vishwatmaklokswamivarta
Breaking News
इतर

नवी मुंबई पालिका मुख्यालयात बॉम्ब ठेवला असल्याच्या प्राप्त संदेशाच्या पार्श्वभूमीवर शोध पथक व श्वानामार्फत काटेकोर तपासणीअंती संशयास्पद वस्तू आढळली नाही   

नवी मुंबई पालिका मुख्यालयात बॉम्ब ठेवला असल्याच्या प्राप्त संदेशाच्या पार्श्वभूमीवर शोध पथक व श्वानामार्फत काटेकोर तपासणीअंती संशयास्पद वस्तू आढळली नाही

 

       नवी मुंबई प्रतिनिधी-   नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालयात बॉम्ब ठेवला असल्याच्या ई मेलव्दारे प्राप्त झालेल्या संदेशाच्या अनुषंगाने अतिरिक्त आयुक्त श्री.सुनिल पवार यांनी सदर संदेशाची माहिती त्वरित नवी मुंबईच्या महापौर, महापालिका आयुक्त, पोलीस आयुक्त तसेच पोलीस यंत्रणेस दिली.  त्या अनुषंगाने तातडीने कार्यवाही करीत पोलीस विभागाच्या मानक कार्यप्रणाली (SOP) नुसार महापालिका मुख्यालय संपूर्ण खाली करण्याच्या सूचना तातडीने निर्गमित करण्यात आल्या व मध्यवर्ती ध्वनीक्षेपक यंत्रणेव्दारे मुख्यालयात उपस्थित लोकप्रतिनिधी, अधिकारी, कर्मचारी, अभ्यागत यांना त्वरित मुख्यालयाबाहेर पडण्याच्या सूचना देण्यात आल्या.

 यानंतर पोलीस यंत्रणा आणि महापालिका सुरक्षा रक्षकांच्या सहकार्याने मुख्यालय इमारत काही मिनिटातच खाली करून घेण्यात आली. यावेळी अतिरिक्त आयुक्त श्री.सुनिल पवार, आपत्कालीन विभागाच्या उपआयुक्त श्रीम.स्मिता काळे, शहर अभियंता श्री.शिरीष आरदवाड यांनी संयमाने परिस्थिती हाताळली व मुख्यालय इमारत संपूर्ण रिकामी करून घेतली. याप्रसंगी महापौर श्रीम.सुजाता पाटील यांनीही उपस्थित रहात परिस्थिती नियंत्रणात राखण्यात पुढाकार घेतला.

प्राप्त खबरीनुसार तत्परतेने घटनास्थळी पोहोचलेल्या नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या बॉम्ब शोधक व नाशक पथकाने सर्व सूत्रे आपल्या हाती घेऊन नवी मुंबई पोलीस आणि महापालिका सुरक्षारक्षक व आपत्कालीन कर्मचारी, अभियंते यांची 4 पथके तयार करून बॉम्ब शोध कार्यवाही सुरू केली. साधारणत: 3 तासाच्या शोधक कारवाईमध्ये या पथकांनी बेसमेंटमधील वाहनतळापासून तळमजला ते सातवा मजल्यावरील कानाकोपरा पिंजून काढला. बॉम्ब शोध पथकासोबत जॅक नामक श्वानानेही सर्व मजल्यांवरील शोधकार्यात महत्वाचा सहभाग नोंदविला. सदर शोधकार्यात त्यांना कोणतीही संशयास्पद वस्तू आढळली नाही.

    पथकाच्या प्रमुख पोलीस निरीक्षक श्रीम.अश्विनी कुसुरकर व सहा. पोलीस निरीक्षक श्री.नवले आणि त्यांचे सहकारी तसेच एनआरआय पोलीस ठाण्याचे प्र.वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री.संजय लाड आणि त्यांच्या सहका-यांनी यामध्ये तत्परतेने महत्वाची कामगिरी केली.    ई मेलव्दारे प्राप्त या संदेशाच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालयाची सुरक्षा व्यवस्था पोलीसांच्या सहयोगाने अधिक काटेकोर करण्यात येत असून यापुढे नागरिकांनी मुख्यालयात कामासाठी येताना आपले सक्षम ओळखपत्र सोबत आणावे असे आवाहन नवी मुंबई महानगरपालिका सुरक्षा व आपत्कालीन व्यवस्थापन विभागाच्या वतीने करण्यात येत आहे. . 27 नोव्हेंबर रोजी नमुंमपा मुख्यालयातील कामकाज सुरू राहणार आहे याची नोंद घ्यावी असेही नमुंमपा प्रशासनामार्फत सूचित करण्यात आले आहे.

संबंधित पोस्ट

चौकशी अहवालातील ‘एमपीएससी’ अधिकाऱ्यांचा उल्लेख अनावधानाने; पोलिसांकडून स्पष्टीकरण .

vishwatmaklokswamivarta

ठाण्यातील काही भागात गुरूवारपासून पाणी नाही

vishwatmaklokswamivarta

मजुरांच्या हाताला काम, गावांच्या #विकासाला गती!#अहिल्यानगर जिल्ह्यात 52 हजार 660 कामांचे नियोजन,रोजगारनिर्मितीवर भर ‘मागेल त्याला काम’साठी स्वतंत्र हेल्पलाई

vishwatmaklokswamivarta

विश्वबंधुत्वाचा भाव प्रदर्शीत करणारा महाराष्ट्राचा 59वा निरंकारी संत समागम भव्य रुपात संपन्न

vishwatmaklokswamivarta

मतदानाचे आवाहन करणा-या मतदान यंत्राच्या मॅस्कॉटला नवी मुंबईकर नागरिकांची पसंती

अचूक मतदार यादीसाठी नागरिकांनी सहकार्य करावे-जिल्हाधिकारी किशन जावळे**प्रारुप मतदार यादी प्रसिद्ध; नावांबाबत हरकती व दावे असल्यास सादर करावेत*

vishwatmaklokswamivarta