vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

राज्यसभा खासदार रामराव वडकुते यांच्या निधनाने बहुजन समाजाचा बुलंद आवाज हरपला– ऊर्जा राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर

राज्यसभा खासदार रामराव वडकुते यांच्या निधनाने बहुजन समाजाचा बुलंद आवाज हरपला– ऊर्जा राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर

मुंबई, प्रतिनिधी : राज्यसभा खासदार रामराव सखाराम वडकुते यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत दुःखद आणि मनाला चटका लावणारे आहे. सर्वसामान्य कुटुंबातून आपल्या कर्तृत्वाच्या आणि संघर्षाच्या बळावर तळागाळातून देशाच्या सर्वोच्च सभागृहापर्यंत पोहोचलेले नेतृत्व आज हरपले आहे. त्यांच्या निधनाने राजकीय, सामाजिक तसेच बहुजन समाजाच्या चळवळीची मोठी हानी झाली आहे, अशा शब्दांत ऊर्जा राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या.

खासदार रामराव वडकुते यांनी सहकार, सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटवला. विविध जबाबदाऱ्या सांभाळताना त्यांनी सर्वसामान्यांच्या प्रश्नांना प्राधान्य दिले. विधान परिषद सदस्य आणि राज्यसभा खासदार म्हणून त्यांनी लोकहिताचे प्रश्न मांडण्याचा प्रयत्न केला. विशेषतः धनगर समाजासह बहुजन समाजाच्या प्रश्नांसाठी त्यांनी सातत्याने आवाज उठवला. मराठवाड्याच्या विकासासाठी शिक्षण, पाणी आणि पायाभूत सुविधांच्या प्रश्नांवर त्यांचा विशेष आग्रह होता.

अत्यंत सामान्य परिस्थितीतून संघर्ष करत त्यांनी मिळवलेले यश अनेक कार्यकर्त्यांसाठी प्रेरणादायी आहे. पक्षनिष्ठा, जनसंपर्क आणि कार्यकर्त्यांशी असलेले जिव्हाळ्याचे संबंध ही त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची वैशिष्ट्ये होती. त्यांच्या निधनामुळे हिंगोली, परभणीसह संपूर्ण मराठवाड्याच्या राजकीय व सामाजिक क्षेत्राची मोठी हानी झाली आहे.

ईश्वर दिवंगत रामराव वडकुते यांच्या आत्म्यास चिरशांती देवो. त्यांच्या कुटुंबीयांना, आप्तस्वकीयांना आणि असंख्य कार्यकर्त्यांना या दुःखातून सावरण्याचे बळ मिळो, अशी प्रार्थना राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी केली आहे.

०००

संबंधित पोस्ट

जम्मू-काश्मीरमधील वार्षिक श्री अमरनाथ यात्रा प्रतिकूल हवामानामुळे सलग सहा दिवस स्थगित राहिल्यानंतर आज पुन्हा सुरू …

पारंपारिक शेतीला कृत्रिम बुद्धिमत्तेची जोड द्यावी: जिल्हा परिषद अध्यक्षा डॉ. प्रिया शिंदे*  *कृषी दिनानिमित्त सातारा जिल्हा परिषदेत शेतकरी सन्मान सोहळा संपन्न* 

विधानसभेत दिवंगत नेत्यांना भावपूर्ण श्रद्धांजली; दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्मृतीस्थानाचा विधानसभाध्यक्षांचा प्रस्ताव

नांदेड जिल्ह्यासाठी हवामान खात्याचा इशारा 14 व 15 मे रोजी यलो अलर्ट जारी

थोर समाजसुधारक, क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पैतृक गावी खानवडी, पुणे येथे त्यांच्या जयंतीनिमित्त क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या स्मारकास पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

राहुरी विधानसभा पोटनिवडणूक-मतदान केंद्रांच्या २०० मीटर परिसरात निर्बंध लागू