vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

नवोदय विद्यालय प्रवेशासाठी शनिवारी परीक्षा*जिल्ह्यातील १५,४१२ विद्यार्थी देणार परीक्षा

नवोदय विद्यालय प्रवेशासाठी शनिवारी परीक्षा*जिल्ह्यातील १५,४१२ विद्यार्थी देणार परीक्षा

अमरावती, द प्रतिनिधी जवाहर नवोदय विद्यालय समितीमार्फत शैक्षणिक सत्र २०२७-२८ मधील इयत्ता सहावीच्या प्रवेशासाठी ‘जवाहर नवोदय विद्यालय निवड चाचणी’ शनिवार, दि. २८ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजता घेण्यात येणार आहेजिल्ह्यातील एकूण १४ तालुक्यांमधील ६१ केंद्रावर तब्बल १५ हजार ४१२ विद्यार्थी परिक्षा देणार आहेत. सर्व विद्यार्थ्यांना परीक्षेची प्रवेशपत्रे वितरीत करण्यात आली आहेत. विद्यार्थ्यांनी प्रवेशपत्रावरील सर्व तपशील काळजीपूर्वक तपासावेत, परीक्षेचे स्वरूप व सूचना समजून घ्याव्यात आणि परीक्षेच्या दिवशी निर्धारित वेळेपूर्वी केंद्रावर उपस्थित राहावे.

प्रवेशपत्र, परीक्षा केंद्र किंवा परीक्षेसंदर्भात इतर कोणतीही अडचण असल्यास जवाहर नवोदय विद्यालय, नवसारी (अमरावती) येथील प्रवेश परीक्षा प्रभारी श्री. सोनटक्के यांच्याशी ९४२३६१७८४९ या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा. तसेच विद्यार्थ्यांनी आत्मविश्वासाने परीक्षेला सामोरे जावे, असे आवाहन नवोदय विद्यालयाचे प्राचार्य एस. जे. गवई यांनी केले आहे.

00000

संबंधित पोस्ट

लातूर जिल्ह्यात मतदार याद्यांची ‘विशेष सखोल पुनरिक्षण’ मोहीम; २०.३६ लाख मतदारांच्या घरी पोहोचणार निवडणूक यंत्रणा

युवा पिढीला एआय बेस तंत्रज्ञानाद्वारे पुढे नेण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार -महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे ‘अमरावती युवा महोत्सव 2026’चे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते उद्घाटनमेळघाट महोत्सवाच्या माध्यमातून युवकांना संधी..

जिल्ह्यात जमावबंदी, शस्त्रबंदी आदेश लागू 

vishwatmaklokswamivarta

दुबई येथून १११ नागरिक पुण्यात सुखरूप पोहोचले; उर्वरित नागरिकांना आणण्याची कार्यवाही सुरु

केंद्र सरकारच्या आयगॉट- ‘साधना सप्ताह 2026’ मध्ये महाराष्ट्र अव्वल**मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून अधिकारी-कर्मचाऱ्यांचे कौतुक

आजचा  ऐतिहासिक क्षण! पश्चिम बंगालच्या राजकीय इतिहासात नव्या अध्यायाची सुरुवात भाजपा नेते यांनी घेतली पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री म्हणून शपथ