vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

महिला व बाल विकास विभागात भरणार ८ हजारांवर पदे

.महिला व बाल विकास विभागात भरणार ८ हजारांवर पदे

अकोला, प्रतिनिधी: महिला व बाल विकास विभागात तब्बल २३ वर्षांनंतर ८ हजार ६६९ नियमित पदे भरण्यात येणार आहेत. या निर्णयामुळे विभागाच्या सक्षमीकरणाला मोठी चालना मिळणार असून, महिला व बालकांसाठीच्या योजनांना गती मिळणार असल्याचा विश्वास महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी व्यक्त केला आहे.

विभागातील एकूण पदांचा आढावा घेण्यात आला. त्यापैकी काही पदे निरसित (रद्द) करून १६५ नव्या पदांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे विभागासाठी एकूण ८ हजार ६६९ नियमित पदे मंजूर करण्यात आली आहेत.

याशिवाय, विभागाच्या कामकाजासाठी २ हजार ८४३ पदे बाह्ययंत्रणेमार्फत भरण्यास मान्यता देण्यात आली आहे.

एकात्मिक बाल विकास सेवा (ICDS) योजनेअंतर्गत १ लाख १० हजार ६६४ अंगणवाडी सेविका व १,१०,६६४ अंगणवाडी मदतनीस, अशी एकूण २ लाख २१ हजार ३२८ मानधनाधारित पदे देखील मंजूर करण्यात आली आहेत.२३ वर्षांनंतर घेतलेला हा महत्त्वपूर्ण निर्णय विभागाच्या सक्षमीकरणासाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. यामुळे महिला व बालकल्याण योजनांची अंमलबजावणी अधिक प्रभावीपणे होईल, असे मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले.

०००

संबंधित पोस्ट

जिल्हा परिषदेच्या १०० शाळांमध्ये वॉटर फिल्टर बसविणार जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांची माहिती

महाराष्ट्र महिलांच्या सन्मानार्थ काम करेल सर्वांनी मिळून संकल्प करुया-राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर

केंद्राकडे प्रलंबित असलेला रोजगार हमी योजनेचा निधी राज्यास तत्काळ मंजूर करावा- : रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले

पंचायत समिती सभापती पद आरक्षण निश्चितीसाठी दि.१६ रोजी बैठक

नागपूर, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर प्राधिकरणांना त्यांच्या हद्दीतील शासकीय जमिनी मिळणार…

सार्वजनिक वितरण व्यवस्थतेतील धान्याच्या काळाबाजारा,विरोधात मोठी संयूक्त कारवाई 250 क्विंटल धान्य जप्त