vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

भारताचा 77 वा प्रजासत्ताक दिन सोहळा साकेत पोलीस मैदानावरउपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार ध्वजारोहण

भारताचा 77 वा प्रजासत्ताक दिन सोहळा साकेत पोलीस मैदानावरउपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार ध्वजारोहण

ठाणे, प्रतिनिधी :- भारताच्या 77 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त ठाणे जिल्ह्यातील मुख्य शासकीय ध्वजारोहण समारंभ सोमवार, दि.26 जानेवारी 2026 रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांच्या हस्ते साकेत पोलीस मैदान येथे सकाळी 9.15 वा.संपन्न होणार आहे.

   ध्वजारोहणाच्या वेळी राष्ट्रीय/समारंभीय पोषाख परिधान करण्यात यावा. ध्वजारोहणाच्या मुख्य शासकीय समारंभात निमंत्रितांना सहभागी होता यावे यासाठी या दिवशी सकाळी 8-30 ते 10 वाजेदरम्यान ध्वजारोहणाचा किंवा इतर कोणताही शासकीय किंवा अशासकीय समारंभ आयोजित करण्यात येऊ नये. एखाद्या कार्यालयास अथवा संस्थेला आपला स्वतःचा ध्वजारोहणाचा समारंभ करावयाचा असल्यास त्यांनी तो समारंभ सकाळी 8-30 पूर्वी किंवा सकाळी 10 वाजेनंतर करावा.

    ध्वजसंहितेतील सर्व नियमांचे व सूचनांची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी. कागदी राष्ट्रध्वजाचा वापर ध्वजसंहितेच्या तरतूदीमध्ये नमूद केल्यानुसारच करावा. खराब झालेले माती लागलेले राष्ट्रध्वज गोणी किंवा कपड्यामध्ये व्यवस्थित बांधून शिवून बंद करावेत. अशासकीय संस्था, इतर संघटनांनी तसेच नागरिकांनी हे राष्ट्रध्वज तहसिल कार्यालयात सुपूर्द करावेत. राष्ट्रध्वजाचा योग्य तो मान राखावा.

   भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त होणाऱ्या ध्वजारोहण सोहळ्यास जिल्ह्यातील स्वातंत्र्य सैनिक, आणीबाणी सत्याग्रही, लोकप्रतिनिधी, माजी सैनिक, नागरिक, शासकीय अधिकारी कर्मचारी, विद्यार्थी अशा सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

000000000

संबंधित पोस्ट

हिंद-दी-चादर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सामाजिक संघटनांनी पुढाकार घ्यावा – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

vishwatmaklokswamivarta

साताऱ्यात महिला शक्तीचा जागर; जागतिक महिला दिनानिमित्तमहिला अधिकारी-कर्मचाऱ्यांची भव्य बाईक रॅली

गावाच्या एकजुटीतून जलसमृद्धीचा नवा अध्याय!रायगडच्या फळशेत ग्रामस्थांचा अनुकरणीय पुढाकार; लोकसहभाग, श्रमदान आणि पर्यावरण संवर्धनाचा अनोखा संगम.

vishwatmaklokswamivarta

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली ठाणे जिल्ह्यात शाळा, आरोग्य व नागरी सुविधांच्या कायापालटाचा ऐतिहासिक निर्णय

vishwatmaklokswamivarta

कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रात भविष्यासाठी महाराष्ट्र सज्ज; डेटा सेंटर क्षेत्रात राज्य आघाडीवर – पणन मंत्री जयकुमार रावल

छत्रपती संभाजीनगरात २२ फेब्रुवारी रोजी भव्य राज्यस्तरीय वधू-वर परिचय मेळावा

vishwatmaklokswamivarta