vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

संविधान दिनानिमित्त नमुंमपा मुख्यालयात उद्देशिकेचे सामुहिक वाचन ,26/11 च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेले पोलीस अधिकारी, जवान व निरपराध नागरिकांना श्रद्धांजली

संविधान दिनानिमित्त नमुंमपा मुख्यालयात उद्देशिकेचे सामुहिक वाचन ,26/11 च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेले पोलीस अधिकारी, जवान व निरपराध नागरिकांना श्रद्धांजली

नवी मुंबई प्रतिनिधी  संविधान दिनाचे औचित्य साधून नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालयात ॲम्फिथिएटर येथे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस महापौर श्रीम.सुजाता पाटील यांच्या शुभहस्ते पुष्पमालिका अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. तसेच संविधानाच्या उद्देशिकेचे महापौर महोदयांसमवेत सामुहिक वाचन करण्यात आले.

          याप्रसंगी प्रशासन विभागाचे उपआयुक्त श्री.भागवत डोईफोडे, मुख्य लेखा परीक्षक श्री. राजेंद्र गाडे, उपआयुक्त श्री.सुखदेव येडवे, मुख्य विधी अधिकारी श्री.अभय जाधव, शिक्षणाधिकारी श्री. अशोक कडुस व इतर अधिकारी, कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते.

          26 नोव्हेंबर 1949 रोजी संविधान स्विकृत करुन 26 जानेवारी 1950 पासून संविधानाची अंमलबजावणी सुरु झाली. संविधानाचे महत्त्व अनेक स्तरांवर असून भारतीय संविधानात समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही गणराज्य घडविण्याचा व नागरिकांना सामाजिक, आर्थिक आणि राजनैतिक न्याय, विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रध्दा व उपासना यांचे स्वातंत्र्य, तसेच दर्जा व संधीची समानता प्राप्त करुन देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता व एकात्मता, बंधुता या मूल्यांचा विचार केलेला आहे. देशाच्या विकासात आणि नागरिकांच्या जीवनाच्या गुणवत्तेत संविधान महत्वपूर्ण भूमिका बजावते. त्या अनुषंगाने आज संविधान दिनानिमित्त संविधानाच्या उद्देशिकेचे महापौर श्रीम. सुजाता पाटील यांचे समवेत अधिकारी, कर्मचारीवृंदाने सामुहिक वाचन केले.

          यावेळी 26 /11/ 2008 च्या मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेले पोलीस अधिकारी, कर्मचारी, भारतीय सैन्यदलातील जवान, निरपराध नागरिक यांना भावपूर्ण श्रध्दांजली अर्पण करण्यात आली.

          आज संविधान दिनानिमित्त महानगरपालिकेच्या शाळांमध्येही संविधानाच्या उद्देशिकेचे सामुहिक वाचन करण्यात आले, तसेच विविध उपक्रम राबविण्यात आले. भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षापासून नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने ‘घरोघरी संविधान’ उपक्रम सर्वत्र उत्साहात राबविण्यात येत असून त्याला नागरिकांचा चांगला प्रतिसाद लाभला आहे.

संबंधित पोस्ट

जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेची बैठक संपन्न

ऑनलाईन बुकिंग पोर्टल्सवर शहरांची नावे अद्ययावत करणे आणि प्रतिबंधित नायलॉन मांजा वाहतूक बंदीबाबत विशेष बैठकीचे आयोजन

पुढील ३ तासात मुंबई शहर, मुंबई उपनगर, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि ठाणे या जिल्ह्यात काही ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तरी नागरिकांनी सतर्क राहावे. मंत्रालय, मुंबई.

जनसेवेसाठी तत्पर लोकनेता, सहृदय मित्र गमावला : आ सुधीर मुनगंटीवार यांची शोकभावना

vishwatmaklokswamivarta

आरोग्यविषयक सर्व माहिती आभा कार्डद्वारे डिजिटल स्वरुपात – आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर

महाडमध्ये साहित्याचा जागर: दोन दिवसीय ‘रायगड जिल्हा ग्रंथोत्सव २०२६’ उत्साहात संपन्न होणार*