vishwatmaklokswamivarta
Breaking News
आरोग्य

शहीदांच्या स्मृतींना अभिवादन; रक्तदानातून जीवनदान!रामनाथ, अलिबाग येथे रक्तदान शिबिर उत्साहात संपन्न

शहीदांच्या स्मृतींना अभिवादन; रक्तदानातून जीवनदान!रामनाथ, अलिबाग येथे रक्तदान शिबिर उत्साहात संपन्न

रायगड-अलिबाग, प्रतिनिधी : मुंबई येथे २६ नोव्हेंबर २००८ रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात देशासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या शूरवीर जवानांना तसेच निष्पाप नागरिकांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी अमृत रायगड जिल्हा कार्यालय, अलिबाग, सन्मित्र मंडळ, रामनाथ, एक्स. एन.सी.सी. कॅडेट्स असोसिएशन, कुलाबा ढोल-ताशा आणि ध्वज पथक यांच्या संयुक्त विद्यमाने रामनाथ, अलिबाग येथे आयोजित रक्तदान शिबिर उत्साहात संपन्न झालki

 २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या वीरांच्या स्मृतींना अभिवादन करण्याबरोबरच सामाजिक बांधिलकी जपत गरजू रुग्णांना जीवनदान देण्याच्या उदात्त हेतूने आयोजित या उपक्रमाला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत रक्तदान केले. रक्तदान हे श्रेष्ठदान असून, एका रक्तदात्यामुळे एखाद्या गरजू रुग्णाला नवजीवन मिळू शकते, हा सामाजिक संदेश या उपक्रमातून देण्यात आला.या शिबिरात अमृतचे रायगड जिल्हा व्यवस्थापक शैलेश विनायक मराठे, सन्मित्र मंडळ, रामनाथचे सचिन गुरव, एक्स. एन.सी.सी. कॅडेट्स असोसिएशनचे हेमचंद्र पाटील, प्रणित पाटील, जयेश टोळकर, मनोज माळी, रोहन गुरव तसेच रामनाथ येथील ग्रामस्थ उपस्थित होते.“शहीदांच्या स्मृतींना अभिवादन, रक्तदानातून जीवनदान!” या प्रेरणादायी भावनेतून आयोजित करण्यात आलेले हे रक्तदान शिबिर सामाजिक बांधिलकी जपणारे ठरले.

 

०००००

संबंधित पोस्ट

जागतिक क्षयरोग दिनानिमित्त जिल्ह्यात विविध जनजागृती उपक्रम संपन्न

दोन दिवसीय CPHC प्रशिक्षण कार्यशाळा उत्साहात संपन्न ; जवळखेड व जळंब प्राथमिक आरोग्य केंद्रात आरोग्य कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण

vishwatmaklokswamivarta

वरवंड येथे समग्र प्राथमिक आरोग्य सेवेवरील दोन दिवसीय कार्यशाळा संपन्न

गर्भाशय  मुखाच्या कर्करोगावर प्रतिबंधासाठी एचपीव्ही लसीकरणाचे कवच- जिल्हाधिकारी अशोक काकडे- आगामी 90 दिवस एचपीव्ही मोफत लसीकरण मोहीम- जिल्ह्‌यात 22 हजारहून अधिक लसीकरणाचे लक्ष्य

पीसीपीएनडीटी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करा-जिल्हाधिकारी-जिल्हा दक्षता पथकाची बैठक संपन्न

राष्ट्रीय आरोग्य मेळाव्यात 2 हजार 786 दिव्यांग बांधवांनी केली आरोग्य तपासणी आणि साहित्य नोंदणी; लवकरच होणार साहित्य वाटप शिबीर