vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 135 व्या जयंतीच्या शासनातर्फे करण्यात येणा-या पूर्वतयारीचा केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी घेतला आढावा

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 135 व्या जयंतीच्या शासनातर्फे करण्यात येणा-या पूर्वतयारीचा केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी घेतला आढावा

मुंबई प्रतिनिधी – भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची यंदा 135 वी जयंती साजरी होत असून राज्य शासनातर्फे भिमजयंतीच्या केलेल्या पूर्वतयारीचा आढावा आज रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांनी सहयाद्री अतिथीगृह मलबार हिल येथे आयोजित शासकिय बैठकीत घेतला. यावेळी पोलीस, रेल्वे पोलीस, मुंबई महापालिका, राज्य शासनाच्या समाज कल्याण विविध विभांगाचे अधिकारी उपस्थित होते. यावेळी पुज्य भंते डॉ. राहुलबोधी महाथेरो, माजी राज्यमंत्री अविनाश महातेकर, समन्वय समितीचे नागसेन कांबळे, रिपाइंचे मुंबई अध्यक्ष सिध्दार्थ कासारे, राजेंद्र जाधव ; प्रकाश मोरे, दयाल बहादुरे, सुरेश बारसिंग, उषाताई रामलु, कामगार नेते रमेश जाधव, प्रकाश जाधव, शिवसेनेचे नेते रवि गरुड, रिपाइंचे घनश्याम चिरणकर आदि अनेक मान्यंवर उपस्थित होते.

 महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंती निमीत्त मुंबईत चैत्यभूमी येथे, नागपुरमधील दिक्षाभुमी यासह राज्यभरांतील विविध स्मारकात राज्य शासनातर्फे पुरविण्यात येणा-या विविध सेवा सुविधा आणि सुरक्षेच्या तयारीचा ना. रामदास आठवले यांनी आढावा घेतला. मुंबईत चैत्यभूमी तसेच गोराई येथील पॅगोडा येथे भिमजयंती निमीत्त हजारो बौध्द उपासक, भिम अनुयायी भेट देतात. त्यांच्या सुरक्षेचा विविध सुख सुविधा पुरविण्याबाबत ना. रामदास आठवले यांनी माहिती घेतली. 14 एप्रिल रोजी चैत्यभूमी येथे दिवसभर विविध सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जातात. त्यात नामवंत कलाकारांसह आंबेडकरी चळवळीतील भिमशाहीरांनाही आंबेडकरी लोक कलावंताना संधी देण्याची सुचना करण्यात आली. तसेच भिमजयंती निमीत्त चैत्यभूमी येथे 14 आणि 15 एप्रिल रोजी कार्यक्रम आयोजित करण्याची परवानगी राज्य शासनातर्फे देण्यात यावी. याबाबत आपण जिल्हाधिका-यांना पत्र पाठवणार असल्याची माहिती ना. रामदास आठवले यांनी दिली.

00000

संबंधित पोस्ट

संजय गांधी निराधार योजना सांगली शहर बैठकीत 94 प्रकरणे पात्र…

vishwatmaklokswamivarta

कच्छ अस्मिता मंचाचा ‘कच्छ पागडी कोणा शिरे?’सन्मान सोहळा १५ जुलै रोजी ठाण्यात.

vishwatmaklokswamivarta

जिल्ह्यात सामाजिक समता सप्ताह ८ ते १४ एप्रिल दरम्यान साजरा होणार सहायक आयुक्त प्रवीण कोरगंटीवार यांची माहिती

माहूर येथे पंडित दीनदयाळ उपाध्याय प्लेसमेंट ड्राईव्ह/रोजगार मेळावा 

राज्य अन्न आयोगाचे अध्यक्ष महेश ढवळे यांच्याकडून अलिबाग तालुक्यातील शाळा व अंगणवाड्यांची पाहणी; कुपोषित बालकांना योजनांचा लाभ देण्याचे निर्देश

vishwatmaklokswamivarta

बुलढाण्यात नूतन जिल्हाधिकाऱ्यांचे जल्लोषात स्वागत; डॉ. किरण पाटील यांना भावपूर्ण निरोप-विकासकामे वेगाने पुढे नेण्याचा संकल्प-डॉ.प्रविणकुमार देवरे