vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशव्यवसाय

स्टॅंड अप इंडिया योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

स्टॅंड अप इंडिया योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

    सांगली, प्रतिनिधी : केंद्र शासनाच्या स्टॅंड अप इंडिया योजनेअंतर्गत अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांतील नवउद्योजकांना स्वावलंबी बनवण्यासाठी राज्य शासनामार्फत विशेष प्रोत्साहन दिले जात आहे. या योजनेच्या माध्यमातून पात्र लाभार्थ्यांना 15 टक्के मार्जिन मनी उपलब्ध करून दिला जात आहे. पात्र लाभार्थ्यांनी या योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन समाज कल्याण, सांगली चे सहाय्यक आयुक्त बाळासाहेब कामत यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे केले आहे.

            सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या दि. ८ मार्च २०१९ रोजीच्या शासन निर्णयान्वये केंद्र शासनाच्या स्टँड अप इंडिया योजनेत अनुसूचित जाती व नवबौध्द समाजाच्या घटाकांकरिता मार्जिन मनी उपलब्ध करून देण्याची योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. ज्या नवउद्योजकांनी राष्ट्रीयीकृत बँकांकडून स्टॅंड अप इंडिया योजनेअंतर्गत कर्ज मंजूर करून घेतले आहे, त्यांनी संबंधित बँकेचे शिफारस पत्र व आवश्यक कागदपत्रांसह सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, सांगली (जुना बुधगाव रोड, सांगली) येथे अर्ज सादर करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे. या योजनेबाबतच्या सविस्तर मार्गदर्शक सूचना व माहिती महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध असल्याचे प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे.

संबंधित पोस्ट

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाला आजपासून सुरुवात*नागरिकांनी सक्रीय सहभाग नोंदविण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

शिवशक्ती आश्रम येथे भव्य नेत्र तपासणी शिबीर संपन्न

vishwatmaklokswamivarta

भारतीय डाक ग्रामीण सेवक पदासाठी 3 मार्च पर्यंतऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

♦️ बिहार विधानसभा निवडणुकीत रालोआचा २०० चा आकडा पार करत, ऐतिहासिक विजय

vishwatmaklokswamivarta

एज्युसिटी व मेडिसिटीच्या माध्यमातून जागतिक दर्जाच्या उच्चशिक्षण संधी – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे एज्युसिटी व मेडिसिटी संदर्भात आढावा बैठक

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षाआता 28 सप्टेंबर ऐवजी 9 नोव्हेंबरला- प्रशिक्षण वर्ग पुढे ढकलले

vishwatmaklokswamivarta