
राज्यातील ऊसतोड मजुरांच्या बालकांची विशेष आरोग्य तपासणी करण्याचे आरोग्य राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांचे निर्देश.
राज्य- प्रतिनिधी राज्यातील ऊसतोड मजुरांच्या बालकांची विशेष आरोग्य तपासणी करण्याचे आरोग्य राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांचे निर्देश.
आहेत. यासाठी आरोग्य विभागाच्या वतीने ‘बालसंजीवनी’ हे विशेष अभियान राबवण्यात येणार आहे. या अभियानांतर्गत साखर कारखाना परिसर आणि ऊसतोडीच्या शेतांमध्ये जाऊन बालकांना आरोग्य सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.
राज्यातील विविध साखर कारखान्यांचे गाळप हंगाम सुरू झाले असून, ऊसतोड मजूर कुटुंबांसह कामासाठी बाहेर पडले आहेत. त्यांच्यासोबत मोठ्या संख्येने अल्पवयीन बालकंही असतात. या बालकांना त्यांच्या तात्पुरत्या वास्तवाच्या ठिकाणी आवश्यक आरोग्य सुविधा मिळाव्यात, या उद्देशाने हे अभियान राबवण्यात येत आहे.



