vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

पालम येथे २८ नोव्हेंबरला शासकीय सेवा योजनांचा महामेळावा; कायदेविषयक महाशिबिराचे आयोजन* विविध शासकीय विभागांचे स्वतंत्र स्टॉल्स* नागरिकांना योजनांची माहिती व लाभ एकाच छताखाली मिळणार

पालम येथे २८ नोव्हेंबरला शासकीय सेवा योजनांचा महामेळावा; कायदेविषयक महाशिबिराचे आयोजन* विविध शासकीय विभागांचे स्वतंत्र स्टॉल्स* नागरिकांना योजनांची माहिती व लाभ एकाच छताखाली मिळणार

परभणी, प्रतिनिधी)– राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, सर्वोच्च न्यायालय, नवी दिल्ली आणि महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, उच्च न्यायालय, मुंबई यांच्या निर्देशानुसार परभणी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, पालम तालुका विधी सेवा समिती तसेच जिल्हा प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार, दि. २८ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी ११.०० वाजता पालम येथील गजानंद मंगल कार्यालय येथे विधी सेवा महाशिबीराचे आयोजन करण्यात आले आहे

महामेळाव्यामध्ये समाजातील इतर दुर्बल, वंचित घटकांना शासकीय कार्यालयातील विविध लोककल्याणकारी योजनांबाबत जनजागृती करणे तसेच त्याचा लाभ मिळविण्यासाठी कायदेविषयक जनजागृती करणे हा शिबिराचा उद्देश आहे.

परभणी जिल्ह्यातील विविध शासकीय व निम शासकीय विभागांतर्गत त्यांच्या कार्यालयाकडून राबविण्यात येत असलेल्या सेवा व योजनांबाबत माहिती व लाभ देण्याकरीता महाशिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. या महाशिबीरात विविध शासकीय विभांगाचे स्वतंत्र स्टॉल्स उभारण्यात येणार आहेत.

मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमुर्ती तथा परभणी जिल्ह्याचे पालक न्यायाधीश सचिन एस. देशमुख यांच्या हस्ते महाशिबिराचा उद्घाटन होणार आहे. परभणी जिल्ह्याचे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश मा. आर. एम. सादराणी यांच्या मार्गदर्शनानुसार हा कार्यक्रम पूर्ण होणार आहे. परभणी जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अण्णासाहेब चव्हाण, पोलीस अधीक्षक पंकज कुमावत, तसेच जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नतीशा माथुर यांच्या उपस्थितीमध्ये हे महाशिबीर होणार आहे.

परभणी जिल्ह्यातील नागरिकांनी महाशिबीराला उपस्थित राहून शासकीय योजनांबाबत माहिती करुन घ्यावी व शासकीय योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन परभणी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव भुषण काळे आणि पालम वकील संघाचे अध्यक्ष श्याम आर. रोकडे यांनी केले आहे.

***

संबंधित पोस्ट

*नवी मुंबईत १६ व १७ मार्च रोजी राज्यस्तरीय ‘बाल मराठी संमेलन’चे भव्य आयोजन

अमृतच्या लक्षित गटातील परिवार सर्वेक्षण अभियानास प्रारंभ…

माय भारततर्फे ‘नशामुक्त युवा -विकसित भारत’ संकल्प अभियान उत्साहात संपन्न

शेतकऱ्यांनी तात्काळ फार्मर आयडी नोंदणी पूर्ण करावी -कृषी विभागाचे आवाहन

 रील शूट करताना धडक, 23 वर्षीय तरुणाचा मृत्यू, 

कृपया प्रसिद्धीसाठी !महाराष्ट्र मंदिर महासंघामुळे कोट्यवधीची मंदिराची जमीन बिल्डर लॉबीच्या घशात जाण्यापासून वाचली सोमेश्वर संस्थानची ५० कोटींची जमीन अवघ्या९६० रुपयांत लाटण्याचा बेकायदेशीर आदेश अखेर रद्द!* उपविभागीय अधिकाऱ्यांकडून बेकायदेशीर आदेश अखेर रद्द !* अमरावतीतील ऐतिहासिक सोमेश्वर महादेव देवस्थानची मालकी अबाधित !