vishwatmaklokswamivarta
Breaking News
गुन्हे

नव्या मुंबईतील नेरुळ एमआयडीसीत २० कोटींच्या सोन्याची फिल्मी स्टाइलने लूट,कार मधून आलेल्या चौघांनी कार अडवून १६ किलो ४०० ग्रॅम सोने  लुटून फरार

नव्या मुंबईतील नेरुळ एमआयडीसीत २० कोटींच्या सोन्याची फिल्मी स्टाइलने लूट,कार मधून आलेल्या चौघांनी कार अडवून १६ किलो ४०० ग्रॅम सोने  लुटून फरार

नवी मुंब प्रतिनिधी ई : झवेरी बाजारातून नेरुळ एमआयडीसीकडे नेले जाणारे तब्बल २० कोटी रुपये किमतीचे १६ किलो ४०० ग्रॅम सोने लुटल्याची खळबळजनक घटना नेरुळ येथील शिरवणेएमआयडीसी परिसरात गुरुवारी रात्री घडली. वॅगनार कारमधून आलेल्या चौघांनी सोन्याची वाहतूक करणारी कार अडवून तिच्या काचा लोखंडी रॉडने फोडून सोन्याच्या दागिन्यांची बॅग हिसकावून ठाण्याच्या दिशने पलायन केल्याचे उघडकीस आले आहे. या घटनेमुळे नवी मुंबईत मोठी खळबळ उडाली असून, तुर्भे पोलिसांसह गुन्हे शाखेने लुटारुंचा शोध सुरू केला आहे.

ही घटना गुरुवारी दि.२६ नोव्हेंबर रोजी रात्री पावणे दहाच्या सुमारास घडली. लक्ष्मण घुरो मुखिया (५५) हे नेरुळ एमआयडीसीतील चैन ऍन्ड चैन कंपनीचे तब्बल २० कोटी रुपये किंमतीचे सोने घेऊन कारने नेरुळच्या दिशेने जात होते. यावेळी कारमध्ये त्यांच्या सोबत कंपनीतील इतर दोन कर्मचारी होते. त्यांची कार नेरुळ मधील शिरवणे एमआयडीसीतील सर्व्हिस रोडवर रहेजा साईटजवळील आली असता, त्यांचा पाठलाग करत वॅगनार कारमधून आलेल्या चौघांनी त्यांची गाडी अडवली. त्यानंतर लुटारुंनी लोखंडी रॉडने कारची समोरील आणि चालकाच्या बाजूची काच फोडली.  यावेळी चालकाने प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला असता, एका लुटारूने त्यांच्या चेहऱयावर रॉडने प्रहार केला. यात त्यांच्या डाव्या डोळ्याजवळ दुखापत झाली. त्यानंतर लुटारुनी कारमधील सुमारे २० कोटी रुपये किंमतीचे १६ किलो ४०० ग्रॅम वजनाचे सोन्याचे बिस्किटे, चेन आणि अन्य दागिने असलेली बॅग जबरदस्तीने हिसकावून घेतली. या लुटीनंतर चौघा लुटारूंनी वॅगनार कारमधून ठाण्याच्या दिशेने पलायन केले. या घटनेची माहिती मिळताच परिमंडळ एकचे पोलीस उपायुक्त, वाशी विभागाचे सहायक पोलीस आयुक्त, मध्यवर्ती गुन्हे शाखा, गुन्हे शाखा कक्ष-१ आणि तुर्भे पोलिसांच्या अधिकाऱयांनी घटनास्थळी धाव घेतली.

सीसीटीव्हीच्या आधारे शोध मोहीम,या प्रकरणी तुर्भे पोलिस ठाण्यात अन्वये भारतीय न्याय संहिता कलम ३०९(६) आणि ३(५) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चारही संशयितांचे वय अंदाजे २२ ते ३५ वर्षे असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक माहितीच्या आधारे आरोपींचा माग काढण्याचे काम सुरु असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या प्रकरणाचा तपास तुर्भे पोलिसांह गुन्हे शाखेकडून देखील करण्यात येत असून त्यासाठी वेगवेगळी पथके तयार करण्यात आल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

0000

0

संबंधित पोस्ट

दहिसर पोलिसांची मोठी कारवाई!  बनावट कागदपत्रे बनवणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश, ४ जणांना अटक

माओवाद्यांचा शस्त्रास्त्र निर्मिती कारखाना गडचिरोली पोलीस व नारायणपूर (छ.ग.) पोलीसांकडून नष्ट

गडचिरोली पोलीसांनी केला अवैध दारु व चारचाकी वाहनासह एकूण 8,24,000/- रुपयांचा मुद्देमाल जप्त

पुण्यात शिवाजीनगर न्यायालयाबाहेर थरारक हल्ला! सहा जणांकडून तरुणावर धारदार शस्त्रांनी हल्ला; दोन पिस्तुले आणि मॅगझिन जप्त, तरुणाची प्रकृती गंभीर!

vishwatmaklokswamivarta

बनावट आधारकार्डावर बालविवाह करण्याचा प्रयत्न फसला‘चाईल्डलाईन’ची सतर्कता

दूध व दुग्धजन्य पदार्थांमध्ये भेसळ आढळल्यास कठोर कारवाई,भेसळ करणाऱ्यांविरुद्ध गुन्हे दाखल होणार; जिल्हास्तरीय पथकाकडून तपासणी मोहीम