vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

बारामती विधानसभा पोटनिवडणुकीतील उमेदवारांच्या खर्चाची दुसरी तपासणी पूर्ण

बारामती विधानसभा पोटनिवडणुकीतील उमेदवारांच्या खर्चाची दुसरी तपासणी पूर्ण

पुणे प्रतिनिधी-आगामी २३ एप्रिल रोजी होणाऱ्या बारामती विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक खर्चावर काटेकोर नियंत्रण ठेवण्यासाठी नियुक्त खर्च निरीक्षक बनोत अखिल रामनाईक यांनी उमेदवारांच्या दैनंदिन निवडणूक खर्चाची दुसरी तपासणी आज पूर्ण केली.

या पोटनिवडणुकीत एकूण २३ उमेदवार निवडणूक रिंगणात असून, निवडणूक कालावधीत त्यांच्या खर्चाची एकूण तीन टप्प्यांत तपासणी करण्यात येत आहे. त्यानुसार पहिली तपासणी १३ एप्रिल रोजी पार पडली होती, तर दुसरी तपासणी १७ एप्रिल रोजी पूर्ण झाली आहे. तिसरी आणि अंतिम तपासणी २१ एप्रिल रोजी होणार आहे.

आज झालेल्या तपासणीदरम्यान २३ पैकी २२ उमेदवारांनी आतापर्यंतचा दैनंदिन निवडणूक खर्चाचा अहवाल खर्च निरीक्षकांकडे सादर केला. सादर करण्यात आलेल्या खर्चाच्या नोंदींची सखोल पडताळणी करण्यात आली. यावेळी सहाय्यक खर्च निरीक्षक सुरेंद्र वाघमारे, संजय शेलार, खर्च पथक प्रमुख तुषार मोरे, व्हिडिओ व्हिजिलन्स टीम (VVT) प्रमुख श्री. लोदडे तसेच खर्च पथकातील सदस्य अशोक शिरतोडे, स्वप्नील आपुणे, स्वाती दराडे, अक्षय मांडवे, प्राची सपकाळ आणि सागर जगताप उपस्थित होते.

यावेळी निरीक्षक रामनाईक यांनी अकाउंटिंग, व्हिडिओ व्हिजिलन्स टीम (VVT), व्हिडिओ सर्व्हेलन्स टीम (VST) तसेच तक्रार निवारण पथक यांच्या कामकाजाचा आढावा घेतला. संबंधित विभागांनी परस्पर समन्वय साधून पारदर्शक आणि निष्पक्ष निवडणूक प्रक्रिया राबवावी, अशा सूचना त्यांनी दिल्या.

0000

संबंधित पोस्ट

हक्काच्या अधिकृत घरांच्या चाव्या मिळेपर्यंत स्वस्थ बसणार नाही – हणमंत जगदाळे,क्लस्टर, डीपी रोड आणि रिंग मेट्रो प्रकल्पाला गती देण्याचा ठामपा सभागृह नेते हणमंत जगदाळे यांचा निर्धार,लोकमान्यनगर-शास्त्रीनगरवासियांचा निर्धार मेळावा उत्साहात संपन्न

vishwatmaklokswamivarta

अर्थसंकल्प आणि महिला सक्षमीकरण : सर्वसमावेशक विकासाचा नवा आराखडा

ड्रोन उड्डाणास प्रतिबंध

बारावी जीवशास्त्रची परीक्षा जिल्ह्यातील 109 परीक्षा केंद्रावर सुरळीत : जिल्हाधिकारी राहूल कर्डिले· कंधार तालुक्यात पानभोसी केंद्रावर पेपर संपेपर्यंत जिल्हाधिकाऱ्यांची उपस्थिती· जिल्ह्यात 98.24 टक्के विद्यार्थ्यांची उपस्थिती  जिल्हास्तरावरील अधिकाऱ्यांच्या भरारी पथकामार्फत निगरानी…

ज्येष्ठ नागरिक दिनाचे औचित्य साधून विविध कला- क्रीडा स्पर्धात्मक उपक्रमांचे आयोजन       

vishwatmaklokswamivarta

श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या त्यागात देश सदैव ऋणात – केंद्रीय गृहमंत्री Amit Shah