vishwatmaklokswamivarta
Breaking News
खेळ प्रतिनिधी

मवेशी येथे आदिवासी क्रीडा स्पर्धांचे आयोजन-आदिवासी खेळाडूंना करिअरची सुवर्णसंधी

मवेशी येथे आदिवासी क्रीडा स्पर्धांचे आयोजन-आदिवासी खेळाडूंना करिअरची सुवर्णसंधी

खेळ प्रतिनिधी-एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, राजूर ता.अकोले, यांच्या अंतर्गत येणाऱ्या शासकीय व अनुदानित आश्रमशाळांतील विद्यार्थ्यांसाठी ‘प्रकल्प स्तरीय क्रीडा स्पर्धा-२०२६’ चे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धा दि. २६ नोव्हेंबर ते २८ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत शैक्षणिक संकुल मवेशी ता. अकोले येथे होणार असल्याची माहिती प्रकल्प अधिकारी श्रीमती देवकन्या बोकडे यांनी दिली .१,०९४ गुणवंत खेळाडूंची निवड आणि वाहतूक व्यवस्थाप्रकल्प कार्यालयांतर्गत केळीरुम्हणवाडी, मवेशी, अकलापूर आणि केळीकोतूळ येथे केंद्रस्तर क्रीडा स्पर्धा यशस्वीरित्या संपन्न झाल्या. यामधून २१ शासकीय आणि १८ अनुदानित आश्रमशाळांतील ५१० मुले व ५८४ मुली अशा एकूण १,०९४ गुणवंत खेळाडूंची प्रकल्प स्तरीय स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे. या सर्व खेळाडूंना आश्रमशाळेतून स्पर्धेच्या ठिकाणी ने-आण करण्यासाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) २५ बसेसची स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे.

स्पर्धेतील विविध क्रीडा प्रकार,या तीन दिवसीय स्पर्धेत सांघिक आणि वैयक्तिक क्रीडा प्रकारांचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये कबड्डी, खो-खो, व्हॉलीबॉल, हँडबॉल, रिले, लांब उडी, उंच उडी, गोळाफेक, भालाफेक आणि विविध ॲथलेटिक्स प्रकारांत खेळाडू आपले कौशल्य प्रदर्शित करतील.स्पर्धा सुरळीत व यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी प्रकल्प स्तरावर विविध समित्या गठीत करण्यात आल्या आहेत. यामध्ये मुख्य क्रीडा समिती, स्वागत व व्यासपीठ समिती, सांस्कृतिक व बक्षीस वितरण समिती, मुले व मुलींसाठी स्वतंत्र भोजन व निवास समिती, आरोग्य समिती, मैदान व्यवस्थापन, वाहतूक आणि तक्रार निवारण आदी समित्यांचा समावेश आहे. प्रकल्प कार्यालयातील अधिकारी-कर्मचारी, सर्व आश्रमशाळांचे मुख्याध्यापक, अधीक्षक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी स्पर्धेच्या यशस्वितेसाठी परिश्रम घेत आहेत.

खेळाडूंना करिअरची सुवर्णसंधी,प्रकल्प स्तरीय स्पर्धेतून निवड झालेले खेळाडू पुढे विभागीय आणि त्यानंतर राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेत प्रकल्पाचे प्रतिनिधित्व करतील. राज्यस्तरीय स्पर्धेत यश मिळवणाऱ्या गुणवंत खेळाडूंना शैक्षणिक वाढीव गुण तसेच शासकीय नोकरीत ५ टक्के आरक्षणाचा लाभ मिळणार असल्याने या स्पर्धांना विशेष महत्त्व आहे.

संबंधित पोस्ट

रायगड जिल्हास्तरीय युवा महोत्सवाचे आयोजन जास्तीत जास्त युवक-युवतींनी सहभागी व्हावे

vishwatmaklokswamivarta

मिशन लक्षवेध’ अंतर्गत जिल्हास्तर प्रतिभा विकास केंद्रासाठी निवड चाचणी खेळाडूंनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे – जिल्हा क्रीडा अधिकारी ज्ञानेश्वर खुरंगे

१३.५९ सेकंदांचा थरार आणि तिरंग्याची शान!शौर्या अंबुरेची युथ ऑलिम्पिकमध्ये ऐतिहासिक कामगिरी

vishwatmaklokswamivarta

सलग तीन राष्ट्रीय स्पर्धांमध्ये दोहद कसाळेची विजयी भरारी; दुहेरी विजेतेपदांसह उपविजेतेपदेही पटकावली

जालना जिल्हा शाईन कराटे-डुच्या विद्यार्थ्यांनी गाठली यशाची नवी पायरी,कराटे बेल्ट व प्रमाणपत्र वितरण सोहळा उत्साहात; विविध गटांतील यशस्वी विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव

ITTF जागतिक युवा अजिंक्यपद स्पर्धेत भारताचं पहिलं पदक निश्चित!

vishwatmaklokswamivarta