vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

फार्मर आयडी विना खत वितरण होणार नाही ; शेतकऱ्यांनी तात्काळ नोंदणी करावी..

फार्मर आयडी विना खत वितरण होणार नाही ; शेतकऱ्यांनी तात्काळ नोंदणी करावी..

नांदेड प्रतिनिधी :- केंद्र व राज्य शासनाच्या निर्देशानुसार रासायनिक खतांच्या वितरणात पारदर्शकता आणण्यासाठी फार्मर आयडी (Farmer ID) प्रणाली लागू करण्यात येत आहे. यानुसार, फार्मर आयडी विना कोणत्याही शेतकऱ्याला खत मिळणार नाही. जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांनी शासनाच्या या उपक्रमास सहकार्य करून फार्मर आयडी नोंदणी तात्काळ पूर्ण करावी, जेणेकरून खत वितरण सुरळीत व पारदर्शक पद्धतीने होऊ शकेल, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दतकुमार कळसाईत यांनी केले आहे.

फार्मर आयडी अनिवार्य,शेतकऱ्यांनी खत खरेदीसाठी फार्मर आयडी काढणे बंधनकारक आहे. आयडी शिवाय खत वितरण केले जाणार नाही.

अनुदानित खतांसाठी सक्ती,रासायनिक खतांवरील अनुदानाचा लाभ घेण्यासाठी फार्मर आयडी आवश्यक आहे.

काळाबाजार व लिंकिंग थांबवणेखतांचा काळाबाजार व अनावश्यक लिंकिंग रोखण्यासाठी ही प्रणाली प्रभावी ठरेल. पारदर्शक व नियोजनबद्ध वितरण सुनिश्चित होईल.

 डिजिटल नोंदणी प्रणालीशेतकऱ्यांची माहिती (जमीन, पीक, योजना) डिजिटल स्वरूपात नोंदवली जाईल. खत खरेदी करताना आयडी स्कॅन/क्रमांक वापरला जाईल.

थेट लाभ हस्तांतरण (DBT)खत अनुदान थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होईल. इतर शासकीय योजनांसाठीही फार्मर आयडी आवश्यक राहील. जिल्ह्यात फार्मर आयडी नोंदणी मोहिम सुरू आहे. सर्व तालुक्यांमध्ये जनजागृती व नोंदणी शिबिरे आयोजित करण्यात येत आहेफार्मर आयडी कसा काढावा ?ग्रामपंचायत कार्यालय. सीएससी CSC (कॉमन सर्व्हिस सेंटर). सहाय्यक कृषी अधिकारी / कृषी विभाग कार्यालय

महत्वाच्या सूचना-शेतकऱ्यांनी तात्काळ फार्मर आयडी नोंदणी पूर्ण करावी. खत खरेदी करताना आयडी सोबत ठेवावा. अधिकृत विक्रेत्याकडूनच खत खरेदी करावी व बिल घ्यावे. खरीप हंगाम 2026 पासून हा नियम काटेकोरपणे लागू केला जाणार आहे. सहकारी संस्था व खाजगी विक्रेत्यांमार्फतही याच नियमांनुसार खत वितरण होईल, असेही आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी दत्तकुमार कळसाईत यांनी केले आहे.

00000

संबंधित पोस्ट

भारतीय तिरंगा यात्रा केवळ रॅली नसून देशप्रेमाची भावना – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वरळी सी फेसवर ‘राष्ट्र प्रथम तिरंगा उत्सव’ला उत्स्फूर्त प्रतिसाद

ऑनलाईन मालमत्ता करभरणा प्रणालीला उत्साही प्रतिसाद देत करदात्या नागरिकांमध्ये 15 टक्के वाढ लवकरच अद्ययावत ‘भारत बिल पेमेंट सिस्टम’चाही कर भरण्यासाठी होतोय समावेश..

राज्यपालांच्या हस्ते अनंत कन्हेरे यांचेवरील पुस्तकाचे प्रकाशन

वारणा धरणात 27.72 टी.एम.सी. पाणीसाठा- कोयना धरणातून 11400 क्युसेक्स तर वारणा धरणातून 4060 क्युसेक्स विसर्ग सुरू

माथेरान येथे ई रिक्षा सुरु करण्याची कार्यवाही गतीने करा- पर्यटनमंत्री शंभूराज देसाई

vishwatmaklokswamivarta

कृपया प्रसिद्धिसाठी -युद्धात भारताच्या विजयप्राप्तीसह सैनिक आणि धर्मकार्य,करणारे यांच्या रक्षणार्थ शतचंडी याग पार पडला !* सनातन संस्थेच्या आश्रमात श्री ललिता त्रिशती पूजन !

vishwatmaklokswamivarta