vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

आज रंगणार बुद्ध-भीम गीतांची बहारदार मैफील*समाज कल्याण विभागाचा पुढाकार

आज रंगणार बुद्ध-भीम गीतांची बहारदार मैफील*समाज कल्याण विभागाचा पुढाकार

     अमरावती, प्रतिनिधी : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती उत्सवाचे औचित्य साधून आयोजित ‘सामाजिक समता सप्ताहा’ निमित्त प्रबोधनात्मक कार्यक्रमाची मेजवानी मिळणार आहे. समाज कल्याण विभाग, अमरावतीच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथे बुद्ध-भीम गीतांच्या बहारदार मैफिलीचे आयोजन करण्यात आले आहे.

 डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवनात शुक्रवार, दि. 17 एप्रिल रोजी सायंकाळी 6 वाजता या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे केवळ भारतीय संविधानाचे शिल्पकार नव्हते, तर ते समता, न्याय आणि बंधुतेचे प्रणेते होते. समाजातील अस्पृश्यता, जातीयता आणि भेदभाव नष्ट करण्यासाठी त्यांनी आयुष्यभर लढा दिला. महिला आणि कामगारांच्या हक्कांचे समर्थन करत त्यांनी कायद्याच्या माध्यमातून समाजपरिवर्तनाची चळवळ उभी केली. अशा या थोर युगपुरुषाच्या विचारांचे स्मरण करणे आणि त्यांच्या कार्याला संगीतमय मानवंदना देणे, हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे.

  समाज कल्याण विभागाच्या प्रादेशिक उपायुक्त माया केदार, सहाय्यक आयुक्त राजेंद्र जाधवर यांनी नागरिकांना या प्रबोधनात्मक सोहळ्याला मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाचा आनंद घेण्याचे आवाहन केले आहे.0000000

संबंधित पोस्ट

मतमोजणी प्रक्रिया अचूक, पारदर्शक व शांततेत पार पाडावी – विभागीय आयुक्त जी. श्रीकांत

vishwatmaklokswamivarta

पुणे मेट्रोच्या विस्तारामुळे शहराच्या विकासाला नवी गती मिळणार- प्रधानमंत्री नरेंद्र मोदीदेशातील मेट्रोचे जाळे 1200 किलोमीटरवर; 26 शहरांमध्ये मेट्रो सेवा सुरू‘माण-हिंजवडी ते शिवाजीनगर मार्गिका-3’चे प्रधानमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन आणि ‘पुणे मेट्रो टप्पा-2’चे भूमिपूजनपुणे, पिंपरी-चिंचवड आणि पीएमआर क्षेत्र 2030 पर्यंत देशाचे महत्त्वाचे मोबिलिटी केंद्र बनेल-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

vishwatmaklokswamivarta

प्रकल्प एअर फिश च्या प्रतिनिधींनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

vishwatmaklokswamivarta

मुलुंडमध्ये मेट्रोच्या खांबाचा काही भाग कोसळला, ऑटोवर ढिगारा पडल्याने ३-४ जण जखमी झाल्याचा संशय एकाचा मृत्यू झाल्याची वृत्त

vishwatmaklokswamivarta

जालना जिल्ह्यात ‘गाव दत्तक अभियान’; टंचाईग्रस्त गावांना मिळणार दिलासा-जिल्हाधिकारी आशिमा मित्तल*

vishwatmaklokswamivarta

राष्ट्रवादी (श.प.) ने काढला लाटणे मोर्चा थाळीनाद करीत केंद्र सरकारच्या आर्थिक धोरणांचा निषेध  महागाई विरोधात एल्गार.

vishwatmaklokswamivarta