vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

हवामान सक्षम व शाश्वत शेतीसाठी नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प २.० प्रभावीपणे राबवावा – कृषी राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल

हवामान सक्षम व शाश्वत शेतीसाठी नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प २.० प्रभावीपणे राबवावा – कृषी राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल…

मुंबई, प्रतिनिधी: नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प २.० मुळे दुष्काळप्रवण भागातील कृषी अर्थव्यवस्थेला अधिक बळकटी मिळेल. हवामान सक्षम व शाश्वत शेतीसाठी नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प २.० योजना योजना विभागाने प्रभावीपणे राबवण्याचे सूक्ष्म नियोजन करून त्यानुसार कार्यवाही करावी, असे निर्देश कृषी, वित्त व नियोजन, मदत व पुनर्वसन, कामगार आणि विधी व न्याय राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल यांनी दिले.

नानाजी देशमुख कृषी संजीवनी कार्यालयाच्या सभागृहात कृषी राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल यांनी नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प २.० चा आढावा घेतला. यावेळी प्रकल्प संचालक परिमल सिंह, कृषी विभागाचे उप सचिव श्री. चंदनशिवे यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

कृषी राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल म्हणाले, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यातील यशस्वी अंमलबजावणीच्या पार्श्वभूमीवर आता दुसऱ्या टप्प्यात शाश्वत व हवामान परिणामांना सक्षमपणे सामोरे जाणाऱ्या शेतीला अधिक व्यापक स्वरूप देण्यावर भर देण्यात यावा. जो शेतकरी केवळ शेतीच्या उत्पन्नावरच अवलंबून असतो अशा शेतकऱ्यास नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प २.० मधील विविध योजनेचा लाभ मिळवून देउन त्याला आर्थिकदृष्ट्या सक्षम करावे. या योजनेच्या लाभापासून मूळ लाभार्थी वंचित रहाणार नाही याचीही दक्षता घ्यावी.

शेतकऱ्यांना हवामान बदलामुळे उद्भवलेल्या परिस्थितीशी जुळवून घेण्यास सक्षम करणे व शेतीतील नफ्याचे प्रमाण वाढवणे बरोबरच या योजनेचा लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांच्या शेत पिकांचे वन्य प्राण्यांपासून संरक्षणासाठीही उपाययोजना राबविण्यास प्राधान्य द्यावे. यासाठी कृषी, आदिवासी विकास, वन विभाग यांच्या समवेत एकत्रित बैठक आयोजित करावी.

नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेचा लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांच्या यशोगाथा तयार कराव्यात. तसेच योजनेची व्यापक प्रमाणात प्रचार व प्रसिद्धी करावी, असेही कृषी राज्यमंत्री ॲड. जयस्वाल यांनी सांगितले.

संबंधित पोस्ट

एकरकमी परतावा (OTS) योजना थकबाकीदार लाभार्थीनी योजनेचा लाभ घेऊन कर्जमुक्त व्हावे

नांदेड जिल्ह्यात खरीपसाठी मुबलक #खत साठा उपलब्ध• शेतकऱ्यांनी अफवांना बळी न पडता खत तुटवड्याच्या भीतीपोटी अनावश्यक खत खरेदी करू नये

डावी लोकशाही आघाडीने जालना महानगर पालिका निवडणुकीसाठी महाविकास आघाडीच्या सर्व उमेदवारांना आपला पाठींबा जाहीर

vishwatmaklokswamivarta

महापौर श्रीम.सुजाता पाटील यांनी घेतला सर्वसाधारण सभेतील मंजूर ठरावांवरील कार्यवाहीचा आढावा

vishwatmaklokswamivarta

शेतकरी शास्त्रज्ञ पुरस्कारासाठी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवावा

संभाव्य पाणीटंचाईचे गावनिहाय कृती आराखडे २५ ऑक्टोबरपर्यंत सादर करावेत- मंत्री गुलाबराव पाटील· जलजीवन मिशनअंतर्गत ७५ ते ९९ टक्के पूर्ण झालेल्या योजना प्राधान्याने कार्यान्वित करण्याचे निर्देश..

vishwatmaklokswamivarta