vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

महाराष्ट्र शासनाचे ५ वर्षे मुदतीचे १००० कोटी रुपयांचे रोखे विक्रीस

महाराष्ट्र शासनाचे ५ वर्षे मुदतीचे १००० कोटी रुपयांचे रोखे विक्रीस

मुंबई, प्रतिनिधी : महाराष्ट्र शासनाच्या 5 वर्षे मुदतीच्या 1000 कोटींच्या 7.09 % महाराष्ट्र शासनाचे रोखे 2031 च्या (दि.27 ऑगस्ट 2026 रोजी उभारलेल्या ) रोख्यांची विक्री शासनाच्या सुधारित अधिसूचनेतील अटी आणि शर्तींच्या अधीन राहून करण्यात येईल. या कर्जाद्वारे मिळालेल्या रकमेचा विनियोग शासनाच्या विकास कामासाठी अर्थपुरवठा करण्यासाठी केला जाईल, अशी माहिती वित्त विभागाचे सचिव (वित्तीय सुधारणा) विजय वाघमारे यांनी प्रसिद्धीस दिली आहे.

अस्पर्धात्मक लिलाव पद्धतीनुसार (सुधारित) एकूण अधिसूचित केलेल्या शासन कर्जरोखे रकमेच्या 10 टक्के रक्कम पात्र वैयक्तिक व संस्थात्मक गुंतवणुकदारांना वाटप करण्यात येईल. मात्र एका गुंतवणुकदारास एकूण अधिसूचित रकमेच्या जास्तीतजास्त 1 टक्का रकमेच्या मर्यादेपर्यंत वाटप करण्यात येईल.1 डिसेंबर 2026 रोजी भारतीय रिझर्व्ह बँकेतर्फे मुंबई येथील कार्यालयात लिलाव केला जाईल. तर लिलावाचे बीडस् 1 डिसेंबर 2026रोजी संगणकीय प्रणालीनुसार, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, कोअर बँकिंग सोल्यूशन, (ई-कुबेर) सिस्टीमनुसार सादर करावयाचे आहेत.

यामध्ये स्पर्धात्मक बिड्स संगणकीय प्रणालीद्वारे ई-कुबेर सिस्टीमनुसार सकाळी १०.३० ते ११.३० वाजेपर्यंत सादर करावेत. तर अस्पर्धात्मक बीडस् ई-कुबेर सिस्टिमनुसार सकाळी १०.३० ते ११.०० पर्यंत सादर करावेत. लिलावाचा निकाल भारतीय रिझर्व्ह बँकेच्या संकेतस्थळावर त्याच दिवशी प्रसिद्ध करण्यात येईल. यशस्वी झालेल्या बीडर्सकडून रकमेचे प्रदान 2 डिसेंबर 2026 रोजी रोखीने, बँकर्स धनादेश/प्रदान आदेश, डिमांड ड्राफ्ट किंवा त्यांच्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, मुंबई येथील खात्यात देय असलेले धनादेश बँकेची कामकाजाची वेळ संपण्यापूर्वी अधिदानाने प्रदान करण्यात येतील.

कर्जरोख्याचा कालावधी 5 वर्षांचा असून, रोख्यांचा कालावधी 27 ऑगस्ट 2026 पासून सुरू होईल, तर कर्जरोख्याची परतफेड दिनांक 27 ऑगस्ट 2031 रोजी पूर्ण किमतीने केली जाईल. व्याजाचा दर हा 7.09 % दरसाल दर शेकडा एवढा असेल. व्याजाचे प्रदान रोख्याच्या मूळ दिनांकापासून मूळ किमतीवर प्रतिवर्षी दि. 27 फेब्रुवारी आणि ऑगस्ट 27 रोजी सहामाही पद्धतीने करण्यात येईल.शासकीय रोख्यांमधील बँकांची गुंतवणूक ही बँकिंग विनियम अधिनियम, १९४९ खालील कलम २४ अंतर्गत सांविधिक रोकड सुलभता गुणोत्तर (SLR) या प्रयोजनार्थ पात्र समजण्यात येईल. हे कर्जरोखे पुन: विक्री-खरेदीसाठी अनुज्ञेय असतील, अशी माहिती वित्त विभागाने दिली आहे.

0000

संबंधित पोस्ट

नागरिकांनी कायद्याचे पालन करून नागपंचमी सण साजरा करावा- पालकमंत्री चंद्रकांत पाटील 

नव्या मुंबईतील कोपरखैरणे येथील इमारतीचा स्लॅब कोसळला – समाजमंदिरात रहिवाशांची निवास व्यवस्था

जगात शांततेसाठीचा मार्ग गुरुंच्या शिकवणीतूनच मिळू शकतो – योगगुरू रामदेव बाबा

ऐतिहासिक निर्णय : शासकीय वैद्यकीय अधिकाऱ्यांना खाजगी प्रॅक्टिस बंदी कायम

जिल्ह्यात दोन दिवसासाठी यलो अलर्ट जारी विजेच्या कडकडाटासह मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता

हिंदु राष्ट्र समन्वय समितीचे प्रसिद्धीपत्रक !‘हलाल मुक्त दिवाळी अभियाना’त सहभागी व्हा ! – हिंदु राष्ट्र समन्वय समितीचे आवाहन खाजगी संस्थांच्या बेकायदेशीर ‘हलाल सक्ती’विरोधात संसदेत आवाज उठवणार! – भाजप खासदार डॉ. अनिल बोंडे

vishwatmaklokswamivarta