vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

वेरूळ- घृष्णेश्वर विकास आराखड्याची कामे विहित मुदतीत पूर्ण करा- अपर मुख्य सचिव बी. वेणू गोपाल रेड्डी

वेरूळ- घृष्णेश्वर विकास आराखड्याची कामे विहित मुदतीत पूर्ण करा- अपर मुख्य सचिव बी. वेणू गोपाल रेड्डी

छत्रपती संभाजी नगर, प्रतिनिधी)- वेरूळ घृष्णेश्वर तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातील कामे विहित मुदतीत पूर्ण करा. या विकासात स्थानिकांच्या गरजांना प्राधान्य द्या. तसेच स्थानिक रहिवाशांचा सहभाग विकास प्रक्रियेत घ्यावा, असे निर्देश उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे अपर मुख्य सचिव बी वेणू गोपाल रेड्डी यांनी आज वेरूळ येथे दिले.

 श्रीक्षेत्र घृष्णेश्वर व वेरूळ तीर्थक्षेत्र विकास आराखड्या अंतर्गत सुरू असलेल्या प्रगतीपथावरील कामांची पाहणी आज श्री. रेड्डी यांनी केली. यावेळी त्यांचे समवेत जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित, पोलीस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड, जिल्हा नियोजन अधिकारी भारत वायाळ, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण चे कार्यकारी अभियंता दीपक कोळी, भारतीय पुरातत्व विभागाचे शिवकुमार भगत, उपविभागीय अधिकारी संतोष गोरड तसेच अन्य विभाग प्रमुख उपस्थित होते.

 यावेळी श्री रेड्डी यांनी सुरू असलेल्या विकास कामांची पाहणी केली. घृष्णेश्वर मंदिर परिसर दर्शनासाठी आलेल्या भाविकांसाठी मार्गिका, प्रगतीपथावर असलेले विश्रामगृह, सुविधा केंद्र आदी विविध कामांची पाहणी त्यांनी केली.

 त्यानंतर झालेल्या आढावा बैठकीत त्यांनी सूचना केल्या की, तीर्थक्षेत्र विकास सुविधांची कामे करताना स्थानिकांच्या गरजांना प्राधान्य दिले पाहिजे. तसेच त्यांच्या गरजांना प्राधान्य दिले गेले पाहिजे. स्थानिक कारागिरांनी तयार केलेली उत्पादने तसेच कलावस्तू यांच्या विक्रीसाठी जागा उपलब्ध करून द्यावी. या वस्तू व उत्पादने येणाऱ्या पर्यटकांना खरेदीसाठी उपलब्ध व्हाव्या. तसेच स्थानिक खाद्य संस्कृती, कला यांचेही सादरीकरण पर्यटकांना व्हावे. भाविकांसाठीचे पादचारी मार्ग, वाहनांचे पार्किंग तसेच शैक्षणिक सहलींचाही विचार या आराखड्यात करण्यात यावा. सौर ऊर्जेचा अधिकाधिक वापर करण्यात यावा अशा सूचना श्री. रेड्डी यांनी यावेळी केल्या. या बैठकीस भारतीय पुरातत्व विभाग सार्वजनिक बांधकाम विभाग पर्यटन विकास महामंडळ महाराष्ट्र जीवन प्राधिकरण वनविभाग अशा विविध विभागांचे अधिकारी सहभागी झाले होते.

संबंधित पोस्ट

मुंबई शहर जिल्ह्यात २९ सप्टेंबर रोजी पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार महाकुंभांतर्गत २० ठिकाणी मेळावे मुंबईतील जास्तीत जास्त उमेदवारांनी नावनोंदणी करावी

vishwatmaklokswamivarta

विधानसभा प्रश्नोत्तरे-राज्यातील सर्व नर्सिंग महाविद्यालयांसाठी प्रमाणित कार्यपद्धती (एसओपी) लागू करणार- सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर

आंदोलनकर्त्या युवक-युवतींशी दोन दिवस सकारात्मक चर्चा– आदिवासी मंत्री डॉ. अशोक उईके,वसतिगृह प्रवेशाबाबत आदिवासी विद्यार्थ्यांच्या हिताचा निर्णय…

शेतकऱ्यांची चिंता मिटली ; यंदाच्या हंगामापासून सहायकच नोंदविणार पीक पेरा-राज्यभरात येत्या 15 जुलै पासून मोहिमेस सुरवात शेतकऱ्यांनी सहायकांना सहकार्य करण्याचे आवाहन

गोसीखुर्दच्या मुख्यअभियंता पदी अजय दाभाडे यांची नियुक्ती

१४ वर्षांचा सामाजिक बहिष्कार अखेर मागे;अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या पाठपुराव्यामुळे मोरे कुटुंबीयांना न्याय.