vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

टीएमटीच्या ताफ्यात 950 बसेसची कमतरता,ठाण्याला गरज 1350 बसेसची धावतात फक्त 381रिंग मेट्रोसाठीच टीएमटीला केले जातेय कमकुवत – मनोज प्रधान-केंद्राकडून येणाऱ्या 100 बसेस स्वीकारण्यात चालढकल…

टीएमटीच्या ताफ्यात 950 बसेसची कमतरता,ठाण्याला गरज 1350 बसेसची धावतात फक्त 381रिंग मेट्रोसाठीच टीएमटीला केले जातेय कमकुवत – मनोज प्रधान-केंद्राकडून येणाऱ्या 100 बसेस स्वीकारण्यात चालढकल…

 

ठाणे प्रतिनिधी – महापालिकेकडून चालविण्यात येणारी परिवहन सेवा ही शहराची रक्तवाहिनी म्हणून ओळखली जाते. मात्र, ही रक्तवाहिनीच कमकुवत करण्याचा प्रयत्न सध्या काही लोकांकडून केला जात आहे. ठाणे शहराला लोकसंख्येच्या तुलनेत 1 हजार 350 बसगाड्यांची गरज आहे. मात्र, प्रत्यक्षात 381 बसेस रस्त्यावर धावत आहेत. विशेष म्हणजे, केंद्र सरकारकडून 100 बसेस मिळत असतानाही त्या स्वीकारण्याची मानसिकताही ठाणे महानगर पालिकेची नाही. एकूणच रिंग मेट्रोसाठी टीएमटी सेवा कमकुवत केली जात नाही ना, अशी शंका राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांनी व्यक्त केली आहे.

सध्या ठाणे महानगर पालिकेच्या परिवहन सेवेचे तीन तेरा वाजले आहेत. धोरणात्मक निर्णय घेण्याची क्षमता नसल्यानेच टीएमटी डबघाईस आली असल्याचा आरोप मनोज प्रधान यांनी केला आहे.मनोज प्रधान म्हणाले की, टीएमटी सक्षम करणे ही या शहराची गरज आहे. मात्र, भ्रष्टाचाराने टीएमटीचे इंजिन डाऊन केले आहे. परिणामी बसगाड्यांची संख्या वाढविण्यासाठी सत्ताधारी आणि प्रशासन आग्रही नाही. आजमितीस ठाणे महानगरपालिका परिवहन सेवेच्या ताफ्यात ४०७ बसगाड्या आहेत, त्यापैकी सुमारे ३८१ बसगाड्या प्रवासी सेवेसाठी उपलब्ध आहेत. धर्मवीर आनंद दिघे आगारात २३०, कोपरी आगारात ११७ आणि वागळे आगारात ३४ बसगाड्यांचा समावेश आहे. या बस ११२ मार्गांवर चालवल्या जातात आणि दररोज सुमारे ७,६७३ बसफेऱ्या होतात. ठाणे शहराच्या वाढत्या लोकसंख्येच्या तुलनेत ही बससंख्या अत्यंत अपुरी आहे. पुणे येथील सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ रोड ट्रान्सपोर्ट (CIRT) संस्थेच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, दर १ लाख लोकसंख्येमागे किमान ५० बसगाड्या असणे आवश्यक आहे. ठाणे शहराची अंदाजित लोकसंख्या सुमारे २७ लाख इतकी असल्याने शहरात किमान १,३५० बसगाड्यांची गरज आहे. मात्र, ताफ्यातील ४०७ पैकी फक्त ३८१ बस प्रत्यक्षात रस्त्यावर धावत आहेत, ज्यामुळे सध्या सुमारे ९५० पेक्षा जास्त बसगाड्यांचा मोठा तुटवडा आहे. २०२६-२७ या वर्षात ताफ्यात सुमारे ३७० नवीन इलेक्ट्रिक आणि डबलडेकर बस दाखल होणार असून एकूण संख्या ७७७ पर्यंत जाईल. मात्र, त्यानंतरही लोकसंख्येच्या मानाने ५७३ बसगाड्यांची कमतरता कायम राहणार आहे.बसची संख्या अपुरी असल्यामुळेच गर्दीच्या वेळी प्रवाशांना लांब रांगा लावाव्या लागतात आणि शहरातील नागरिक खासगी वाहने किंवा ऑटोरिक्षांचा अधिक वापर करतात, ज्यामुळे वाहतूक कोंडीत भर पडत आहे.

दरम्यान, ताफ्यात इलेक्ट्रिक, सीएनजी आणि डबलडेकर बसचा समावेश करून बससंख्या वाढवण्याचे नियोजन सुरू आहे. मात्र, ज्या इलेक्ट्रिक बसेस आता आहेत त्या रस्त्यावर कुठेही बंद पडत आहेत. अशा स्थितीत जर केंद्र सरकार आपणाला 100 बसेस देण्यास तयार असेल तर त्या ताब्यात घेणे गरजेचे आहे. मात्र, ठामपा या बसेस घेत नाही. यामागे कोणाचे हीत जोपासले जात आहे; याची माहिती प्रशासनाने जाहीर करावे, अशी मागणी करून मुंबई आणि ठाण्यातील रिक्षा-टॅक्सी संघटनांनी १ डिसेंबरपासून संपाचा इशारा दिला आहे. हा संप झाल्यास त्याचा अतिरिक्त ताण टीएमटी बसेसवर येण्याची शक्यता आहे. त्यातून मार्ग कसा काढणार, असा सवालही प्रधान यांनी उपस्थित केला आहे.

संबंधित पोस्ट

शिकाऊ व पक्की अनुज्ञप्तीसाठी शिबिर 

कर्तव्यपथावर झळकलेल्या महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवाचा मुंबईकरांना प्रत्यक्ष अनुभव

vishwatmaklokswamivarta

माणगाव येथील- रेड्डीज हॉटेल ते ढालघर फाटा, निजामपूर नाका ते कालवा रोड, मोर्बा नाका ते पवार वाडा हॉटेल तसेच इंदापूर येथील- माहि हॉटेल ते कशेने बायपास या मार्गांवर रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी ‘नो पार्किंग झोन लागू करण्यात आला आहे.

vishwatmaklokswamivarta

मुंबई महानगरपालिकेच्या महापौरपदासाठी भाजपाच्या रितू तावडे तर उपमहापौरपदी शिवसेनेच्या संजय घाडी यांचा उमेदवारी अर्ज दाखल, ११ फेब्रुवारीला होणार निवड.

vishwatmaklokswamivarta

सेवाकार्यात जैन समाजाचे योगदान मोलाचे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भगवान महावीर जन्मकल्याणक महोत्सव संपन्न

vishwatmaklokswamivarta