‘एक दिवस कायस्थांचा’ कार्यक्रमात राष्ट्रपती पदक विजेते पोलीस अधिकारी आशिष राजे व जेष्ठ समाजसेवक अशोक कुलकर्णी ह्यांचा सन्मान
ठाणे: प्रतिनिधी प्रतिनिधी
शनिवार दिनांक २८ नोव्हेंबर रोजी कार्ला येथील एकवीरा गडावर होणाऱ्या एकदिवस कायस्थांच्या समारोहात मुंबई पोलीस दलातील राष्ट्रपती पदक विजेते पोलीस निरीक्षक श्री.आशिष राजे व जेष्ठ समाज कार्यकर्ते अशोक कुळकर्णी ह्यांचा गौरव होणार आहे.
कार्ला येथील एकवीरा परिसरात गेली ९ वर्षे एकदिवस कायस्थांचा हा एकवीरा उत्सव सीकेपी समाजातर्फे साजरा केला जातो. यंदा उत्सवाचे १० वे वर्षे आहे. दहाव्या वर्षाचे औचित्य साधून पोलीस निरीक्षक आशिष राजे व अशोक कुलकर्णी व्हायचं गौरव केला जाणार आहे. ह्या समारोहास मुंबई महानगरपालिकेचे नगरसेवक शैलेश फणसे, कल्याण डोंबिवलीचे नगरसेवक समीर चिटणीस, पुणे येथील जेष्ठ समाज कार्यकर्ते नंदकुमार वढावकर, स्थानिक खांडशी गावच्या सरपंच वैदेही रणदिवे इत्यादी उपस्थित राहणार आहेत
२८ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या ह्या समारोहात संपूर्ण देशातून सीकेपी मंडळी हजेरी लावणार आहेत. सकाळी गडावर अभिषेक नंतर पालखी निघणार आहेत. त्यानंतर प्राची गडकरी व स्मिता राजे ह्यांचा साडेतीन पिठाची महती, गोंधळ , जागर इत्यादी कार्यक्रम होणार आहे. समाजातील नामवंतांचा सन्मान, महाआरती तसेच आकर्षक संग्राह्य स्मरणिका प्रसिद्ध केल्या जाणार आहेत. यंदा प्रथमच उपस्थित भक्तांमधून लकी ड्राद्वारे १० भाग्यवान भक्तांची निवड केली जाणार आहे. महाप्रसादानंतर कार्यक्रमाची समाप्ती होणार आहे. कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन सीकेपी एकवीरा संस्थेने केले आहे.