नवी मुंबईतील सानपाडा सेक्टर १८ मधील सप्तशृंगी ऑइल कंपनीला काल रात्री लागलेली भीषण आग आज सकाळी आटोक्यात आली.
नवी मुंबई प्रतिनिधी-नवी मुंबईतील सानपाडा सेक्टर १८ मधील सप्तशृंगी ऑइल कंपनीला काल रात्री लागलेली भीषण आग आज सकाळी आटोक्यात आली.
आग विझवण्यासाठी नवी मुंबई, पनवेल आणि कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या सुमारे २० गाड्या दाखल झाल्या होत्या. या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसून, घटनास्थळी कुलिंग ऑपरेशन सुरू आहे.