vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

गडचिरोली जिल्ह्यातील मुलींसाठी मोफत निवासी वैमानिक प्रशिक्षणाची संधी**जिल्हा परिषदेचा पुढाकार; १ डिसेंबर रोजी मार्गदर्शन कार्यक्रम**इच्छुक मुलींनी प्रशिक्षणाच्या संधीचा लाभ घ्यावा – सुहास गाडे*

*गडचिरोली जिल्ह्यातील मुलींसाठी मोफत निवासी वैमानिक प्रशिक्षणाची संधी**जिल्हा परिषदेचा पुढाकार; १ डिसेंबर रोजी मार्गदर्शन कार्यक्रम**इच्छुक मुलींनी प्रशिक्षणाच्या संधीचा लाभ घ्यावा – सुहास गाडे*

 

गडचिरोली, प्रतिनिधी : जिल्ह्यातील मुलींना विमान वाहतूक क्षेत्रात करिअरची संधी उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा परिषद, गडचिरोलीच्या पुढाकाराने इंडिगो (IndiGo) आणि इंडिगोरीच (IndiGoReach) यांच्या सामाजिक उत्तरदायित्व (CSR) उपक्रमांतर्गत १०० टक्के मोफत निवासी वैमानिक प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. या उपक्रमासंदर्भात मंगळवार, दि. १ डिसेंबर २०२६ रोजी सकाळी ११.३० वाजता समाज कल्याण भवन, गडचिरोली येथे माहिती व मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

जिल्ह्यातील ग्रामीण व दुर्गम भागातील गुणवंत मुलींना विमान वाहतूक क्षेत्रात करिअर घडविण्याची संधी उपलब्ध करून देणे आणि त्यांना वैमानिक प्रशिक्षणासाठी प्रोत्साहित करणे, हा या उपक्रमाचा उद्देश आहे.

या प्रशिक्षणासाठी उमेदवारांनी इयत्ता बारावी विज्ञान शाखेत भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित (PCM) या विषयांसह किमान ५१ टक्के गुण प्राप्त केलेले असावेत. उमेदवारांची वयोमर्यादा १८ ते ३५ वर्षे असून प्रशिक्षण पूर्णतः मोफत व निवासी स्वरूपाचे असणार आहे.मार्गदर्शन कार्यक्रमात वैमानिक प्रशिक्षण आणि विमान वाहतूक क्षेत्रातील करिअरच्या संधींबाबत सविस्तर माहिती देण्यात येणार आहे.

जिल्ह्यातील जास्तीत जास्त पात्र व इच्छुक मुलींनी या मार्गदर्शन कार्यक्रमास उपस्थित राहून प्रशिक्षणाच्या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे यांनी केले आहे.

000

संबंधित पोस्ट

विकासाच्या बाबतीत महाराष्ट्र देशासाठी आदर्श निर्माण करेल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रशासकीय क्षमता वाढवून योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीवर भर

vishwatmaklokswamivarta

शीव (सायन) येथील लोकमान्य टिळक महानगरपालिका सर्वसाधारण रुग्णालय पुनर्विकास टप्पा दोनच्या रुग्णालय इमारतीचे भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते संपन्न

डॉ. मीरा ढास यांनी स्वीकारला शिर्डी येथील माहिती अधिकारी पदाचा कार्यभार

एल निनो’चा ठाणेकरांना फटका बसणार! 20 टक्के पाणीकपात लागू, गुरुवारी मानपाडा, दिवा, कळव्यामध्ये पाणी नाही

कृषि तंत्र पदविका अभ्यासक्रम ग्रामीण-शहरी भागातील विद्यार्थ्यांसाठी सुवर्ण संधी,ऑनलाईन अर्ज भरण्यास 10 जून पर्यंत मुदत

शाळांच्या परिसरात अपायकारक अन्नपदार्थ व कॅफिनयुक्त पेयांची विक्री करणाऱ्यांवर कारवाई – मंत्री नरहरी झिरवाळ