vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

संविधान दिनानिमित्त किल्ले रायगडावर ‘गडांचा मान, संविधानाचा सन्मान’ विशेष सोहळा*

*संविधान दिनानिमित्त किल्ले रायगडावर ‘गडांचा मान, संविधानाचा सन्मान’ विशेष सोहळा*

रायगड-अलिबाग, प्रतिनिधी : छत्रपती शिवाजी महाराज यांचा ऐतिहासिक वारसा आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या भारतीय संविधानातील मूलभूत कर्तव्ये यांचा आदर्श जपत, राष्ट्रीय संविधान दिनानिमित्त ‘गडांचा मान, संविधानाचा सन्मान’ या विशेष सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.    हा कार्यक्रम गुरुवार, २६ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी ९.०० वाजता हिरकणीवाडी, किल्ले रायगड, हॉटेल साक्षी समोर, रायगड रोपवे येथे होणार आहे. ऐतिहासिक वारसा, संविधानिक कर्तव्ये आणि पर्यावरण संवर्धन यांचा संगम साधणे, हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश आहे.       स्वातंत्र्याच्या मूल्यांपासून संविधानाने दिलेल्या जबाबदारीपर्यंतचा विचार तरुण व भावी पिढीमध्ये रुजवून, त्यांना वारसा व पर्यावरण रक्षणाशी जोडण्याचा प्रयत्न यातून केला जाणार आहे.   या निमित्ताने गडावर स्वच्छता व पर्यावरण जनजागृती अभियान, सामूहिक संविधान उद्देशिका वाचन व प्रतिज्ञा, पर्यावरण संवर्धनाच्या आग्रहाप्रती अभिवादन तसेच सांस्कृतिक व लोककला कार्यक्रम असे विविध उपक्रम पार पडणार आहेत. या अंतर्गत राज्यातील ११ गड-किल्ल्यांवर स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार असून, कोकणकडा मित्र मंडळ व सहयोगी संस्था यांच्या वतीने किल्ले रायगड येथे सकाळी ७:३० ते ९:३० या वेळेत स्वच्छता मोहीम आयोजित करण्यात आली आहे

     या सोहळ्यासाठी सर्वांनी उपस्थित राहावे, असे आवाहन महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम यांनी केले आहे.

0000000

संबंधित पोस्ट

विशेष लेखः- पशुधनासाठी चारा उत्पादनात शेतकऱ्यांचा सहभाग

vishwatmaklokswamivarta

आसाम रायफल्स पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांशी राज्यपालांचा संवाद

आय आय टी मुंबईतल्या साहिल वाकोडे या विद्यार्थ्याच्या कथित आत्महत्येप्रकरणी मुंबई पोलिसांनी या संस्थेतले प्राध्यापक सूर्यनारायण डुल्ला यांची काल सुमारे १० तास चौकशी केली. 

पुस्तकांचे गाव’ उपक्रमासाठी ३० जूनपर्यंत प्रस्ताव पाठवावेत – जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया

जिल्ह्यात प्रायोगिक तत्वावर कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित ऊस उत्पादकता वाढ प्रकल्प राबवा- पालकमंत्री शंभूराज देसाई

ग्राहकांनी हक्कांबाबत सजगता बाळगावी-अतिरिक्त जिल्हाधिकारी गोविंद दानेज*जिल्हाधिकारी कार्यालयात जागतिक ग्राहक हक्क दिन साजरा