vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

कामात गती, पारदर्शकता ठेवत अधिकाऱ्यांनी लोकाभिमुख होऊन काम करा – पालकमंत्री विखे पाटील-श्रीगोंद्यात ‘बिबट रेस्क्यू सेंटर’ व वनविभागाच्या जागेवर विकास प्रकल्प उभारण्याच्या सूचना..

कामात गती, पारदर्शकता ठेवत अधिकाऱ्यांनी लोकाभिमुख होऊन काम करा – पालकमंत्री विखे पाटील-श्रीगोंद्यात ‘बिबट रेस्क्यू सेंटर’ व वनविभागाच्या जागेवर विकास प्रकल्प उभारण्याच्या सूचना..

​ राज्य प्रतिनिधी -अहिल्यानगर, : “शासकीय योजनांचा लाभ सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवणे हेच प्रशासनाचे मुख्य ध्येय आहे. त्यामुळे अधिकाऱ्यांनी अधिक जबाबदारीने व लोकाभिमुख होऊन काम करावे,” असे स्पष्ट निर्देश जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले.

श्रीगोंदा येथील ‘माऊली’ संपर्क कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी आमदार विक्रमसिंह पाचपुते, माजी मंत्री बबनराव पाचपुते यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

पालकमंत्री विखे पाटील म्हणाले, श्रीगोंद्यात वनविभागाची मोठी जमीन विनावापर पडून आहे. या जमिनीचा वापर जनहिताच्या विकासकामांसाठी करण्यासाठी सविस्तर प्रस्ताव त्वरित पाठवावा. तसेच, संगमनेरच्या धर्तीवर श्रीगोंद्यातही ‘लेपर्ड रेस्क्यू सेंटर’ (बिबट्या निवारा केंद्र) उभारण्यासाठी तातडीने प्रस्ताव तयार करावा.तालुक्यात कायदा व सुव्यवस्था उत्तम राहण्यासाठी ‘पोलिसिंग’ सुधारण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. गरज पडल्यास नवीन पोलीस ठाणे आणि पोलिसांच्या निवासस्थानासाठी प्रस्ताव सादर करावेत, असेही त्यांनी सांगितले.

शेतकऱ्यांना दर्जेदार खते व बियाणे मिळायलाच हवीत. जर कोणी यात काळाबाजार करत असेल, तर त्यांच्यावर कडक कारवाई करा, असे आदेश पालकमंत्र्यांनी दिले. आरोग्य यंत्रणेचा आढावा घेताना ते म्हणाले की, प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये पुरेसा औषधसाठा हवा आणि महिलांच्या प्रसूतीसाठी अद्ययावत सुविधा उपलब्ध असायला हव्यात.

​वीज, पाणी आणि घरकुल,शासनाच्या ‘सोलर’ योजनांवर भर देऊन शेतकऱ्यांना आणि सर्वसामान्यांना दिलासा द्यावा. तसेच, घरकुल योजनेची अंमलबजावणी प्रभावीपणे करून बेघरांना हक्काचे घर मिळवून द्यावे. शहरात महिला व ज्येष्ठांसाठी सर्व सोयींनी युक्त असे सुसज्ज उद्यान उभारावे, अशा सूचनाही त्यांनी केल्या.​बैठकीत महसूल, कृषी, वीज, पाणीपुरवठा आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कामांचा सविस्तर आढावा घ

संबंधित पोस्ट

इतर मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी मोफत पूर्वतयारी प्रशिक्षणऑनलाइन अर्ज करण्याचे आवाहन

मिशन भरारी’ अंतर्गत गुणवत्ताधारक विद्यार्थ्यां चे इस्रो अभ्यासदौऱ्यासाठी उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचे उपस्थितीत होणार प्रयाण

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका खास मुलाखतीत स्पष्ट केलं की, मुंबईचा पुढील महापौर महाराष्ट्रातील महायुतीचाच असेल आणि तो हिंदू व मराठीच …

विधानपरिषदलक्षवेधी—

vishwatmaklokswamivarta

स्वदेशी एक्स्पो’ची तयारी अंतिम टप्प्यात आज उद्घाटनकेंद्रीय क्रीडा व युवा कल्याण राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या हस्ते उद्घाटनकेंद्रीय सूक्ष्म, लघु व मध्यम उद्यम

दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग पूर्व परीक्षा ३ जानेवारी २०२७ रोजी

vishwatmaklokswamivarta