vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

विकासक याच्याकडून १५ वर्षे यापेक्षा जास्त कालावधी उलटून गेला असून हक्काचे घर मिळाला नाही. म्हणून व श्रीकृष्ण सहकारी गृहनिर्माण संस्था, पांचपाखाडी, ठाणे येथील झोपडीधारकांना अद्याप घरे न मिळाल्याने व प्राधिकरणाच्या ‘इतिवृत्तात’ नमूद केल्याप्रमाणे आजतागायत कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने शासकीय विश्रामगृह, जिल्हाधिकारी कार्यालय, ठाणे शेजारी ‘संविधानिक मार्गाने बेमुदत धरणे आंदोलन

विकासक याच्याकडून १५ वर्षे यापेक्षा जास्त कालावधी उलटून गेला असून हक्काचे घर मिळाला नाही. म्हणून व श्रीकृष्ण सहकारी गृहनिर्माण संस्था, पांचपाखाडी, ठाणे येथील झोपडीधारकांना अद्याप घरे न मिळाल्याने व प्राधिकरणाच्या ‘इतिवृत्तात’ नमूद केल्याप्रमाणे आजतागायत कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने शासकीय विश्रामगृह, जिल्हाधिकारी कार्यालय, ठाणे शेजारी ‘संविधानिक मार्गाने बेमुदत धरणे आंदोलन

ठाणे प्रतिनिधी- श्रीकृष्ण सहकारी गृहनिर्माण संस्था, सर्व्हे क्र. ५०९ व ५१० (पैकी), मौजे पांचपाखाडी, पोखरण रोड नं. २, ठाणे (प.) येथील स्थानिक झोपडी धारक आपणास सविनय कळवू इच्छितो की;आमच्या झोपडपट्टी पुनर्वसन (SRA) प्रकल्पांतर्गत विकासका ने आणि प्रशासनाने आजतागायत आम्हा मूळ झोपडी धारकांना हक्काची घरे दिलेली नाहीत. या संदर्भात मा. लोकप्रतिनिधी व SRA अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत दि. २७ जुलै २०२६ रोजी एक महत्त्वाची बैठक पार पडली होती.

सदर बैठकीचे अधिकृत इतिवृत्त दि. २९ जुलै २०२६ रोजी काढण्यात आले (या अर्जासोबत जोडली आहे). या इतिवृत्ता मध्ये विकासकाला (मे. जयकाली डेव्हलपर्स) थकीत घरभाडे देणे, बोगस झोपडी धारकां ची चौकशी करणे आणि रखडलेले बांधकाम सुरू करणे याबाबत लेखी व स्पष्ट निर्देश देण्यात आले होते.परंतु, अत्यंत संतापाची व खेदाची बाब म्हणजे, या ‘इतिवृत्तात’ नमूद केलेल्या निर्देशां नुसार आजच्या तारखे पर्यंत विकासक किंवा प्रशासना कडून कोणती ही योग्य कारवाई झालेली नाही.

आजतागायत आम्हाला आमचे हक्काचे घर मिळालेले नाही, थकीत भाडे संपूर्ण मिळालेले नाही आणि आमचे प्रश्न तसेच प्रलंबित आहेत. प्रशासना कडून व विकासका कडून सातत्याने होणाऱ्या या अन्यायाच्या व फसवणुकीच्या निषेधार्थ, आम्ही सर्व झोपडीधारक एकत्र येऊन आमच्या हक्काच्या घरां साठी व न्यायासाठी पूर्णपणे संविधानिक आणि शांततापूर्ण मार्गाने बेमुदत आंदोलन करणार आहोत.आंदोलनाचा तपशील खालीलप्रमाणे:आंदोलनाचे तारीख : १४/१२/२०२६आंदोलनाचे स्थळः शासकीय विश्रामगृह, जिल्हाधिकारी कार्यालयआंदोलनाचे स्थळः शासकीय विश्रामगृह, जिल्हाधिकारी कार्यालय, ठाणे यांच्या शेजारी.आंदोलनाचे स्वरूपः भारतीय संविधानाने दिलेल्या अधिकारानुसार शांततापूर्ण मार्गाने बेमुदत ठिय्या/धरणे आंदोलन.सदर प्रश्नाचे गांभीर्य लक्षात घेऊन आम्ही हे प्रकरण आगामी हिवाळी अधिवेशनात मांडणार आहोत. जोपर्यंत आम्हाला आमची हक्काची घरे प्रत्यक्ष

मिळत नाहीत आणि इतिवृत्तात दिलेल्या आदेशांची अंमलबजावणी होत नाही, तोपर्यंत आमचा लढा सुरूच राहील. या अन्यायाची माहिती महाराष्ट्रातील सर्व संबंधित वरिष्ठ पातळीवर, मा. मुख्यमंत्री, मंत्रिमंडळ आणि सर्व आमदारांना देण्यात येत आहे.

तरी, सदर पत्राद्वारे आम्ही प्रशासनाला व पोलीस विभागाला आमच्या बेमुदत आंदोलनाची पूर्व सूचना देत आहोत. आमच्या शांततापूर्ण आंदोलनास रीतसर परवानगी व आवश्यक पोलीस संरक्षण द्यावे, ही नम्र विनंती. तसेच, जिल्हा प्रशासनाने यात तातडीने लक्ष घालून आम्हाला न्याय मिळवून द्यावा.सोबत: दि. २९ जुलै २०२६ रोजीच्या प्राधिकरणाच्या (SRA) इतिवृत्ताची प्रतप्रत माहितीस्तव व हिवाळी अधिवेशनात लक्ष वेधण्यासाठीः-१. मा. मुख्यमंत्री महोदय व संपूर्ण मंत्रिमंडळ, महाराष्ट्र राज्य.२. मा. विधानसभा अध्यक्ष, महाराष्ट्र विधानसभा.३. मा. सर्व विधानसभा सदस्य (आमदार), महाराष्ट्र राज्य.

संबंधित पोस्ट

आर. जी. राजन यांच्या ‘मॅनेजमेंट म्युझिंग्स’ पुस्तकाचे प्रकाशन

vishwatmaklokswamivarta

पेट्रोल-डिझेल व गॅस पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे; नागरिकांनी संयम पाळून अफवांपासून दूर राहावे : कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन

जागतिक कीर्तीचे व्यंगचित्रकार आदरणीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती उत्सवानिमित्त माझी मुंबई या संकल्पनेवर आधारित, महापौर आयोजित बाल चित्रकला स्पर्धा सन २०२५-२६ आज मुंबईत ५१ ठिकाणी पार पडली.

भाजपा जालना महानगरात “मन की बात” कार्यक्रमाला कार्यकर्त्यांचा मोठा सहभाग पंतप्रधान मोदीजींच्या प्रेरणादायी विचारांनी कार्यकर्त्यांना नवचेतना – जिल्हाध्यक्ष भास्कर आबा दानवे

ऑटो रिक्षा व टॅक्सी नवीन परवान्यांच्या इरादापत्रांचे वितरण स्थगित

बलिदानाचा इतिहास पुढील पिढीपर्यंत पोहोचवू” -राज्य मंत्री माधुरी मिसाळ“हिंद दी चादर” कार्यक्रमाच्या पूर्वतयारीचा आढावा“नगारा फतेह दा” या चित्रगीताचे प्रकाशन…