vishwatmaklokswamivarta
Breaking News
गुन्हे

हातभट्टी निर्मिती विरुद्ध राबवलेल्या विशेष मोहिमेंतर्गत ठाणे राज्य उत्पादन शुल्क सी विभागाची धडक कारवाई

हातभट्टी निर्मिती विरुद्ध राबवलेल्या विशेष मोहिमेंतर्गत ठाणे राज्य उत्पादन शुल्क सी विभागाची धडक कारवाई

ठाणे,द प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्य मुंबई राज्य उत्पादन शुल्क आयुक्त डॉ. राजेश देशमुख, संचालक (अ. व द.) प्रसाद सुर्वे, तसेच कोकण विभाग ठाणे उपायुक्त प्रदीप पवार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली व राज्य उत्पादन शुल्क, जिल्हा ठाणे-१ अधीक्षक प्रवीण तांबे यांच्या आदेशानुसार निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क सी विभाग यांनी अवैध दारू विक्री आणि हात भ‌ट्टी दारू निर्मिती केंद्राविरोधात विशेष मोहीम राबवून त्यांच्या अधिनस्त अधिकारी व कर्मचारी यांच्या सह दि.२० नोव्हेंबर २०२६ रोजी मुर्धा खाडी मिठागराच्या उत्तरेस उत्तन रोड भायंदर पश्चिम ता.जि.ठाणे येथे मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे छापा घातला असता त्यांना तयार हातभट्टी दारू व रसायनासह हातभट्टी निर्मितीसाठी लागणारे साहित्य व हातभ‌ट्टी वाहतुकीसाठी वापरली जाणाऱ्या बोटीसह लाखो रुपयांचा मु‌द्देमाल मिळाला असता तो जागीच नाश करण्यात आला असून मुंबई दारूबंदी कायदा १९४९ अंतर्गत २ गुन्हे नोंद करण्यात आले. सदरची कार्यवाही निरीक्षक जे. एम. खिल्लारे यांनी केली असून कार्यवाहीत सर्वश्री दुय्यम निरीक्षक दीपक खडसे, रत्नाकर शिंदे, स.दु.नि अर्जुन कापडे सर्वश्री जवान भरत एडके, अमजद तडवी व शुभम माळी यांनी सहभाग घेतला. सदर गुन्ह्याचा पुढील तपास सखोल तपास निरीक्षक जे. एम. खिल्लारे करीत आहेत.गुन्ह्याचे ठिकाणः मुर्धा खाडी, मिठागराच्या उत्तरेस, उत्तन रोड, भायंदर पश्चिम ता. जि.ठाणे.

एकूण गुन्हेः 2, तयार हातभट्टी दारूः 1400 लि., रसायन : 19000 लि., एक प्लास्टिक बोट, एकूण मु‌द्देमालः १० लाख १ हजार ८६० रु.    दक्षतेचे आदेश – आगामी डिसेंबर महिना व नव वर्षाच्या पार्श्वभूमीवर आरोग्याला धोका निर्माण होऊ नये म्हणून राज्य उत्पादन शुल्क विभाग सक्रीय असून अवैध व्यवसाय करणाऱ्या इसमांची धरपकड करण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येत आहे.     नागरिकांना आवाहनः नागरिकांना अवैध मद्य विक्री, निर्मिती किंवा वाहतुकीबाबत तक्रार करण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाचे मुख्य हेल्पलाइन क्रमांक टोल फ्री क्र.१८००-८३३-३३३३/१८००-२३३-९९९९,Whats app क्र. ८४२२००११३३, आहेत, असे राज्य उत्पादन शुल्क

0000

संबंधित पोस्ट

अवैध व्यवसायांविरुद्ध गडचिरोली पोलिसांची मोठी कारवाई!

ऑपरेशन रेजपिल एनसीबीने आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ तस्करीचे मोठे जाळे केले उद्ध्वस्त; भारतामध्ये पहिल्यांदाच, पश्चिम आशियात वापरल्या जाणाऱ्या ‘कॅप्टागॉन’ या सायकोट्रॉपिक पदार्थाची जप्तीची कारवाई

गडचिरोली पोलीसांनी केला अवैध दारु व चारचाकी वाहनासह एकूण 8,24,000/- रुपयांचा मुद्देमाल जप्त

पतीने पत्नीला धावत्या लोकलसमोर ढकलले; मुंबईतील मुलुंड रेल्वे स्टेशनवर गंभीर प्रकार

शिवाजीनगर पोलिसांची मोठी कारवाई! हत्या करण्याचा प्रयत्न आणि लुटमारीच्या प्रकरणात ३ आरोपी अटकेत, २ अल्पवयीन मुलांवर कारवाई!

vishwatmaklokswamivarta

नालासोपाऱ्यात महिलांवरील अत्याचाराचे गंभीर प्रकरण उघड ! १५० हून अधिक अश्लील व्हिडिओ परदेशात विकले ?

vishwatmaklokswamivarta