vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

विमा कंपन्यांनी नुकसान भरपाई तत्काळ वितरित करावी – कृषी मंत्री दत्तात्रय भरणे खरीप २०२५ हंगामातील पीक विमा निश्चितीसंदर्भात मंत्रालयात बैठक

विमा कंपन्यांनी नुकसान भरपाई तत्काळ वितरित करावी – कृषी मंत्री दत्तात्रय भरणेखरीप २०२५ हंगामातील पीक विमा निश्चितीसंदर्भात मंत्रालयात बैठक..

मुंबई, प्रतिनिधी: हंगामातील प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या अंमलबजावणीचा आढावा कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात घेण्यात आला.

या बैठकीत राज्यात भारतीय कृषी विमा कंपनी आणि आयसीआयसीआय लोम्बार्ड विमा कंपनीमार्फत योजना राबविण्यात येत असल्याची माहिती देण्यात आली. तसेच सोयाबीन, भात, उडीद, मूग, बाजरी आदी पिकांच्या पीक कापणी प्रयोगांची आकडेवारी आणि भात व सोयाबीनचे तांत्रिक उत्पादन केंद्र शासनाच्या विमा पोर्टलवर नोंदविण्यात आल्याचेही निदर्शनास आणून देण्यात आले.

कृषी मंत्री भरणे यांनी विमा कंपन्यांना स्पष्ट निर्देश देत सांगितले की, उपलब्ध आकडेवारीवर तत्काळ कार्यवाही करून नुकसान भरपाई निश्चित करावी आणि ती कोणताही विलंब न करता थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावी. याबाबत केंद्र शासनाकडे आवश्यक पाठपुरावा करण्याच्या सूचनाही त्यांनी संबंधितांना दिल्या.

शेतकऱ्यांना वेळेत न्याय मिळावा, यासाठी राज्य शासन कटिबद्ध असल्याचे कृषी मंत्री भरणे यांनी यावेळी नमूद केले.

या बैठकीत कृषी संचालक विनयकुमार आवटे, कृषी संचालक रफिक नाईकवाडी, उपसचिव प्रतिभा पाटील व विमा कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

०००

संबंधित पोस्ट

कर्मांचा न्याय अटळ; आत्मपरीक्षण व धर्माचरणातूनच मोक्षप्राप्ती : महासती श्री निर्मलाजी म.सा.

अपुऱ्या पावसामुळे सोमठाणा तलावातील मत्स्यउत्पादनात मोठी घट -मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे• नुकसानग्रस्त मच्छीमारांचे पंचनामे करून मदतीसाठी तातडीने कार्यवाही करण्याचेमंत्री नितेश राणे यांचे निर्देश• जालना जिल्ह्याच्या पालकमंत्री पंकजा मुंडे, आमदार नारायण कुचे यांची उपस्थिती

vishwatmaklokswamivarta

पर्यावरणविषयक मोहिमेची कृषी क्षेत्राशी सांगड घालावी – राज्यपाल आचार्य देवव्रत ‘माझी वसुंधरा’ राज्यस्तरीय पुरस्कारांचे वितरण

रुग्णवाहिका सेवेच्या गुणवत्ता मानकांसाठी ‘बीव्हीजी’च्या सहकार्याने देशातील पहिलाच मूल्यांकनकर्ता प्रशिक्षण कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न

पेट्रोलपंप चालक आणि वितरक कंपन्यांची संयुक्त बैठक-तात्काळ वितरण सुरळीत करा- जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

150 दिवसीय ई – गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमात नांदेड परिक्षेत्र अव्वल मा. मुख्यमंत्री यांच्या शुभहस्ते पोलीस उप महानिरीक्षक शहाजी उमाप यांचा सन्मान