vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

संविधान दिनानिमित्त आयोजित चित्रकला स्पर्धेस शालेय विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

संविधान दिनानिमित्त आयोजित चित्रकला स्पर्धेस शालेय विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

ठाणे प्रतिनिधी भारतीय संविधानाचे महत्त्व, लोकशाही मूल्ये आणि देशाच्या महान महापुरुषांचे विचार जनमानसात रुजविण्याच्या उद्देशाने ठाणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या संविधान महोत्सवाला उत्साहात प्रारंभ झाला. महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी आज टिळक उद्यान, गावदेवी मैदान येथे चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. महापौर शर्मिला पिंपळोलकर यांच्या संकल्पनेतून संविधान या विषयावर आयोजित चित्रकला स्पर्धेला महापालिका व खाजगी शाळांमधील विद्यार्थ्यांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग लाभला.लहान वयातच विद्यार्थ्यांना संविधानाचे महत्त्व, देशाची लोकशाही व्यवस्था आणि संविधान निर्मितीमध्ये योगदान देणाऱ्या महापुरुषांची ओळख व्हावी, या उद्देशाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी आपल्या कल्पकतेतून आणि रंगांच्या माध्यमातून विविध विषयांवर चित्रे साकारली. त्यांच्या कलाकृतींमधून देशप्रेम, सामाजिक एकता, समता आणि लोकशाही मूल्यांचे दर्शन घडले.

चित्रकला स्पर्धेच्या निमित्ताने विद्यार्थ्यांना आपल्या कलागुणांना वाव देण्याची संधी मिळाली. स्पर्धेतील विद्यार्थ्यांचा उत्साह आणि सहभाग पाहता संविधान दिनाच्या उपक्रमांना शालेय स्तरावर चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून आले

संविधान महोत्सवाच्या पहिल्या दिवशी लोकशाहीर नंदेश उमप यांच्या‘कोहिनूर भारताचा’ कार्यक्रमाला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद संविधान महोत्सवाच्या पहिल्या दिवशी दिनांक 24 नोव्हेंबर रोजी सायं. 6.00 वा. गावेदवी मैदान येथे लोकशाहीर नंदेश विठ्ठल उमप यांनी प्रस्तुत केलेल्या ‘कोहिनूर भारताचा’ या कार्यक्रमातून भारताच्या जडणघडणीत महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या महापुरुषांच्या जीवनप्रवासाचा आणि त्यांच्या कार्याचा संगीतमय आढावा घेण्यात आला. गीत, संगीत आणि प्रभावी सादरीकरणाच्या माध्यमातून महापुरुषांचे विचार आणि त्यांची प्रेरणादायी यशोगाथा रसिकांसमोर उलगडण्यात आली. ‘कोहिनूर भारताचा’ या कार्यक्रमातून भारतीय इतिहासातील दोन महान व्यक्तिमत्त्वे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अतुलनीय कर्तृत्वाचा गौरव करण्यात आला. लोकशाहीर नंदेश विठ्ठल उमप यांनी गीत-संगीताच्या माध्यमातून या महापुरुषांच्या जीवनातील संघर्ष, कार्य आणि प्रेरणादायी विचार रसिकांसमोर मांडले.

या कार्यक्रमाला उपस्थित रसिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत कलाकारांचे कौतुक केलेया कार्यक्रमास नौपाडा कोपरी प्रभाग समिती अध्यक्षा मीनल संख्ये, दिवा प्रभाग समिती अध्यक्ष दिपक जाधव, नगसेवक संजय वाघुले, भरत चव्हाण, अनिल भोर, नगरसेविका विमल भोईर, उषा वाघ, अतिरिक्त आयुक्त 1 प्रशांत रोडे, उपायुक्त जी.जी. गोदेपुरे, उपायुक्त दिपक झिंजाड, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे ठाणे शहर (जिल्हा)अध्यक्ष भास्कर वाघमारे उपस्थित होते.

 

संबंधित पोस्ट

शालेय शिक्षण विभागातील विविध विषयांचा मंत्री दादाजी भुसे यांनी घेतला आढावा दर्जेदार शिक्षणाच्या माध्यमातून पटसंख्या वाढविण्यावर भर देण्याचे आवाहन

नवी मुंबईत प्रदूषणकारी 19 बांधकामे बंद – 42 बांधकामांना नोटीसा समीर ॲप व प्रदूषण नियंत्रक मंडळाच्या वेबसाईटवरुन हवा गुणवत्ता विषयक अधिकृत माहिती घेण्याचे आवाहन

सेवा संकल्प अभियानांतर्गत जागतिक बांबू दिवसानिमित्त नवी मुंबईत 1200 हून अधिक बांबू वृक्षलागवड

vishwatmaklokswamivarta

जिल्ह्यात ‘डिजिटल जनगणने’ ची तयारी सुरू६४ फिल्ड ट्रेनर्सच्या प्रशिक्षणाने मोहीम सुरू

vishwatmaklokswamivarta

मुंबईतील उंच इमारतींसाठी अग्निसुरक्षा व्यवस्था सक्षम करण्यात येणार- मंत्री उदय सामंत

🚨 महाड पूरपरिस्थितीचा जिल्हाधिकाऱ्यांकडून प्रत्यक्ष आढावा