vishwatmaklokswamivarta
Breaking News
करमणुकठळक बातम्या

इफ्फीची गोव्यात सांगता; मात्र सिनेमाचा प्रवास सुरूच : भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव अर्थात इफ्फी 2026 ची दिमाखदार सांगता

इफ्फीची गोव्यात सांगता; मात्र सिनेमाचा प्रवास सुरूच : भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव अर्थात इफ्फी 2026 ची दिमाखदार सांगता..

मेक इन गोवा, मेक फॉर द वर्ल्ड: गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी जागतिक चित्रपट आणि सर्जनशीलतेचे केंद्र म्हणून गोव्याचा दृष्टिकोन केला अधोरेखित,जगाला भावणाऱ्या पुढच्या महान कथेचा प्रवास भारतातून सुरू होवो : माहिती आणि प्रसारण सचिव चंचल कुमार यांनी व्यक्त केली सदिच्छा57 व्या इफ्फीमध्ये अकी (Aquí) या स्पॅनिश भाषेतील चित्रपटाने पटकावला प्रतिष्ठेचा सुवर्ण मयूर पुरस्कारव्हिसिटेशन (Visitation) या चित्रपटासाठी व्होल्कर श्लोंडॉर्फ यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा रौप्य मयूर पुरस्कार,ऋषभ शेट्टी यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा रौप्य मयूर पुरस्कार प्रदानमाया ओ’रुर्क यांनी पटकावला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा रौप्य मयूर पुरस्कारमेड इन इंडिया: अ टायटन स्टोरी या मालिकेला सर्वोत्कृष्ट वेब मालिकेचा (OTT)पुरस्कारगोव्याचे चित्रपटकर्मी आदित्य सुहास जांभळे यांचा भारतीय सिनेमातील योगदानाबद्दल गौरव

. बॉलीवूड प्रतिनिधी

गोव्यात सुरू असलेल्या 57 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव अर्थात इफ्फी 2026 च्या समारोपाच्या दिवशी आज नऊ दिवसांच्या सिनेमॅटिक अवकाशाचा अनुभव, सांस्कृतिक भेटीगाठी आणि सर्जनशील देवाणघेवाणीची दिमाखदार सांगता झाली. या महोत्सवाच्या निमित्ताने जगभरातील चित्रपट, चित्रपटकर्मी आणि प्रेक्षक एकत्र आले होते. या महोत्सवाच्या आयोजनातून भौगोलिक, भाषिक आणि सांस्कृतिक सीमा ओलांडण्याच्या सिनेमाच्या सामर्थ्याचा गौरव केला गेला.सीमाविरहित कथा ही यंदाच्या महोत्सवाची संकल्पना होती. या संकल्पनेला अनुसरून यंदाच्या इफ्फी 2026 च्या माध्यमातून प्रख्यात चित्रपटकर्मी, उदयोन्मुख कथात्मक मांडणीकार, चित्रपट उद्योग क्षेत्रातील तज्ञ व्यावसायिक आणि सिनेरसिकांसाठी एक महत्त्वाचे व्यासपीठ उपलब्ध झाले होते. या व्यासपीठावरून विविध संस्कृती, भाषा आणि सिनेमॅटिक परंपरांमधील संवादाला चालना मिळाली.

यंदाच्या इफ्फीच्या समारोप सोहळ्यात सिनेमा आणि संस्कृतीचा अनोखा संगम घडून आला. या दिमाखदार सोहळ्याअंतर्गत रेड कार्पेटवरील मान्यवरांचे आगमन, सांस्कृतिक सादरीकरणे आणि बहुप्रतीक्षित पुरस्कार वितरण सोहळ्याचा अंतर्भाव होता. या पुरस्कार वितरण सोहळ्यातून उल्लेखनीय सिनेमॅटिक सादरीकरण आणि उदयोन्मुख प्रतिभेचा गौरव केला गेला.

समारोप समारंभात बोलताना गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी इफ्फीशी गोव्याचे 22 वर्षांपासून जोडलेले नाते तसेच चित्रपट उद्योगाचे महत्त्वाचे जागतिक केंद्र म्हणून विकसित होत गेलेला हा महोत्सव यावर प्रकाश टाकत, या महोत्सवाच्या यशाबाबत आपले विचार मांडले.90 देशांच्या सहभागामुळे हा नऊ दिवसांचा महोत्सव जागतिक चित्रपटांचा सोहळा बनला असल्याचे त्यांनी नमूद केले. सुलभता आणि समावेशकता या गोष्टींचे महत्त्व अधोरेखित करत, युवा प्रेक्षकांना जागतिक चित्रपटसृष्टीचा आणखी विस्तृतपणे परिचय व्हावा, यासाठी विविध भाषांतील आणि विविध सांस्कृतिक परंपरांचे दर्शन घडविणारे चित्रपट पाहण्याचे आवाहन त्यांनी केले. गोव्याला चित्रपट निर्मिती आणि सर्जनशील उद्योगांचे केंद्र बनवण्याच्या महत्त्वाकांक्षेचा पुनरुच्चार करत, “आमची आकांक्षा केवळ चित्रपट महोत्सव आयोजित करण्यापुरतीच नसून जिथे चित्रपटाच्या कल्पना विकसित होतील, चित्रपटांची निर्मिती होऊन ते संपूर्ण भारतात तसेच जगभरातील प्रेक्षकांपर्यंत पोहोचविले जातील अशी व्यवस्था आम्हाला निर्माण करायची आहे,” असे त्यांनी सांगितले.

मुख्यमंत्र्यांनी पुरस्कार विजेत्यांचे आणि चित्रपटसृष्टीतील मंडळींचे अभिनंदन केले, तसेच भारताची सर्जनशील अर्थव्यवस्था बळकट करण्यासाठी सहकार्य दिल्याबद्दल भारत सरकार, माहिती आणि प्रसारण मंत्रालय आणि पंतप्रधानांचेही आभार मानले.माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सचिव चंचल कुमार यांनी भारतीय आणि आंतरराष्ट्रीय चित्रपटसृष्टीला एकत्र आणण्यात तसेच विविध कथा जागतिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यासाठी संधी निर्माण करण्यात इफ्फीची महत्त्वपूर्ण भूमिका अधोरेखित केली.यंदाच्या महोत्सवाच्या नऊ दिवसांच्या कार्यक्रमात 86 देशांतील 150 हून अधिक आंतरराष्ट्रीय चित्रपटांनी भर घातल्याचे त्यांनी सांगितले. आंतरराष्ट्रीय सहकार्य, ब्रिक्स चित्रपट विभाग, नवोदित चित्रपट निर्मात्यांसाठीचे उपक्रम आणि वेव्ह्ज फिल्म बझारच्या 20 व्या आवृत्तीचा उल्लेख करत त्यांनी भारताच्या सर्जनशील अर्थव्यवस्थेत निर्माण होत असलेल्या नव्या संधींकडे लक्ष वेधले.

इफ्फी आणि गोवा यांच्यातील विशेष नात्याचाही चंचल कुमार यांनी आवर्जून उल्लेख केला. चित्रपटांचे प्रदर्शन आणि सांस्कृतिक कार्यक्रमांमुळे स्थानिक समुदायांनाही चित्रपटसृष्टीशी अधिक जवळून जोडता आले, असे ते म्हणाले.महोत्सवाचे यश केवळ आकडेवारीत मोजता येणार नाही, असे म्हणाले. “इफ्फीमधून लोक आपल्यासोबत काय घेऊन जातात, हे केवळ आकड्यांमध्ये मोजता येत नाही. एखादा लक्षात राहिलेला चित्रपट, नव्याने सापडलेली एखादी कल्पना, निर्माण झालेली मैत्री किंवा भविष्यातील दिशा ठरवू शकणारे एखादे सहकार्य, अशा अनेक गोष्टी त्यात असतात.”, असे त्यांनी सांगितले.

चित्रपट निर्माते आणि सर्जकांना संदेश देताना चंचल कुमार म्हणाले, “येथे आपण गौरवलेले चित्रपट दूरवर पोहोचोत. येथे आपण शोधलेले तरुण कलावंतांचे आवाज अधिक बुलंद होवोत. आणि जगाला स्पर्श करणाऱ्या महान आगामी कथेचा प्रवास भारतातून सुरू होवो.”महोत्सवाचे संचालक आशुतोष गोवारीकर यांनीही कथांचा, भावनांचा आणि सांस्कृतिक नात्यांचा हा नऊ दिवसांचा प्रवास उलगडून सांगितला. ‘सीमांच्या पलीकडच्या कथा’ या संकल्पनेचा आशय त्यांनी मांडला. “लोकांना एकमेकांशी जोडण्याची विलक्षण क्षमता चित्रपटांमध्ये आहे. आपण एकत्र हसतो, एकत्र रडतो आणि अचानक आपल्यामधील सगळ्या सीमा नाहीशा होतात, असे ते म्हणाले.यंदाच्या महोत्सवातील चित्रपट विभागांविषयी गोवारीकर यांनी माहिती दिली. आंतरराष्ट्रीय स्पर्धेतील 15 चित्रपट, ‘सिनेमा ऑफ द वर्ल्ड’ विभागातील 35 चित्रपट, फीचर ॲनिमेशन चित्रपटांचे पुनरागमन, चित्रपट या विषयावरील चित्रपटांसाठी सुरू करण्यात आलेला नवा विभाग आणि सर्वोत्कृष्ट वेब सीरिज (ओटीटी) पुरस्काराचा समावेश अशा महत्त्वपूर्ण उपक्रमांचा त्यांनी उल्लेख केला.आंद्रे तार्कोव्स्की यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त त्यांना वाहण्यात आलेली आदरांजली, महोत्सवाचे भागीदार देश म्हणून स्पेन आणि रशिया यांचा असलेला सहभाग, 22 ब्रीक्स देशांच्या चित्रपटांचे सादरीकरण तसेच वेव्ज फिल्म बाजारची 20 वी आवृत्ती याकडे देखील त्यांनी लक्ष वेधले.

चित्रपटांची, चिंतन करण्यास प्रवृत्त करण्याची आणि उपेक्षित घटकांकडे लक्ष वेधून घेण्याची क्षमता अधोरेखित करत ते म्हणाले, “चित्रपटांनी अधून-मधून प्रश्न उपस्थित केले पाहिजेत. आरशाप्रमाणे त्याने समाजाला त्याचे वास्तव दाखवून आपल्यातील सामायिक मानवतेची जाणीव करून दिली पाहिजे.”इफ्फी असलेले आपले संबंध ही गौरव आणि सन्मानाची बाब असल्याचं सांगत, गोवारीकर यांनी चित्रपटांच्या माध्यमातून संस्कृति, कथा आणि लोकांना एकत्र आणण्यात या महोत्सवाची महत्वाची भूमिका असल्याचे पुन्हा अधोरेखित केले.

राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळ अर्थात एनएफडीसीचे व्यवस्थापकीय संचालक धिरज सिंह यांनी, या चित्रपट महोत्सवाला, चित्रपटांची जादू अनुभवण्यासाठी एक चैतन्यपूर्ण व्यासपीठ बनण्यासाठी योगदान देणाऱ्या सर्व संबंधितांचे, सहभागी झालेल्या प्रतिनिधींचे आणि अभ्यंगतांनी केलेल्या प्रयत्नांची प्रशंसा केली आणि त्यांचे आभार मानले. ‘इफ्फी’ च्या आंतरराष्ट्रीय परीक्षक मंडळाचे अध्यक्ष आनंद एल. राय, ओटीटी परीक्षक मंडळाचे अध्यक्ष जमनादास मजेठिया, तसेच आयसीएफटी – युनेस्को गांधी मेडल परीक्षक मंडळाचे अध्यक्ष मनोज कदम यांनीही हा महोत्सव आणि परीक्षकमंडळाच्या चर्चेबाबत आपले मत मांडले.

उपस्थित मान्यवरांमध्ये राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळाचे अध्यक्ष जी. कृष्णकुमार; गोवा मनोरंजन संस्थेच्या उपाध्यक्षा डिलिला एम. लोबो; माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव प्रभात; माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव तसेच वित्तीय सल्लागार दीपक नारायण, आणि गोवा मनोरंजन संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक बांदेकर यांचा समावेश होता.चित्रपटातील उत्कृष्टतेचा गौरव

तियागो गुएदेस दिग्दर्शित आणि पाउलो ब्रान्को निर्मित ‘अकी’ हा पोर्तुगीज-फ्रेंच चित्रपट 57 व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (इफ्फी) सर्वोत्कृष्ट चित्रपटासाठी दिल्या जाणाऱ्या “सुवर्ण मयूर” या सर्वोच्च पुरस्काराचा विजेता ठरला. गोव्यात झालेल्या महोत्सवाच्या समारोप समारंभात दिग्दर्शक तियागो गुएदेस यांनी हा पुरस्कार स्वीकारला. गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि परीक्षक मंडळाचे अध्यक्ष आनंद एल. राय यांनी संयुक्तपणे हा पुरस्कार प्रदान केला.मुख्य आंतरराष्ट्रीय स्पर्धेतील 15 चित्रपटांमधून विजेता म्हणून 204 मिनिटांच्या या सह-निर्मितीपटाने बाजी मारली. मे 2026 मध्ये कान चित्रपट महोत्सवात प्रीमियर झाल्यानंतर, हा चित्रपट साओ पावलो आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव आणि जकार्ता चित्रपट महोत्सवातही प्रदर्शित झाला; त्यानंतर ‘सुवर्ण मयूर’ पुरस्कार पटकावल्याने त्याच्या आंतरराष्ट्रीय महोत्सवी प्रवासात आणखी मानाचा तुरा रोवला गेला आहे

मनाला सुखावणारी मात्र पुढे काय होईल यांचा अंदाज बांधता न येणारी अशी बांधीव कथा असलेल्या चित्रपटाची निर्मिती केल्याबद्दल परीक्षकांनी या चित्रपटांची विशेष दखल घेतली. या चित्रपटातील प्रमुख अभिनेते दिवंगत मानोलो सोलो यांना, त्यांनी चित्रपटसृष्टीला दिलेल्या प्रदीर्घ योगदानाबद्दल यावेळी आदरांजली वाहण्यात आली.

संबंधित पोस्ट

लेख : सनातनच्या ग्रंथ-लघुग्रंथांच्या १ कोटीहून अधिक प्रती प्रकाशित !- संस्था-सनातनच्या ग्रंथ-लघुग्रंथांच्या १ कोटीहून अधिक प्रती प्रकाशित !

जग विक्रम’ जहाजाचा होर्मुझच्या सामुद्रधुनीतून सुरक्षित प्रवास;एलपीजी (LPG) कार्गो घेऊन १५ एप्रिलला मुंबईत पोहोचणार! 🇮🇳

शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही; शासन खंबीरपणे पाठिशी – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे**भिलपुरीत शेतकरी कुटुंबासोबत दिवाळी साजरी; अंबादास तांगडे यांच्या मुलीच्या शिक्षणासह विवाहाची जबाबदारी स्वीकारली*

vishwatmaklokswamivarta

वनराई बंधाऱ्यांच्या माध्यमातून पाणीटंचाईवर मात करण्याचे नियोजन, पालकमंत्री भरतशेठ गोगावले यांच्याकडून मोहोप्रे, दहीवड येथील बंधाऱ्यांची पाहणी श्रमदानातून उभी राहतेय जलसंधारणाची लोकचळवळ

vishwatmaklokswamivarta

प्रतिजैविक औषधांचा अनावश्यक वापर रोखण्यासाठी फार्मासिस्टनी पुढाकार घ्यावा – केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव जागतिक फार्मासिस्ट दिन व राष्ट्रीय फार्मसी सप्ताहानिमित्त राज्यस्तरीय सोहळा

vishwatmaklokswamivarta

कौशल्य मंत्री मंगल प्रभात लोढा यांचे तरुणांना सहभागी होण्याचे आवाहन· ‘लोकसंवाद’ अभियानातून रोजगाराच्या संधींची जनजागृती

vishwatmaklokswamivarta