vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारातून चंद्रपुरात महाराष्ट्रातील पहिल्या २५१ कुंडीय गायत्री महायज्ञाचे आयोजन-९ ते १२ जानेवारी २०२७ दरम्यान ‘राष्ट्र शौर्य समृद्धी २५१ कुंडीय गायत्री महायज्ञ व व्यसनमुक्ती संकल्प सोहळा’; राष्ट्रजागरण, संस्कारसंवर्धन आणि युवा पिढीच्या प्रबोधनाचा व्यापक संकल्प,निबंध व घोषवाक्य स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा २१ डिसेंबरला गांधी चौकातील महानगरपालिका मैदानावर; निबंध स्पर्धेतील २० गुणवंतांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चहापान व संवादाची विशेष संधी २९ नोव्हेंबरला श्री वेदमाता गायत्री शक्तिपीठ येथे भूमिपूजन; शांतिकुंज, हरिद्वारचे व्यवस्थापक योगेंद्रजी गिरी यांची प्रमुख उपस्थिती

आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारातून चंद्रपुरात महाराष्ट्रातील पहिल्या २५१ कुंडीय गायत्री महायज्ञाचे आयोजन-९ ते १२ जानेवारी २०२७ दरम्यान ‘राष्ट्र शौर्य समृद्धी २५१ कुंडीय गायत्री महायज्ञ व व्यसनमुक्ती संकल्प सोहळा’; राष्ट्रजागरण, संस्कारसंवर्धन आणि युवा पिढीच्या प्रबोधनाचा व्यापक संकल्प,निबंध व घोषवाक्य स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा २१ डिसेंबरला गांधी चौकातील महानगरपालिका मैदानावर; निबंध स्पर्धेतील २० गुणवंतांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चहापान व संवादाची विशेष संधी २९ नोव्हेंबरला श्री वेदमाता गायत्री शक्तिपीठ येथे भूमिपूजन; शांतिकुंज, हरिद्वारचे व्यवस्थापक योगेंद्रजी गिरी यांची प्रमुख उपस्थिती

चंद्रपूर प्रतिनिधी: राष्ट्रनिर्माण, संस्कारसंवर्धन आणि समाजप्रबोधनाच्या व्यापक उद्देशाने आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या पुढाकारातून चंद्रपुरात महाराष्ट्रातील पहिल्या २५१ कुंडीय गायत्री महायज्ञाचे आयोजन करण्यात येत आहे. ‘राष्ट्र शौर्य समृद्धी २५१ कुंडीय गायत्री महायज्ञ व व्यसनमुक्ती संकल्प सोहळा’ हा भव्य आध्यात्मिक उपक्रम दि. ९ ते १२ जानेवारी २०२७ या कालावधीत संपन्न होणार आहे. राष्ट्रजागरण, युवा पिढीमध्ये संस्कारांचे संवर्धन, आध्यात्मिक चेतना आणि समर्थ समाजनिर्मितीचा संदेश या माध्यमातून जनमानसापर्यंत पोहोचविण्याचा संकल्प आहे.

या महायज्ञाच्या पूर्वतयारीचा शुभारंभ म्हणून रविवार, दि. २९ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी ११.३० ते दुपारी १२.२० या वेळेत श्री वेदमाता गायत्री शक्तिपीठ, श्रीराम सेतू मार्ग, दाताळा, चंद्रपूर येथे भूमिपूजन समारंभ आयोजित करण्यात आला आहे. शांतिकुंज, हरिद्वार येथील गायत्री तीर्थाचे व्यवस्थापक परम आदरणीय योगेंद्रजी गिरी यांच्या पावन सान्निध्यात हा भूमिपूजन सोहळा संपन्न होणार आहे. यावेळी आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार आणि सौ. सपनाताई मुनगंटीवार यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

या महायज्ञाच्या निमित्ताने विविध सामाजिक, सांस्कृतिक आणि जनजागृतीपर उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये निबंध स्पर्धा आणि घोषवाक्य स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा महानगरपालिका ग्राउंड, गांधी चौक चंद्रपूर येथे २१ डिसेंबर २०२६ रोजी संपन्न होणार आहेत. निबंध स्पर्धेतील २० उल्लेखनीय स्पर्धकांना माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्यासोबत चहापान व संवाद साधण्याची विशेष संधी मिळणार आहे. नव्या पिढीमध्ये राष्ट्रप्रेम, सामाजिक जाणीव आणि सकारात्मक विचारांची रुजवण करण्याच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

महायज्ञाच्या कार्यक्रमांची सुरुवात ९ जानेवारी २०२७ रोजी भव्य मंगल कलश यात्रेने होणार आहे. १० ते १२ जानेवारीदरम्यान २५१ कुंडीय गायत्री महायज्ञ संपन्न होईल. यासोबतच ९ ते १२ जानेवारी या कालावधीत विशाल पुस्तक व चित्र प्रदर्शन तसेच व्यसनमुक्ती प्रदर्शन आयोजित करण्यात येणार आहे. १० जानेवारी रोजी गोसंवर्धन प्रदर्शन आणि कृषी संमेलनाचे आयोजन करण्यात आले असून, ११ जानेवारी रोजी नारी जागरण संमेलनआणि दीप महायज्ञ संपन्न होणार आहे.१२ जानेवारी रोजी राज्यस्तरीय युवा संमेलन होणार आहे.

आध्यात्मिक साधनेसोबतच सामाजिक प्रबोधन, राष्ट्रजागरण, व्यसनमुक्ती, गोसंवर्धन आणि कृषी विकासाचा संदेश देणाऱ्या या २५१ कुंडीय गायत्री महायज्ञासाठी देशाच्या विविध भागांतून मोठ्या संख्येने भाविक, गायत्री परिवाराचे साधक आणि नागरिक चंद्रपुरात दाखल होणार आहेत. त्यामुळे हा सोहळा केवळ धार्मिक आयोजन न राहता अध्यात्म, संस्कार, सामाजिक परिवर्तन आणि राष्ट्रीय चेतनेचा व्यापक संगम ठरणार आहे. अशा स्वरूपाचा २५१ कुंडीय गायत्री महायज्ञ महाराष्ट्रात प्रथमच आयोजित होत असून, चंद्रपूरला या आध्यात्मिक आणि सांस्कृतिक उपक्रमाचे यजमानपद लाभत आहे, ही चंद्रपूर जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब आहे. या माध्यमातून केवळ धार्मिक परंपरेचे जतन नव्हे, तर समाजात सद्विचार, राष्ट्रनिष्ठा, सेवाभाव आणि संस्कारांची रुजवण करण्याचा प्रयत्न आहे.

अखिल विश्व गायत्री परिवार, चंद्रपूर यांच्या आयोजनातून आणि आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार व सौ. सपनाताई मुनगंटीवार यांच्या कार्यक्रम संयोजनातून साकारत असलेल्या या महायज्ञात नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे. भूमिपूजन समारंभालाही सहकुटुंब उपस्थित राहून या पवित्र कार्याचा प्रारंभ मंगलमय करावा, असे आवाहन आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी केले आहे.

संबंधित पोस्ट

नवी दिल्लीत माणीकशॉ केंद्रामध्ये आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त आयेाजित कार्यक्रमाला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांनी केले संबोधित आणि जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा . 

vishwatmaklokswamivarta

जालना जिल्ह्यातील सर्व जलस्रोतांची सद्यस्थिती, उपलब्ध पाणीसाठा आणि संभाव्य वापराचे तातडीने लेखापरीक्षण करून पुढील ऑगस्टपर्यंतचा #पाणीपुरवठा आराखडा तयार करावा. नागरिकांसह पशुधनासाठी पाणी आणि चाऱ्याची उपलब्धता यांना सर्वोच्च प्राधान्य द्यावे, असे निर्देश जालना जिल्ह्याच्या पालकमंत्री तथा पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे

vishwatmaklokswamivarta

नांदेड विमानतळ विकासासाठी प्रस्ताव तात्काळ सादर करा- पालकमंत्री अतुल सावे जिल्हाधिकारी कार्यालयात विमानतळ विकास कामांबाबत आढावा…

ग्रामविकासासाठी लोकसहभाग व शाश्वत नियोजन आवश्यक– जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष- विकसित भारत – जी-राम-जी मिशनचा जिल्हास्तरीय शुभारंभ विविध विकासकामांचाही शुभारंभ

जालना हे विचारांचे शहर, जालन्याच्या विकासासाठी भाजपलाच संधी द्या – रावसाहेब पाटील दानवे-भाजपचाच महापौर होणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ – माजी मंत्री आ.बबनराव लोणीकर भाजपला बहुमत दिल्यास जालन्याचा चेहरामोहरा बदलेल – कैलास गोरंट्याल एकजुटीने भाजपच्या पाठीशी उभे रहा – भास्कर आबा दानवे

vishwatmaklokswamivarta

छत्रपती शिवाजी महाराजांचा ३५३ वा राज्याभिषेक दिन रायगडावर उत्साहात साजरा रायगड किल्ल्याच्या संवर्धनासाठी शासनाकडून सर्वतोपरी सहाय्य; गुरुत्वाकर्षण आधारित पाणीपुरवठा योजनेस मान्यता देणार – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे