vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

तामिळनाडूतील मदुराई येथील तिरुपरंकुंद्रम पर्वतावरील दीपप्रज्वलनाच्या मुद्द्यावरून दीपप्रज्वलन वादाचे मुंबईत पडसाद; धारावीत आज भाजपकडून निषेध आंदोलन..

तामिळनाडूतील मदुराई येथील तिरुपरंकुंद्रम पर्वतावरील दीपप्रज्वलनाच्या मुद्द्यावरून दीपप्रज्वलन वादाचे मुंबईत पडसाद; धारावीत आज भाजपकडून निषेध आंदोलन…

मुंबई प्रतिनिधी धारावी-तामिळनाडूतील मदुराई येथील तिरुपरंकुंद्रम पर्वतावरील दीपप्रज्वलनाच्या मुद्द्यावरून दीपप्रज्वलन वादाचे मुंबईत पडसाद; धारावीत आज भाजपकडून निषेध आंदोलन,

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाच्या अंमलबजावणीचा मुद्दा उपस्थित; भाजपचे धारावी विधानसभा मंडळ अध्यक्ष रमेश एन. नाडार यांच्या नेतृत्वाखाली आंदोलनाचे आयोजन

मुंबई, धारावी : तामिळनाडूतील मदुराई येथील तिरुपरंकुंद्रम पर्वतावरील दीपप्रज्वलनाच्या मुद्द्यावरून निर्माण झालेल्या वादाचे पडसाद आता मुंबईतही उमटू लागले आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या अंतरिम आदेशानंतरही पर्वतावरील निर्धारित दीपथून या ठिकाणी दीप प्रज्वलित न झाल्याच्या प्रकरणावरून धार्मिक आणि राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. या घटनेच्या निषेधार्थ भारतीय जनता पार्टीच्या वतीने गुरुवार, २६ नोव्हेंबर रोजी मुंबईतील धारावी येथे निषेध आंदोलन आयोजित करण्यात आले आहे.

तामिळनाडूतील मदुराईजवळ असलेल्या तिरुपरंकुंद्रम पर्वताला धार्मिक आणि ऐतिहासिक महत्त्व आहे. या पर्वतावरील दीपथून या दगडी स्तंभावर कार्तिगाई दीपम उत्सवानिमित्त पारंपरिक पद्धतीने दीप प्रज्वलित करण्याच्या मुद्द्यावरून वाद निर्माण झाला. या प्रकरणी मद्रास उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानंतर प्रकरण सर्वोच्च न्यायालयात पोहोचले.

२० नोव्हेंबर २०२६ रोजी सर्वोच्च न्यायालयाने यंदाच्या कार्तिगाई दीपम उत्सवानिमित्त २४ नोव्हेंबर रोजी संबंधित दीपथून येथे एकदाच दीप प्रज्वलित करण्यास अंतरिम परवानगी दिली होती. मात्र, प्रत्यक्ष उत्सवाच्या दिवशी निर्धारित दीपस्तंभावर दीप प्रज्वलित न होता मंदिराच्या पारंपरिक दीपमंडपात दीप प्रज्वलित करण्यात आला. त्यामुळे न्यायालयाच्या आदेशाच्या अंमलबजावणीबाबत प्रश्न उपस्थित झाले असून या प्रकरणाने पुन्हा एकदा वादाचे स्वरूप घेतले आहे.

या पार्श्वभूमीवर तमिळनाडू सरकारच्या भूमिकेचा निषेध करण्यासाठी मुंबईतील धारावी येथे भाजपच्या वतीने आंदोलन करण्यात येणार आहे.भाजपचे धारावी विधानसभा मंडळ अध्यक्ष श्री. रमेश एन. नाडार यांच्या वतीने या आंदोलनाचे आयोजन करण्यात आले आहे. हिंदू धर्मीयांच्या धार्मिक श्रद्धेचा सन्मान राखला जावा आणि सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा योग्य प्रकारे आदर व अंमलबजावणी व्हावी, अशी भूमिका आंदोलनाच्या आयोजकांनी मांडली आहे.या निषेध आंदोलनात हिंदू बांधव, भक्तगण आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन श्री. रमेश एन. नाडार यांनी केले आहे.

आंदोलनाचा स्थळ- आज: गुरुवार, २६ नोव्हेंबर २०२६- वेळ: सायंकाळी ५ वाजता- स्थळ: शक्ती विनायकर मंदिराजवळ, ९० फूट रोड, धारावी, मुंबई- आयोजक: श्री. रमेश एन. नाडार, मंडळ अध्यक्ष – धारावी विधानसभा, भारतीय जनता पार्टी (BJP),तिरुपरंकुंद्रम येथील दीपप्रज्वलनाचा वाद आता स्थानिक पातळीपुरता मर्यादित न राहता देशातील विविध भागांत चर्चेचा विषय बनला आहे. धार्मिक श्रद्धा, न्यायालयीन आदेश आणि प्रशासनाची भूमिका या मुद्द्यांवर पुढील घडामोडींकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

संबंधित पोस्ट

राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या मुंबईतील स्मारकासाठी उपसभापती सचिन अहिर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक ५० वर्षांच्या मागणीला गती

जानकी महोत्सव -2026 व मिनी सरस विक्री प्रदर्शनाचे आयोजन;नागरिकांना मोठ्या संख्येने उपस्थित राहून लाभ घेण्याचे आवाहन

रावणाचे महिमामंडन आणि प्रभु श्रीरामांचा अपमान करणाऱ्या ‘रामायण’ चित्रपटाविरोधात दादर, मुंबई येथे आंदोलन,आक्षेपार्ह दृश्ये हटवून चित्रपटाची पुनर्तपासणी करण्याची मागणी ! निशस्त्र रावण हजारोंशी लढतो; शस्त्रधारी श्रीराम-लक्ष्मण राक्षसांना पाहून पळतात? रामायणाचा असा विपर्यास हिंदुस्थान सहन करणार नाही !-हिंदु जनजागृती समिती

vishwatmaklokswamivarta

पुणे जिल्ह्यातील तळेगाव ते चाकण 4 पदरी उन्नत महामार्गास मान्यता-राज्यातील सुलभ दळणवळणासाठी महामार्गाचे जाळे विकसित करण्याचे निर्देश- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस• पायाभूत सुविधा समिती बैठक संपन्न

महावितरणचा वीजचोरांना दणका! राज्यभरात तीन दिवसात 250 वीजचोरीची प्रकरणे उघड6 कोटी 27 लाख रुपयांच्या वीजचोरीचा सुरक्षा व अंमलबजावणी विभागाकडून पर्दाफाश..

vishwatmaklokswamivarta

सायबर विश्वात मुलींना जाळ्यात ओढणाऱ्या विकृताला 5 वर्षे सक्तमजुरी-बनावट फेसबुक खात्याद्वारे अल्पवयीन मुलींचा विनयभंग करणाऱ्या मंगेश तांबेला ठाणे न्यायालयाचा दणका; 50 हजार रुपयांचा दंड पीडितांना देण्याचे आदेश…