vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

प्रभु श्रीरामांच्या शौर्याचा अवमान आणि रावणाचे उदात्तीकरण करणाऱ्या ‘रामायण’ चित्रपटाविरोधात सानपाडा येथे आंदोलन,आक्षेपार्ह दृश्ये हटवून चित्रपटाची पुनर्परीक्षण करण्याची मागणी !

प्रभु श्रीरामांच्या शौर्याचा अवमान आणि रावणाचे उदात्तीकरण करणाऱ्या ‘रामायण’ चित्रपटाविरोधात सानपाडा येथे आंदोलन,आक्षेपार्ह दृश्ये हटवून चित्रपटाची पुनर्परीक्षण करण्याची मागणी !

 

  नवी मुंबई प्रतिनिधी- नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘रामायण’ चित्रपटात मूळ रामायणातील प्रसंगांचा विपर्यास करून रावणाचे उदात्तीकरण करण्यात आले आहे, तर प्रभु श्रीराम, माता सीता आणि लक्ष्मण यांच्या आदर्श व्यक्तिरेखांचे अवमूल्यन करण्यात आले आहे. कोट्यवधी हिंदूंचे श्रद्धास्थान असलेल्या रामायणाची अशा प्रकारे मोडतोड करून त्यातून विशिष्ट वैचारिक अजेंडा पुढे रेटण्याचा प्रयत्न हिंदू समाज कदापि सहन करणार नाही. या चित्रपटातील आक्षेपार्ह दृश्ये आणि संवाद तातडीने हटवावेत, तसेच आगामी भाग प्रदर्शित करण्यापूर्वी त्याचे संत, रामायणाचे अभ्यासक आणि धर्मशास्त्रांच्या जाणकारांसमोर परीक्षण करावे, या मागण्यांसाठी २५ नोव्हेंबरला सानपाडा रेल्वे स्थानकाबाहेर हिंदु जनजागृती समितीच्या वतीने हिंदु राष्ट्र-जागृती आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात हिंदुत्वनिष्ठ संघटना, धर्मप्रेमी नागरिक आणि रामभक्त मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. हिंदू जनजागृती समितीचे प्रवक्ता डॉ.उदय धुरी, समितीच्या रणरागिणी शाखेच्या सौ. प्रविणा पाटील यांच्यासह विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या प्रतिनिधींनी यावेळी संबोधित केले. या वेळी केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाला यासंदर्भात देण्यात येणाऱ्या निवेदनावर मोठ्या संख्येने नागरिकांनी स्वाक्षऱ्या करून निवेदनातील मागण्यांना पाठिंबा दर्शविला. यावेळी सावरकर विचार मंचाचे श्री. संतोष कानडे म्हणाले की, प्रभू सर्वांचे श्रीराम आदर्श आहे. रामायण हा धर्म ग्रंथातील लिखाणाशी हा छेडछाड करण्याचा प्रयत्न होत आहे. यामध्ये रावणाचे उदात्तीकरण दाखवून निर्मात्याने अक्षम्य अपराध केला. एक षड्यंत्र षड्यंत्र आहे.चित्रपटातील काही दृश्ये पाहिल्यावर हा रामायणाचा चित्रपट आहे की रावणाचे उदात्तीकरण करणारी कथा,असा प्रश्न पडतो !

  चित्रपटात अस्त्रशस्त्रांनी सज्ज असलेले प्रभु श्रीराम, लक्ष्मण आणि माता सीता राक्षसांना पाहून पळ काढत असल्याचे दाखवण्यात आले आहे; तर दुसरीकडे निशस्त्र रावण हजारो सैनिकांशी एकटाच लढून त्यांचा वध करत असल्याचे चित्रण करण्यात आले आहे. गरिबांना सोन्याची घरे देणारा आणि शोषितांचा तारणहार म्हणून रावणाची प्रतिमा उभी केली आहे. शूर्पणखेचा पती विद्युत्जिव्ह याची एका दासीची छेड काढल्यामुळे हत्या करणारा रावण महिलांचा रक्षक असल्याचे दाखवण्यात आले आहे; मात्र त्यानेच माता सीतेचे अपहरण केल्याचे वास्तव दुर्लक्षित केले आहे.  शूर्पणखेच्या प्रसंगात लक्ष्मणाने तिचे नाक कापल्यावर माता सीता लक्ष्मणाला ‘एका स्त्रीच्या रूपाचा भंग करण्याचा तुम्हाला अधिकार नाही’, अशा आशयाचे बोल सुनावतात, असे दाखवले आहे. प्रभु श्रीराम खर-दूषण यांच्याजवळ लक्ष्मणाच्या कृतीविषयी क्षमायाचना करतात, असेही चित्रण आहे. लक्ष्मणाला उद्धट, उपरोधिक आणि ज्येष्ठांचा अनादर करणारे दाखवले आहे. माता सीता राक्षसांशी युद्ध करतांना दाखवल्या आहेत; मात्र रावण अपहरण करतांना त्या प्रतिकार करत नाहीत. अशा अनेक प्रसंगांमधून मूळ रामायणातील कथन आणि व्यक्तिरेखांशी विसंगत चित्र उभे करण्यात आले आहे. हा केवळ कल्पनाविलास नसून रामायणातील आदर्शांचे विकृतीकरण आहे.

सेन्सॉर बोर्डातील अधिकारी नेमके काय पाहून प्रमाणपत्र देतात?  सिनेमॅटोग्राफ अधिनियमाच्या कलम ५-ब आणि केंद्र शासनाच्या चित्रपट प्रमाणन मार्गदर्शक तत्त्वांनुसार धार्मिक समूहांचा अवमान करणारी दृश्ये आणि संवाद यांना प्रतिबंध आहे, असे असताना या चित्रपटातील आक्षेपार्ह प्रसंगांना प्रमाणनाच्या निकषांनुसार योग्य कसे ठरवण्यात आले? जेव्हा एखादा धार्मिक विषयावर चित्रपट येतो, तेव्हा तो योग्य संदर्भ आणि इतिहास यांना धरून आहे कि नाही, हे पडताळणे ही सेन्सॉर बोर्डाची जबाबदारी आहे. सेन्सॉर बोर्डातील अधिकारी मग नेमके काय पाहून प्रमाणपत्र देतात? अशा प्रश्न या आंदोलनात उपस्थित करण्यात आला. अन्य धर्मांच्या धार्मिक भावना दुखावणाऱ्या चित्रपटांच्या विरोधाची दखल घेतली जाते; मग हिंदूंच्या श्रद्धांचा विषय आल्यावरच प्रमाणन मंडळाची भूमिका उदासीन का असते? या प्रकरणात मंडळाने चित्रपटाचे पुनर्परीक्षण करून आपली भूमिका स्पष्ट करावी. या गंभीर प्रकाराविरोधात कायदेशीर पाऊल उचलत हिंदु जनजागृती समितीचे प्रवक्ते श्री. सतीश कोचरेकर यांनी मुंबईतील मुलुंड (प.) पोलीस ठाणे, मुंबई येथे चित्रपटाचे निर्माते श्री. नमित मल्होत्रा आणि दिग्दर्शक श्री. नितेश तिवारी यांच्याविरुद्ध अधिकृत पोलीस तक्रारही दाखल केली आहे. कलात्मक स्वातंत्र्याच्या नावाखाली हिंदूंच्या श्रद्धास्थानांचे आणि पूजनीय पात्रांचे जाणीवपूर्वक अपमानजनक चित्रण हिंदु समाज कदापि सहन करणार नाही. रामायण हा मनोरंजनासाठी मनमानी बदल करण्याचा विषय नाही. केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाने या आंदोलनाची गांभीर्याने दखल घेऊन तातडीने कार्यवाही करावी, अशी ठाम मागणी आंदोलनकर्त्यांनी केली.डॉ. उदय धुरी,प्रवक्ता, हिंदु जनजागृती समितीसंपर्क : 9967671027

——

संबंधित पोस्ट

इयत्ता अकरावी प्रवेश प्रक्रिया : नियमित दुसऱ्या फेरीचे वेळापत्रक जाहीर ६ ते ९ जूनदरम्यान पसंतीक्रम नोंदविण्याची संधी; १३ जूनला प्रवेश वाटप यादी प्रसिद्ध होणार

कौशल्य प्रशिक्षण पूर्ण केलेल्या जिल्हा कारागृहातील बंद्यांना-जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्याहस्ते प्रमाणपत्र वितरण कार्यक्रम संपन्न 

अधिकाऱ्यांनी लोकमान्यता मिळेल असे प्रशासकीय कार्य करावे – मंत्री चंद्रकांत (दादा) पाटील

नमुंमपा पोषण पुनर्वसन केंद्रातून कुपोषित बालकांसाठी प्रभावी उपचार व पोषण पुनर्वसन सेवा

vishwatmaklokswamivarta

महिलांसाठी खुशखबर- ठाणे जिल्ह्यातील 48 हजार शिधापत्रिकाधारक कुटुंबांना मिळणार मोफत साड्या

पीएमआरडीए’ची संकटमोचक टीम; शेकडो नागरिकांचे जीव वाचविण्यात यश…!!