vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

इतर मागास बहुजन कल्याण विभागात महात्मा ज्योतिराव फुले जयंती उत्साहात साजरी

इतर मागास बहुजन कल्याण विभागात महात्मा ज्योतिराव फुले जयंती उत्साहात साजरी

 

​अहिल्यानगर, प्रतिनिधी : इतर मागास बहुजन कल्याण विभाग, अहिल्यानगर यांच्या वतीने क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव गोविंदराव फुले यांची १९९ वी जयंती आज सहाय्यक संचालक कार्यालय, मुला-मुलींची वसतिगृहे तसेच आश्रमशाळेत अत्यंत उत्साहात साजरी करण्यात आली.

या वर्षी ११ एप्रिल २०२६ ते ११ एप्रिल २०२७ या कालावधीत महात्मा फुले यांचे २०० वे जयंती वर्ष साजरे करण्यात येत असून, त्यानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. ​यावेळी सहाय्यक संचालक श्री. विनोद लोंढे व ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या बेबीताई गायकवाड उपस्थित होत्या. कार्यक्रमाच्या प्रारंभी महात्मा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला.

सहाय्यक संचालक विनोद लोंढे यांनी जयंतीनिमित्त शुभेच्छा देत महात्मा फुले यांच्या क्रांतिकारी कार्याचा आढावा घेतला. तसेच बहुजन कल्याण विभागाच्या ध्येयधोरणांबाबत व भविष्यातील कार्ययोजनेविषयी मार्गदर्शन केले.

प्रमुख पाहुण्या बेबीताई गायकवाड यांनी आपल्या प्रेरणादायी भाषणातून महात्मा फुले यांचे स्त्रीशिक्षण, सामाजिक न्याय व बहुजन उत्थान याबाबतचे विचार प्रभावीपणे मांडले.जयंतीनिमित्त मुला-मुलींच्या वसतिगृहात तसेच आश्रमशाळेत निबंध व वक्तृत्व स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी महात्मा फुले यांच्या विचारांवर आधारित उत्कृष्ट निबंध व भाषणे सादर केली. स्पर्धेतील विजेत्यांना क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले व सावित्रीबाई फुले यांचे समग्र वाङ्मय भेट देऊन गौरविण्यात आले.कार्यक्रमाचा समारोप निरीक्षक श्री. तुकाराम कातकडे यांनी केला. यावेळी सर्व उपस्थितांनी महात्मा फुले यांच्या विचारांना आचरणात आणण्याचा तसेच सामाजिक समता व बहुजन कल्याणाच्या कार्याला गती देण्याचा संकल्प केला.या कार्यक्रमास विभागातील सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

संबंधित पोस्ट

साप्ताहिक व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशीही भरता येणार मालमत्ता कर-नवी मुंबई महानगरपालिकेकडून नागरिकांसाठी खास सुविधा

जिल्ह्यात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत ३८ हजार ३९० शेतकऱ्यांची ४१ हजार ४२१ कर्ज खाती पोर्टलवर अपलोड, ॲग्रीस्टॅक नोंदणी नसलेल्या शेतकऱ्यांनी ॲग्रीस्टॅक नोंदणी करुन घ्यावी-जिल्हा उपनिबंधक संजयकुमार सुद्रीक

अनंत चतुर्दशीदिनीच्या पार्श्वभूमीवर सज्ज विसर्जन स्थळांची आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांनी केली पाहणी

vishwatmaklokswamivarta

संभाव्य टंचाई व दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमिवर पशुपालकांनी पशुधनाचा विमा तातडीने काढून घ्यावा – जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष..

vishwatmaklokswamivarta

कडधान्य आत्मनिर्भरता अभियानांतर्गत प्रक्रिया युनिट करीता अर्ज सादर करावेत

जनसेवेसाठी तत्पर लोकनेता, सहृदय मित्र गमावला : आ सुधीर मुनगंटीवार यांची शोकभावना

vishwatmaklokswamivarta