vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

११० गरजू विद्यार्थ्यांना शालेय गणवेशाचे मोफत वाटप

११० गरजू विद्यार्थ्यांना शालेय गणवेशाचे मोफत वाटप

ठाणे – प्रतिनिधी –

श्रीमती गुजना हिंदी/इंग्रजी हायस्कूल आझादनगर, चितळसर मानपाडा, ठाणे या शाळेच्या ११० गरजू विद्यार्थ्यांना मोफत गणवेश वाटप करण्यात आले.

महेश बंशीधर अग्रवाल फाऊंडेशन’ आणि ‘राजरानी फाऊंडेशन’ या दोन प्रसिद्ध सेवाभावी संस्थेतर्फे हे गणवेश देण्यात आले. ‘महेश बंशीधर अग्रवाल फाऊंडेशन’चे अध्यक्ष, वरिष्ठ समाजसेवक महेश अग्रवाल आणि ‘राजरानी फाऊंडेशन’ची अध्यक्षा रानी पांडेय यांनी काही दिवसांपूर्वी मागसवर्गीय क्षेत्रात असलेले ४७ वर्ष जुनी श्रीमती गुजना हिंदी/इंग्रजी हायस्कूल या शाळेत सदिच्छा भेट दिली होती.

या भेटी दरम्यान त्यांना बरेच गरजू विद्यार्थी आढळून आले होते. या विद्यार्थ्यांची अर्थिक परिस्थिती पाहून असे ११० मुली/मुले यांना गणवेश देण्याचे ठरवले होते. गरजू विद्यार्थ्यांना मोफत गणवेश वाटपच्या वेळी शाळेतर्फे शिप्रा डे, अभय पांडेय, रामकेर शर्मा, राजेश पांडेय आणि साधना मिश्रासह अनेक शिक्षकांनी विशेष परिश्रम घेतले.

एकुण ११० मुली/मुलांना मोफत गणवेश वाटपानंतर संस्थेतर्फे संतोष पांडेय यांनी महेश अग्रवाल आणि राणी पांडेय यांचे विशेष आभार मानले. या वेळी मोठ्या संख्येने शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते.-

संबंधित पोस्ट

पाणीटंचाई निवारणासाठी जिल्ह्यात २० गावांमध्ये रिचार्ज शाफ्ट कामांना मंजुरी१०५.३१ लाख रुपयांच्या १२७ उपाययोजनांना प्रशासकीय मान्यता..

प्रशासकीय सेवा थेट जनतेच्या दारी; ‘महाराजस्व समाधान शिबिर’ नागरिकांचे जीवन सुकर करेल– अपर मुख्य सचिव विकास खारगे*

आयडिएशन कॉम्पिटिशन ३.०’ विद्यार्थ्यांच्या नवकल्पनांना चालना देणारी ठरेल – कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा

सन्मान कर्तृत्वाचा’ सोहळा उत्साहातमाजी आमदार व्ही. यू. डायगव्हाणे, प्राचार्य डॉ. बबनराव तायवाडे यांचा जीवनगौरव पुरस्काराने सपत्नीक सन्मान

vishwatmaklokswamivarta

मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांच्या हस्तेखादी ग्रामोद्योग उत्पादन प्रदर्शनाचे उद्घाटन· मंत्रालयात १ ऑक्टोबरपर्यंत खादी व ग्रामोद्योग उत्पादनांच्या खरेदीची संधी· महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त त्रिमूर्ती प्रांगणात प्रदर्शन

vishwatmaklokswamivarta

जिल्हा परिषद विषय समिती सभापती निवड;गुरुवारी (दि.२ एप्रिल) विशेष सभा