vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

केईएम रुग्णालयात अत्याधुनिक ‘व्हेसल सीलर’ उपकरणांची उपलब्धता; गरीब रुग्णांना शस्त्रक्रियेत दिलासा मिळणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सार्वजनिक आरोग्य सेवेला बळ; शस्त्रक्रियांची अचूकता आणि सुरक्षितता वाढणार

केईएम रुग्णालयात अत्याधुनिक ‘व्हेसल सीलर’ उपकरणांची उपलब्धता; गरीब रुग्णांना शस्त्रक्रियेत दिलासा मिळणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सार्वजनिक आरोग्य सेवेला बळ; शस्त्रक्रियांची अचूकता आणि सुरक्षितता वाढणार

मुंबई प्रतिनिधी

राज्यातील सार्वजनिक आरोग्य व्यवस्था अधिक सक्षम आणि सर्वसामान्यांना दर्जेदार उपचार मिळावेत या उद्देशाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. मुंबईतील सेठ जी. एस. मेडिकल कॉलेज आणि केईएम रुग्णालय येथे अत्याधुनिक ‘हाय-एंड व्हेसल सीलर’ (Vessel Sealer) उपकरणे उपलब्ध करून देण्यात आली असून, यामुळे शस्त्रक्रियांच्या गुणवत्तेत मोठी सुधारणा होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राबविण्यात आलेल्या या उपक्रमामुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील रुग्णांना अत्याधुनिक उपचार सुविधा मिळणार आहेत. या सीएसआर प्रकल्पांतर्गत दोन प्रगत इलेक्ट्रोसर्जिकल युनिट्स जनरल सर्जरी विभागासाठी ‘इलेक्टिव्ह सर्जरी ओटी’ जमेशदजी मेहता शस्त्रक्रिया कक्षामध्ये बसविण्यात आले आहेत.

 

केईएम रुग्णालय हे मुंबईतील सर्वात मोठ्या सार्वजनिक आरोग्यसंस्थांपैकी एक असून येथे दररोज हजारो गरजू रुग्ण उपचारासाठी येतात. अशा परिस्थितीत अत्याधुनिक उपकरणांची गरज अत्यंत महत्त्वाची होती. नव्याने बसविण्यात आलेली ही उपकरणे शस्त्रक्रियेदरम्यान रक्तस्त्राव नियंत्रणासाठी उपयुक्त ठरणार असून रक्तवाहिन्या सील करून रक्तस्राव त्वरित थांबवण्यास मदत करतात. या उपकरणांमुळे शस्त्रक्रियेची अचूकता वाढेल, गुंतागुंत कमी होईल आणि रुग्णांच्या सुरक्षिततेत मोठी वाढ होईल. विशेषतः जटिल शस्त्रक्रियांमध्ये रक्तस्राव कमी होऊन डॉक्टरांना अधिक कार्यक्षमतेने उपचार करता येणार आहेत. या उपक्रमासाठी इंडियन ऑइल कंपनीने सहकार्य केले आहे त्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आभार व्यक्त केले आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत सांगितले की, ‘राज्यातील प्रत्येक नागरिकाला गुणवत्तापूर्ण आणि अत्याधुनिक आरोग्य सेवा मिळणे ही शासनाची प्राथमिकता आहे. अशा प्रकल्पांमुळे सार्वजनिक रुग्णालयांची क्षमता वाढून गरजू रुग्णांना मोठा दिलासा मिळतो.’ या उपक्रमामुळे केवळ आरोग्य सेवेची गुणवत्ता उंचावणार नाही, तर गरीब आणि वंचित घटकांसाठी आधुनिक वैद्यकीय सुविधांचा मार्गही अधिक सुलभ होणार आहे

संबंधित पोस्ट

जिल्ह्यात १५ दिवस जमावबंदी* 

राजर्षी शाहूंना कृतज्ञ अभिवादन : ट्रस्टतर्फे दसरा चौकात पुष्पांजली

जालना येथील ऑल इंडिया केमिस्ट यांनी अखिल भारतीय केमिस्ट असोसिएशन च्या देशपातळीवरील बंद 

जिल्हा परिषद, पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक-2026जिल्ह्यात एकूण 191 टेबलवर 122 फेऱ्यांमध्ये होणार मतमोजणी- मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज जिल्ह्यात सरासरी 69.76 टक्के इतके मतदान …

vishwatmaklokswamivarta

नीट-युजी फेरपरीक्षा पारदर्शक वातावरणात पार पाडण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज- जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष- जिल्ह्यात 10 परीक्षा केंद्रे, 4572 परीक्षार्थी- सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करण्याच्या सूचना- केंद्रांवर चोख सुरक्षा व्यवस्था तैनात

देशनिहाय स्किल पासपोर्ट, अद्ययावत प्रशिक्षण आणि सुरक्षित भरती प्रक्रियेवर राज्य शासनाचा भर;महाराष्ट्रासाठी जागतिक कार्यबल गतीशिलता धोरण २०२६ जाहीर- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

vishwatmaklokswamivarta