vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

घरगुती पाणी बिलाच्या थकबाकीवरील प्रशासकीय आकारात (व्याज/दंड) १०० टक्के सूट नागरिकांनी या योजनेचा लाभ घेण्याचे महापौर व आयुक्तांचे आवाहन

घरगुती पाणी बिलाच्या थकबाकीवरील प्रशासकीय आकारात (व्याज/दंड) १०० टक्के सूट नागरिकांनी या योजनेचा लाभ घेण्याचे महापौर व आयुक्तांचे आवाहन

ठाणे प्रतिनिधी): घरगुती पाणी बिलाची थकबाकी असलेल्या नळ संयोजन धारकांसाठी दिलासादायक निर्णय घेण्यात आला असून, थकीत पाणी बिलावर आकारण्यात आलेल्या प्रशासकीय आकारामध्ये (व्याज/दंड) १०० टक्के सूट देण्याची योजना 01 सप्टेंबर 2026 ते 31 डिसेंबर 2026 या कालावधीत लागू करण्यात आली असून या योजनेचा लाभ नागरिकांनी घ्यावा असे आवाहन महापौर शर्मिला पिंपळोलकर व आयुक्त सौरभ राव यांनी केले आहे.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी घरगुती नळ संयोजन धारकांनी आपली मागील थकीत पाणी बिलाची रक्कम तसेच चालू आर्थिक वर्ष २०२६-२७ ची मागणी एकत्रितपणे एकरकमी भरावी लागणार आहे. एकरकमी भरणा करणाऱ्या पात्र ग्राहकांना थकबाकीवरील प्रशासकीय आकार (व्याज/दंड) पूर्णपणे माफ करण्यात येणार आहे.

ही सवलत योजना १ सप्टेंबर २०२६ ते ३१ डिसेंबर २०२६ या कालावधीपुरतीच लागू राहणार आहे. त्यामुळे थकीत बिल असलेल्या घरगुती ग्राहकांनी निर्धारित कालावधीत बिलाचा भरणा करून या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

दरम्यान, १ जानेवारी २०२७ नंतरही पाणी बिलाची थकबाकी कायम राहिल्यास संबंधित ग्राहकांच्या नळजोडण्या खंडित करून पाणीपुरवठा बंद करण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. ही सवलत योजना व्यावसायिक पाणी ग्राहकांसाठी लागू राहणार नाही. त्यामुळे संबंधित घरगुती ग्राहकांनी मुदतीपूर्वी आपली पाणी बिल देयके भरून प्रशासकीय आकारावरील १०० टक्के सवलतीचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा आणि महापालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

संबंधित पोस्ट

जालना जलकवच अभियानांतर्गत बदनापूर येथे रेशीम शेती कार्यशाळा संपन्न.

दरडग्रस्तांच्या पुनर्वसनाला गती; गोकुळ तर्फ पाटण येथे ८ घरकुले लाभार्थ्यांना हस्तांतरित

2 वर्षात 200 एस. टी. बसेस पालघर वासियांना मिळणार – आमदार विलास तरे# परिवहन मंत्री तथा सहपालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या बैठकीत निर्णय

शहापुरात ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर’ उत्साहात संपन्न शेकडो नागरिकांना घरबसल्या मिळाला शासकीय योजनांचा लाभ…

मुंबई उपनगर जिल्ह्यात २९ सप्टेंबर रोजी १८ ठिकाणी रोजगार मेळाव्यांचे आयोजन    :- जिल्हाधिकारी सौरभ कटियार

vishwatmaklokswamivarta

वरळी येथील दूरदर्शन केंद्रात प्लॅनेट रीड ‘मराठी समान भाषा उपशीर्षक केंद्रा’चा शुभारंभ माहिती व जनसंपर्क विभागाचे प्रधान सचिव व महासंचालक ब्रिजेश सिंह यांच्या हस्ते फित कापून करण्यात आला

vishwatmaklokswamivarta