vishwatmaklokswamivarta
Breaking News
आरोग्य

अंजूर येथे गरोदर व स्तनदा मातां ना पोषण किटचे वाटप

अंजूर येथे गरोदर व स्तनदा मातां ना पोषण किटचे वाटप NHSRCL व परिमार्जन फाउंडेशनच्या सहकार्याने पोषणविषयक उपक्रम.

 

ठाणे, प्रतिनिधी(जिल्हा परिषद, ठाणे) : एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प भिवंडी-१ अंतर्गत दिवा-अंजूर बीटमधील ग्रामपंचायत अंजूर येथे गरोदर व स्तनदा मातांना NHSRCL (National High Speed Rail Corporation Limited) आणि परिमार्जन फाउंडेशन यांच्या सहकार्याने पोषण किटचे वाटप करण्यात आले. दि. १७ नोव्हेंबर, २०२६ रोजी माता व बालकांच्या पोषणाची काळजी घेण्याबरोबरच मातांना पोषणविषयक मार्गदर्शन मिळावे, या उद्देशाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.

या कार्यक्रमास NHSRCLचे व्यवस्थापकीय संचालक अंजुम परवेज, दीपक रॉय, PCPM/Vasai, यू.पी. सिंग, PCPM/Mumbai, बाल विकास प्रकल्प अधिकारी रोहित जाधव, तसेच CDPO विभागाच्या पर्यवेक्षिका श्रीम. कुऱ्हाडे उपस्थित होत्या.तसेच परिमार्जन फाउंडेशनचे सचिव गजानन प्रसाद, आसिफ आझमी, Assistant General Secretary, Parimarjan Foundation आणि राजीव कुलश्रेष्ठ, AVP यांच्यासह संस्थेचे इतर सहकारी उपस्थित होते. ग्रामपंचायत अंजूर परिसरातील गरोदर व स्तनदा मातांनीही या उपक्रमास मोठ्या संख्येने उपस्थिती लावली.

कार्यक्रमादरम्यान उपस्थित मातांना पोषणाचे महत्त्व, गर्भावस्थेतील तसेच प्रसूतीनंतरच्या काळातील आहार आणि माता व बालकांच्या आरोग्याची आवश्यक काळजी याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. गरोदरपणापासूनच मातांचे पोषण योग्य राहणे आणि स्तनदा मातांना आवश्यक आहार मिळणे हे माता व बालकांच्या आरोग्यासाठी महत्त्वाचे असल्याने अशा उपक्रमांतून पोषणाबाबत जनजागृती करण्यास मदत होत आहे.शासकीय यंत्रणा, ग्रामपंचायत, सामाजिक संस्था आणि कॉर्पोरेट क्षेत्र यांच्या समन्वयातून माता व बालकांच्या पोषणासाठी राबविण्यात येणारे उपक्रम अधिक प्रभावी ठरत आहेत. अशा सहकार्यामुळे ग्रामीण भागातील गरजू लाभार्थ्यांपर्यंत आवश्यक पोषणविषयक मदत व मार्गदर्शन पोहोचविण्यास हातभार लागत आहे.

या उपक्रमास ग्रामस्थ व महिलावर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मान. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद ठाणे श्री.रणजित यादव यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प भिवंडी-१ अंतर्गत अधिकारी, कर्मचारी तसेच संबंधित संस्थांच्या प्रतिनिधींनी सहकार्य केले.

०००

 

संबंधित पोस्ट

समाजकल्याण विभाग वंचितांच्या उन्नतीसाठी कटिबद्ध – अपर जिल्हाधिकारी रेश्मा माळीसामाजिक समता सप्ताहानिमित्त विविध उपक्रम : ज्येष्ठ नागरिक कार्यशाळा, आरोग्य व रक्तदान शिबिरांना उत्स्फूर्त प्रतिसाद

अहिल्यानगर येथे ४३० खाटांच्या शासकीय रुग्णालयासाठी ९८१ पदनिर्मितीस राज्य शासनाची मान्यता.ग्रामीण भागातील नागरिकांना दर्जेदार आरोग्यसेवा उपलब्ध होणारआरोग्यसेवेचा आणि त्या अनुषंगाने स्थानिक रोजगार संधीचा विस्तार…सभापती प्रा राम शिंदे यांचा सातत्यपूर्ण पाठपुरावा यशस्वी…

vishwatmaklokswamivarta

पिंपळगाव देवी येथे सर्वसमावेशक प्राथमिक आरोग्य सेवेवर दोन दिवसीय कार्यशाळा‘माझे गाव, आरोग्य संपन्न गाव’ अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आरोग्य विभागाचा पुढाकार

ठाणे जिल्ह्यातील सर्व आरोग्य संस्था व वैद्यकीय व्यावसायिकांनी ABDM अंतर्गत HFR व HPR नोंदणी करण्याचे आवाहन,डिजिटल आरोग्य व्यवस्थेला बळकटी देण्यासाठी आरोग्य संस्था व वैद्यकीय व्यावसायिकांची राष्ट्रीय स्तरावरील नोंदणी आवश्यक

राष्ट्रीय गुणवत्ता आश्वासन कार्यक्रम व ‘मिशन महाग्राम’चा आढावाआरोग्य संस्थांमध्ये गुणवत्ता मानकांची प्रभावी अंमलबजावणी करा -अपर जिल्हाधिकारी संभाजीराव अडकुणे

vishwatmaklokswamivarta

सेवा संकल्प अभियानांतर्गत कवठेमहांकाळ येथे 7 ऑक्टोबर रोजी रक्तदान शिबिर