vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

संविधान दिनानिमित्त जालन्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन

संविधान दिनानिमित्त जालन्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन

 

जालना,द प्रतिनिधी : भारतीय संविधानाचे महत्त्व आणि त्यातील लोकशाही मूल्यांची जनजागृती करण्यासाठी संविधान दिनानिमित्त गुरुवार, दि. 26 नोव्हेंबर रोजी जालना येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.भारतीय संविधान 26 नोव्हेंबर 1949 रोजी स्वीकारण्यात आले असून, 26 जानेवारी 1950 पासून संविधानाची अंमलबजावणी सुरू झाली. संविधानाने देशातील नागरिकांना सामाजिक, आर्थिक व राजकीय न्याय, विचार व अभिव्यक्ती स्वातंत्र्य, समानता तसेच बंधुता यांसारखी मूलभूत मूल्ये प्रदान केली आहेत. देशाची एकता, अखंडता आणि नागरिकांच्या हक्कांचे संरक्षण करण्यात संविधानाची महत्त्वपूर्ण भूमिका आहे.

संविधान दिनानिमित्त सहाय्यक आयुक्त, समाजकल्याण कार्यालयाच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथील सभागृहात दि. 26 नोव्हेंबर रोजी सकाळी 10 वाजता संविधान दिनाचा मुख्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. तसेच सकाळी 8 वाजता संविधान जागरूकता रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.

ही रॅली समता द्वार येथून सुरू होऊन निर्धारित मार्गाने नूतन वसाहत, माजी मंडई व शासकीय रुग्णालय मार्गे डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथे पोहोचणार आहे.

या कार्यक्रमास नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून संविधान दिनाच्या उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन समाजकल्याण सहाय्यक आयुक्त डॉ. अनिता राठोड यांनी केले आहे.

*-*-*-*-*-*-

संबंधित पोस्ट

मध्यवर्ती सहकारी बँकेच्या माध्यमातून शेतकरी आर्थिकदृष्ट्या सक्षम झाला पाहिजे – पालकमंत्री जयकुमार गोरे पालकमंत्री गोरे यांच्या हस्ते आमदार राजेंद्र राऊत यांचा सत्कार

बारामती विधानसभा पोटनिवडणुकीतील उमेदवारांच्या खर्चाची दुसरी तपासणी पूर्ण

राष्ट्रीय संरक्षण व नौसेना अकादमी आणि सीडीएस परीक्षा रविवारी (दि.१३);१३ उपकेंद्रांवर ४ हजार ११२ उमेदवार देणार परीक्षा

vishwatmaklokswamivarta

लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या तैलचित्ररूपी स्मारकाचे* *उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण*

राज्यातील शासनमान्य ग्रंथालयांचे अनुदान ऑनलाइन जमा मंत्री चंद्रकांत (दादा) पाटील यांची माहिती राज्यातील १० हजार ३१२ शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांना या अनुदानाचा लाभ मिळणार

vishwatmaklokswamivarta

बुलढाणा जिल्हा पत्रकार संघाकडून सावित्रीमाई फुले जयंतीनिमित्त व्याख्यानाचे आयोजन