vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

मुंबई पुस्तक महोत्सवातील ‘चिल्ड्रन्स कॉर्नर’मध्ये बालचमूंसाठी विविध उपक्रम विज्ञानाच्या गमतीजमती, कठपुतळी कार्यशाळा, वक्तृत्व स्पर्धा आणि मातीच्या खेळण्यांची निर्मिती

मुंबई पुस्तक महोत्सवातील ‘चिल्ड्रन्स कॉर्नर’मध्ये बालचमूंसाठी विविध उपक्रम, विज्ञानाच्या गमतीजमती, कठपुतळी कार्यशाळा, वक्तृत्व स्पर्धा आणि मातीच्या खेळण्यांची निर्मिती

मुंबई, द प्रतिनिधी : मुंबई पुस्तक महोत्सव २०२६ मध्ये लहान मुलांसाठी आयोजित करण्यात आलेल्या ‘चिल्ड्रन्स कॉर्नर’मध्ये आज विविध शैक्षणिक, मनोरंजक आणि सर्जनशील उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. विज्ञानाच्या गमतीजमती, कठपुतळी कार्यशाळा, ‘जस्ट अ मिनिट’ भाषण स्पर्धा आणि मातीची खेळणी बनविण्याच्या कार्यशाळेत हजारो विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.

पहिल्या सत्रात इयत्ता पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांसाठी विज्ञान लेखक राजीव तांबे यांनी ‘विज्ञानाच्या गमतीजमती’ या विषयावर संवाद साधला. विज्ञानातील विविध संकल्पना गोष्टींच्या माध्यमातून रंजक पद्धतीने मांडत त्यांनी विद्यार्थ्यांशी दिलखुलास चर्चा केली. विद्यार्थ्यांनी विचारलेल्या विविध प्रश्नांना त्यांनी उत्स्फूर्तपणे उत्तरे दिली. यावेळी चित्रकला स्पर्धेतील उत्कृष्ट दहा विद्यार्थ्यांना राजीव तांबे यांच्या हस्ते पुरस्कार आणि पुस्तके देऊन गौरविण्यात आले.दुसऱ्या सत्रात इयत्ता पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांसाठी ‘वर्कशॉप ऑन पपेट्री’ या कठपुतळी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. मीना नायक यांनी विद्यार्थ्यांना कठपुतळीच्या विविध प्रकारांची ओळख करून देत त्यासंदर्भातील गमतीशीर गोष्टी आणि तंत्र शिकविले

तिसऱ्या सत्रात इयत्ता नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी ‘जस्ट अ मिनिट’ ही भाषण स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी विविध विषयांवर आपले विचार मांडले. प्रियांका माहेश्वरी यांनी विद्यार्थ्यांना वक्तृत्वकलेचे महत्त्व सांगून प्रभावीपणे विचार मांडण्याबाबत मार्गदर्शन केले.चौथ्या सत्रात इयत्ता सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी ‘मातीची खेळणी बनविण्याची कार्यशाळा’ आयोजित करण्यात आली. सौरभ अली यांनी विद्यार्थ्यांना मातीपासून विविध प्रकारची खेळणी तयार करण्याचे तंत्र शिकविले. विद्यार्थ्यांनी स्वतःच्या कल्पकतेतून आकर्षक मातीची खेळणी तयार केली.

या उपक्रमांविषयी माहिती देताना एनबीटी-एनसीसीएलचे संपादक दीप सैकिया यांनी सांगितले की, चिल्ड्रन्स कॉर्नरमधील विविध सत्रांमध्ये हजारो विद्यार्थ्यांनी आज सहभाग नोंदवून नवनवीन अनुभव घेतले.

00000

संबंधित पोस्ट

लाडकी बहीण योजनेतील ई-केवायसी जिल्ह्यात 22 हजार 375 महिलांची प्रक्रिया प्रलंबित

दुष्काळामुळे हवालदिल शेतकऱ्यांना बळ, आत्मविश्वास देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांसोबत साजरी केली दिवाळी ….

vishwatmaklokswamivarta

दुबई येथून १११ नागरिक पुण्यात सुखरूप पोहोचले; उर्वरित नागरिकांना आणण्याची कार्यवाही सुरु

मुंबई शहर विभागातील श्रीगणेशोत्सव पूर्वतयारीची महापौर श्रीमती रितू तावडे यांनी केली पाहणी 

vishwatmaklokswamivarta

शहीद जवानांच्या मूळ गावी स्मारक उभारण्यासाठी प्रशासन कटिबद्ध – पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटीलशहीद जवानाच्या कुटुंबास एक कोटींची मदत ; गुणवंत अधिकारी-कर्मचाऱ्यांचा गौरव

मुख्यमंत्री वारकरी निवारा केंद्र हाऊसफुल्ल; पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्याकडून पाहणी ग्रामविकास व पंचायत राज विभागाच्या सुविधांवर वारकरी समाधानी

vishwatmaklokswamivarta