vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

आज 26 नोव्हेंबर*संविधान दिनानिमित्त किल्ले रायगडावर ‘गडांचा मान, संविधानाचा सन्मान’ विशेष सोहळा*

आज 26 नोव्हेंबर*संविधान दिनानिमित्त किल्ले रायगडावर ‘गडांचा मान, संविधानाचा सन्मान’ विशेष सोहळा*

 

रायगड-अलिबाग, प्रतिनिधी

गडांचा मान, संविधानाचा सन्मान!’

राष्ट्रीय संविधान दिनानिमित्त महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ घेऊन येत आहे एक ऐतिहासिक उपक्रम, ‘गडांचा मान, संविधानाचा सन्मान!’ किल्ले रायगडासह युनेस्कोचा जागतिक वारसा दर्जा लाभलेल्या सर्व गडकिल्ल्यांवर हा भव्य सोहळा एकाच वेळी संपन्न होणार आहे.:

छत्रपती शिवाजी महाराज यांचा ऐतिहासिक वारसा आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या भारतीय संविधानातील मूलभूत कर्तव्ये यांचा आदर्श जपत, राष्ट्रीय संविधान दिनानिमित्त ‘गडांचा मान, संविधानाचा सन्मान’ या विशेष सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.     हा कार्यक्रम आज गुरुवार, २६ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी ९.०० वाजता हिरकणीवाडी, किल्ले रायगड, हॉटेल साक्षी समोर, रायगड रोपवे येथे होणार आहे. ऐतिहासिक वारसा, संविधानिक कर्तव्ये आणि पर्यावरण संवर्धन यांचा संगम साधणे, हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश आहे.

     स्वातंत्र्याच्या मूल्यांपासून संविधानाने दिलेल्या जबाबदारीपर्यंतचा विचार तरुण व भावी पिढीमध्ये रुजवून, त्यांना वारसा व पर्यावरण रक्षणाशी जोडण्याचा प्रयत्न यातून केला जाणार आहे.

      या निमित्ताने गडावर स्वच्छता व पर्यावरण जनजागृती अभियान, सामूहिक संविधान उद्देशिका वाचन व प्रतिज्ञा, पर्यावरण संवर्धनाच्या आग्रहाप्रती अभिवादन तसेच सांस्कृतिक व लोककला कार्यक्रम असे विविध उपक्रम पार पडणार आहेत. या अंतर्गत राज्यातील ११ गड-किल्ल्यांवर स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार असून, कोकणकडा मित्र मंडळ व सहयोगी संस्था यांच्या वतीने किल्ले रायगड येथे सकाळी ७:३० ते ९:३० या वेळेत स्वच्छता मोहीम आयोजित करण्यात आली आहे.

     या सोहळ्यासाठी सर्वांनी उपस्थित राहावे, असे आवाहन महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम यांनी केले आहे.

0000000000

संबंधित पोस्ट

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त ‘माझी वसुंधरा’ शपथ,पर्यावरण संवर्धनासाठी सामूहिक बांधिलकी आवश्यक विभागीय आयुक्तांकडून वृक्ष लागवड

विविध कृषी पुरस्कारांकरीता शेतकऱ्यांनी ऑनलाईन संगणक प्रणालीवर अर्ज करावेत

महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून कार्यकाळ सुरू करणाऱ्या सुनेत्रा पवार जी यांना शुभेच्छा. मला विश्वास आहे की त्या राज्यातील जनतेच्या कल्याणासाठी अथक परिश्रम करतील आणि दिवंगत अजितदादा पवार यांचे स्वप्न पुढे नेतील. असे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी एक्स या ट्विटरवर म्हंटले आहे

vishwatmaklokswamivarta

स्थानिक प्राधिकारी विधान परिषद द्विवार्षिक निवडणूक कार्यक्रम जाहीर,निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज- अपर जिल्हाधिकारी अडकुणे

20 मे रोजीच्या औषध विक्रेता बंदच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन सज्ज;औषध पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी उपाययोजना

लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी दिलासा; ई-केवायसी दुरुस्तीसाठी ३० एप्रिलपर्यंत मुदतवाढ