
भारतीय संविधान दिनानिमित्त गुरूवारी ग्रंथप्रदर्शन, व्याख्यानाचे आयोजन
सांगली, प्रतिनिधी: ‘भारतीय संविधान दिनानिमित्त जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयातर्फे गुरूवार, दि. 26 नोव्हेंबर रोजी ग्रंथप्रदर्शन व व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले असून, या कार्यक्रमाचा लाभ नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन जिल्हा ग्रंथालय अधिकारी अमित सोनवणे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे. ‘भारतीय संविधान दिनानिमित्त ‘दिवाळी अंक २०२६ आणि भारतीय संविधानाशी संबंधित ग्रंथांच्या प्रदर्शनाचे उद्घाटन जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष यांच्याहस्ते सकाळी 10.30 वाजता होणार आहे. यावेळी जिल्हा माहिती अधिकारी संप्रदा बीडकर आणि सहाय्यक शिक्षक विठ्ठल मोहिते यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, पद्मभूषण कै. वसंतदादा पाटील स्मारक, सांगली येथे हे प्रदर्शन दि. 26 नोव्हेंबर ते 10 डिसेंबर या कालावधीत सुरू राहणार आहे.
00000



