vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

दि. 26 नोव्हेंबर 2026 रोजी “जिल्हास्तरीय युवा महोत्सवाचे” आयोजन‘नशामुक्त युवा फॉर विकसित भारत संकल्पनेवर आधारित विविध स्पर्धा,15 ते 29 वयोगटातील युवक-युवतींना सहभागाची संधी….

दि. 26 नोव्हेंबर 2026 रोजी “जिल्हास्तरीय युवा महोत्सवाचे” आयोजन‘नशामुक्त युवा फॉर विकसित भारत संकल्पनेवर आधारित विविध स्पर्धा,15 ते 29 वयोगटातील युवक-युवतींना सहभागाची संधी….

बुलढाणा प्रतिनिधी-युवकांच्या कलागुणांना वाव देण्यासह भारतीय संस्कृती व परंपरांचे जतन आणि राष्ट्रीय एकात्मतेला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने जिल्हास्तरीय युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, बुलढाणा आणि मेरा युवा भारत कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार, दि. 26 नोव्हेंबर २०२६ रोजी जिल्हा क्रीडा संकुल, बुलढाणा येथील बॅडमिंटन हॉलमध्ये हा महोत्सव आयोजित करण्यात येणार आहे. यावर्षी नशामुक्त युवा फॉर विकसित भारत ही महोत्सवाची संकल्पना असून, त्याअंतर्गत विविध स्पर्धा घेण्यात येणार आहेत.

युवा कार्यक्रम व खेळ मंत्रालय, भारत सरकार यांच्या वतीने दरवर्षी राष्ट्रीय युवा महोत्सवाचे आयोजन केले जाते. जानेवारी २०२७ मध्ये दिल्ली येथे राष्ट्रीय युवा महोत्सव होणार असून, त्या अनुषंगाने जिल्हास्तरीय युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

या महोत्सवात समूह लोकनृत्य, समूह लोकगीत, पथनाट्य, चित्रकला आणि कविता लेखन अशा विविध स्पर्धांचा समावेश आहे. या स्पर्धांमधून युवक-युवतींना आपल्यातील कलागुण सादर करण्याची संधी मिळणार असून, विजेत्या स्पर्धकांना रोख पारितोषिके देऊन गौरविण्यात येणार आहे.या महोत्सवात १५ ते २९ वर्षे वयोगटातील युवक-युवतींना सहभागी होता येणार आहे. इच्छुक स्पर्धकांनी आपल्या संस्थेच्या लेटर हेडवर आपली प्रवेश नोंदणी ईमेल आयडी dsobld@gamil.comकरावी. तसेच स्पर्धेसाठीच्या प्रवेशिका क्रीडा मार्गदर्शक श्रीमती उज्वला लांडगे मोनं.9764732764 यांच्याकडे जमा कराव्यात.

जिल्ह्यातील जास्तीत जास्त युवक-युवतींनी या महोत्सवात सहभागी होऊन आपल्या कलागुणांना वाव द्यावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी श्रीमती भक्ती आंब्रे आणि मेरा युवा भारतच्या समन्वयक दीक्षा पोयाम यांनी केले आहे.

 0000

संबंधित पोस्ट

३६५ निक्षय गीत मैफिलींचा यशस्वी टप्पा सांगीतिक उपक्रमातून क्षयरुग्णांना पोषणाची साथ

गोदा ते नर्मदा या पुण्यश्लोक अहिल्यादेवी जलयात्रा २०२६ उपक्रमाचा शुभारंभ त्र्यंबकेश्वर आणि चोंडी येथून होणार-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जयंती निमित्त आयोजन

चंद्रपूर जिल्ह्यात कोळंबी पालन व्यवसायाला चालना देणार – मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे

जागतिक आदिवासी दिन विशेष..जंगलाच्या कुशीतून आकाशाकडे आदिवासी विद्यार्थ्यांची झेप…गडचिरोलीच्या आदिवासी विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना नवे पंख-राष्ट्रपती भवन, संसद ते आयआयटी-विज्ञान केंद्र; शैक्षणिक अभ्यास दौऱ्यांतून दुर्गम आदिवासी भागातील विद्यार्थ्यांसमोर खुली होताहेत नव्या संधींची क्षितिजे*

माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव’ योजनेस मंत्रिमंडळाची मान्यता लोकसहभागातून आरोग्यदायी महाराष्ट्र घडविण्याचा निर्धार

vishwatmaklokswamivarta

🚀 लातूर जिल्ह्यातील पर्यटन क्षेत्रातील उद्योजक आणि नवउद्योजकांसाठी सुवर्णसंधी! 🚀