vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

राज्यातील ३,८३२ अंगणवाड्या होणार ‘स्मार्ट’ – मंत्री आदिती तटकरे

राज्यातील ३,८३२ अंगणवाड्या होणार ‘स्मार्ट’ – मंत्री आदिती तटकरे

मुंबई, प्रतिनिधी : राज्यातील अंगणवाडी केंद्रात देण्यात येणाऱ्या सेवांमध्ये आधुनिक शैक्षणिक साहित्य आणि पायाभूत सुविधांची सुधारणा करत ३,८३२ अंगणवाड्यांना ‘स्मार्ट अंगणवाडी’ करण्यास मान्यता देण्यात आली असल्याची माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे.

अंगणवाडी केंद्रांमधून ० ते ६ वर्षे वयोगटातील बालकांना पोषण, आरोग्य, पूर्वप्राथमिक शिक्षण तसेच गर्भवती महिला, स्तनदा मातांना पोषण,आरोग्याशी संबंधित सेवा दिल्या जातात. आदर्श अंगणवाडी केंद्र तयार करून त्यात आधुनिक सुविधा देत बालकांना आनंददायी, सुरक्षित आणि गुणवत्तापूर्ण वातावरण उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने स्मार्ट अंगणवाडी संकल्पना राबविण्यात येत आहे. शासकीय जागेत विद्युत जोडणी उपलब्ध असलेल्या केंद्रांचा विचार करून ३,८३२ अंगणवाडी केंद्रांना स्मार्ट करण्यासाठी मान्यता देण्यात आली आहे

या योजनेअंतर्गत अंगणवाडी केंद्रांना उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या स्मार्ट अंगणवाडी किटमध्ये विविध आधुनिक सुविधा आणि साहित्याचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये ई-लर्निंगसाठी आवश्यक हार्डवेअर व सॉफ्टवेअर, स्वच्छ भारत किट, वॉटर प्युरिफायर, हात धुण्यासाठी बेसिन सुविधा, अंगणवाडी इमारतीची रंगरंगोटी, इमारतीची आवश्यक किरकोळ दुरुस्ती, रेन वॉटर हार्वेस्टिंग तसेच स्वयंपाकघराचे आधुनिकीकरण याबाबींचा समावेश आहे.

अंगणवाडी केंद्रांमधील सुविधा आधुनिक आणि सक्षम करण्यासाठी टप्प्याटप्प्याने स्मार्ट अंगणवाड्यांची निर्मिती करण्यात येत असून बालकांच्या पोषण, आरोग्य आणि प्रारंभिक शिक्षणासाठी अधिक गुणवत्तापूर्ण वातावरण उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न असल्याचे मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले

००००

संबंधित पोस्ट

यलो अलर्ट; सोजिल्ह्यातसाट्याचा वारा,पावसाची शक्यता दक्षता घेण्याचे प्रशासनाचे आवाहन

आपण करत असलेले काम ही देशसेवा – राज्यपाल आचार्य देवव्रत ‘एचएएल’च्या तंत्रज्ञांचे राज्यपालांकडून कौतुक

धक्कादायक: न्यायासाठी महिलेचे आमरण उपोषण!गुंड प्रवृत्तीच्या लोकांपासून जीवितास धोका; प्रशासनाने तात्काळ दखल घेण्याची महिलेची मागणी..

मुंबईत 27 व 28 मार्च रोजी वैद्यकीय परिषद ‘पल्स’ चे आयोजन’पल्स’ परिषदेच्या माध्यमातून वैद्यकीय वेलनेस पर्यटनाचा ‘महाराष्ट्र ब्रँड’ निर्माण करा-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

vishwatmaklokswamivarta

सांगली जिल्ह्यातील वाळवे तालुक्यात संपर्क पंचायत समिती सदस्य आणि पर्यावरणीय कमिटी सदस्यांची भेट

जिल्ह्यात 2 ते 4 जुलैदरम्यान अतिमुसळधार पावसाची शक्यता नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन