vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

विजाभज आश्रम शाळा शिक्षक – कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांवर मंत्रालयात बैठक-मंत्री अतुल सावे यांनी सकारात्मक प्रतिसाद देत अधिकाऱ्यांना तात्काळ उपाययोजनांचे निर्देश

विजाभज आश्रम शाळा शिक्षक – कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांवर मंत्रालयात बैठक-मंत्री अतुल सावे यांनी सकारात्मक प्रतिसाद देत अधिकाऱ्यांना तात्काळ उपाययोजनांचे निर्देश

 

गडचिरोली प्रतिनिधी : इतर मागास व बहुजन कल्याण विभागाचे मंत्री ना. अतुलजी सावे यांच्या अध्यक्षतेखाली आश्रम शाळा कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित प्रश्नांबाबत मंत्रालय मुंबई येथे महत्त्वपूर्ण बैठक काल पार पडली. या बैठकीत आश्रम शाळा कर्मचारी व शिक्षकांच्या विविध समस्या आणि प्रलंबित मागण्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

यावेळी विविध प्रश्नांवर मंत्री अतुल सावे यांनी सकारात्मक प्रतिसाद देत संबंधित अधिकाऱ्यांना समस्या सोडविण्यासाठी तात्काळ आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश दिले. त्यामुळे आश्रम शाळा कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांना गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.

बैठकीत आश्रम शाळांमधील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यावर विशेष भर देण्यात आला. विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षा, ऑलिम्पियाड, शिष्यवृत्ती परीक्षा यांसह विविध शैक्षणिक स्पर्धांमध्ये सहभागी व्हावे, यासाठी शिक्षकांनी विशेष प्रयत्न करावेत, अशा सूचना मंत्री महोदयांनी केल्या. तसेच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी खेळ व क्रीडा स्पर्धांचे आयोजन करून त्यांच्या सुप्त गुणांना वाव देण्याचे आवाहन करण्यात आले.

या बैठकीस आमदार सुधाकर अडबाले, सचिव आप्पासाहेब धुळाज, संचालक सोनाली मुळे, सर्व प्रादेशिक उपसंचालक तसेच विभागातील प्रमुख अधिकारी तसेच महाराष्ट्र राज्य आश्रम शाळा शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचे राज्याध्यक्ष बालाजी मुंडे, सरचिटणीस किशन पुंड, तुकाराम शिरसाठ सर, केंद्रे सर, मुनेश्वर सर, रुपेश पाटील सर, सानप सर यांच्यासह संघटनेचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

बैठकीनंतर आमदार सुधाकर अडबाले यांच्या कार्याचा आढावा घेणारे “सुधाकरपर्व” पुस्‍तक आमदार अडबाले यांनी मंत्री अतुलजी सावे यांना भेट दिले.

0000

संबंधित पोस्ट

नवी मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025-26 करिता दि. 15 जानेवारी 2026 रोजी, सकाळी 7.30 ते सायं. 5.30 वाजता या वेळेत मतदान सुरू होणार

vishwatmaklokswamivarta

धकाधकीच्या जीवनात आत्मशांतीसाठी माऊलींचे विचार आवश्यक – मंत्री ॲड. आशिष शेलार ज्ञानेश्वर माऊलींच्या ७५० व्या जयंतीनिमित्त ‘ज्ञानियांचा राजा, मोगरा फुलला’ कार्यक्रमाचे उद्घाटन; राज्यातील भजनी मंडळांना प्रत्येकी २५ हजार रुपयांचे अनुदान वितरित

गणेशोत्सवात ‘सेवांचा जागर’; टपाल, विमा, आधार अन् आरोग्यसेवा एकाच छताखाली‘लोकसंवाद-२०२६’ अंतर्गत खामगावात ‘गणपती नाईट कॅम्प’; नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

vishwatmaklokswamivarta

एचएसआरपी नंबर प्लेट वेळेत बसवा आणि दंड टाळा नंबर प्लेट बसवण्यास 30 जून पर्यंत मुदत 

सर्वोच्च न्यायालयानं आज काँग्रेस नेते राहुल गांधी, समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांच्यासह इतरांना नोटिसा बजावल्या मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेतल्या कथित अनियमितते प्रकरणी..

vishwatmaklokswamivarta

अनुसूचित जमातीच्या मुलींसाठी मोफत पोलीस – सैन्यदल भरतीपूर्व निवासी प्रशिक्षण