवलत..

            पुणे, प्रतिनिधी : भारत निवडणूक आयोगाने पुणे विभागातील पदवीधर व शिक्षक मतदारसंघांच्या द्विवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला असून सामान्य प्रशासन विभागाच्या निर्णयान्वये या निवडणुकीसाठी मतदानाच्या दिवशी म्हणजे शुक्रवार २३ ऑक्टोबर २०२६ रोजी भरपगारी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. तसेच निवडणूक आयोगाच्या १६ ऑक्टोबर २०२६ च्या सुधारित परिपत्रकानुसार खासगी आस्थापनात काम करणाऱ्या मतदारांना मतदानासाठी २ ऐवजी ४ तासांची विशेष सवलत द्यावी, असेही निर्देश देण्यात आले आहेत.

            निवडणुकीतील मतदार असलेल्या पदवीधर व शिक्षक मतदारांना मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी लोकप्रतिनिधित्व अधिनियम, १९५१ मधील कलम १३५ब नुसार भरपगारी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. ही रजा त्यांच्या अनुज्ञेय असलेल्या नैमित्तिक रजेव्यतिरिक्त असणार आहे. ही रजा केवळ त्या मतदार संघाचे मतदार असलेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांना अनुज्ञेय असल्याने सर्व शासकीय कार्यालयांचे दैनंदिन कामकाज सुरळीत सुरू राहील याची काळजी कार्यालय प्रमुखांनी घ्यावी.

            ही विशेष नैमित्तिक रजा खाजगी आस्थापनांमध्ये काम करणाऱ्या मतदारांना लागू होणार नाही. खासगी आस्थापनांमध्ये काम करणाऱ्या पदवीधर, शिक्षक मतदारांना मतदानासाठी यापूर्वी कळविलेल्या दोन तासांऐवजी चार तासांची विशेष सवलत देण्यात यावी, असे विभागीय आयुक्त तथा निवडणूक निर्णय अधिकारी शितल तेली -उगले यांनी कळविले आहे.

00000

संबंधित पोस्ट

महानगरपालिका रुग्णालयांमध्ये कॉक्लिअर इम्प्लांट शस्त्रक्रियेची व्यवस्था करणार- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हृदय व कॉक्लिअर इम्प्लांट शस्त्रक्रिया झालेल्या मुलांचा दिवाळी स्नेह मेळावा : चिमुकल्यांच्या हास्याने उजळले ‘नंदनवन’

vishwatmaklokswamivarta

अधिकारी -‌ कर्मचाऱ्यांनी प्रशिक्षणातील सूचनांचे काटेकोरपणे पालन करत जबाबदारी दक्षतेने पार पाडावी – निवासी उपजिल्हाधिकारी दादासाहेब गिते-जनगणना २०२७ संदर्भातील जिल्हास्तरीय प्रशिक्षणास प्रारंभ…

हरवलेल्या मूकबधीर बालकाच्या कुटुंबाचा शोध जिल्हाधिका-यांच्या उपस्थितीत बालक कुटुंबाकडे सुपुर्द

सेवा संकल्प कार्यक्रमांतर्गत तासगाव येथे अंधश्रद्धा निर्मूलनाबाबत जनजागृती- अंधश्रद्धेला बळी न पडता डोळसपणे विचार करण्याचे विद्यार्थिनींना आवाहन

प्रधानमंत्री उज्वला गॅस योजना; विस्तारीत टप्पा-2 व 3 मध्ये जिल्ह्यातील 16 हजार 177 लाभार्थ्यांची जोडणी*

सातारा जिल्ह्यातील 19 हजार शेतकऱ्यांना 142 कोटींची अधिकची कर्जमुक्ती; पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर योजनेतून निधी जमा- जिल्हाधिकारी संतोष पाटील

vishwatmaklokswamivarta