
मुंबईतील पवई तलावाच्या गणेश घाटावर उभारण्यात आलेल्या अत्याधुनिक ‘लाईट, साउंड आणि म्युझिकल फाउंटन शो’चे उद्घाटन मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या हस्ते संपन्न
मुंबई प्रतिनिधी-मुंबईतील पवई तलावाच्या गणेश घाटावर उभारण्यात आलेल्या अत्याधुनिक ‘लाईट, साउंड आणि म्युझिकल फाउंटन शो’चे उद्घाटन मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या हस्ते झाले.
सुमारे १८० मीटर लांबीच्या या फाउंटन शोमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पराक्रम, मराठ्यांचा इतिहास, महाराष्ट्राची संतपरंपरा आणि मुंबईची गौरवगाथा आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे सादर केली जाणार आहे.



